PUBLISHED IN 1962, RANJIT DESAI’S CLASSIC NOVEL SWAMI QUICKLY CAPTURED THE HEARTS OF READERS AND CRITICS ALIKE. ACROSS ITS REMARKABLE JOURNEY THROUGH FORTY EDITIONS, COUNTLESS SCHOLARS, REVIEWERS, AND READERS HAVE WRITTEN EXTENSIVELY ABOUT THE BOOK, EXAMINING THE DEEPER NUANCES OF ITS EPISODES—A CRITICAL ACCLAIM THAT HELPED THE MASTERPIECE TRULY FLOURISH. IN THIS CURATED VOLUME, DR. MEERA GHANDGE BRINGS TOGETHER A SELECTION OF SIGNIFICANT CRITICAL ESSAYS BY RENOWNED WRITERS AND REVIEWERS. ALONGSIDE THESE ANALYSES, THE BOOK FEATURES SELECT INTERVIEWS WITH RANJIT DESAI HIMSELF, OFFERING READERS A BEHIND-THE-SCENES LOOK AT THE JOURNEY OF SWAMI—FROM ITS INITIAL WRITING TO PUBLICATION—IN THE AUTHOR’S OWN WORDS, MAKING IT AN ESSENTIAL COMPANION TO THE TIMELESS NOVEL.
रणजित देसाई लिखित ‘स्वामी’ ही कादंबरी १९६२साली प्रकाशित झाली आणि वाचकांबरोबर समीक्षकांच्याही मनावर अधिराज्य गाजवू लागली. पहिल्या आवृत्तीपासून ४०व्या आवृत्तीपर्यंतच्या प्रवासात ‘स्वामी’वर असंख्य वाचकांनी-समीक्षकांनी आणि अभ्यासकांनी भरभरून लिहिलंय. स्वामीच्या प्रत्येक भागाचा-प्रसंगाचा गर्भितार्थ जाणून सखोल परीक्षण केलंय आणि बहुधा त्यामुळेच ‘स्वामी’ अक्षरश: बहरू लागलं. याच समीक्षणांतील काही प्रसिद्ध लेखक-समीक्षकांचे महत्त्वाचे समीक्षालेख डॉ. मीरा घांडगे यांनी या पुस्तकात संपादित/संकलित केले आहेत. त्याचबरोबर स्वामी या अजरामर कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांच्या काही मुलाखतीही यात वाचायला मिळणार आहेत. ‘स्वामी’चा प्रवास त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या लिखाणापासून ते पुस्तक निर्मितीपर्यंतच्या अनुभवांतून अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच हे पुस्तक ‘स्वामी’ या कादंबरीबरोबर संग्रही असावं असंच आहे.