* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342249
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS OFTEN BOASTED BY THE MESSENGERS OF GOD THAT THE ULTIMATE TRUTH OR RELIGIOUS FAITH BEGINS WHERE THE SCIENCE ENDS. DOES SCIENCE REALLY END ANYWHERE? NO THERE IS NO END .NEWER INVENTIONS IS AN ONGOING PROCESS.TRANSCENDENCE IS THE METAPHYSICAL STATE EXPERIENCED BY SPIRITUALISTS IN LIVING STATE. SCIENTISTS HAVE BEEN ABLE TO REPLICATE IT BY ELECTROMAGNETIC STIMULATION OF THE TEMPORAL LOBE OF BRAIN. IT CAN ALSO BE ACHIEVED BY SOME DRUGS LIKE LSD OR KETAMINE. MIND IS A FACULTY OF LIVING BRAIN.HACKING OF MIND IS A REALITY NOW. YOU CAN READ THE SECRETS ,DELETE OR ADD INFORMATION STORED IN THE BRAIN. THIS BOOK STARTS WITH HACKING OF BRAIN.GIVES INFORMATION ABOUT STRUCTURE,FUNCTIONS OF BRAIN.THE DISEASES OF BRAIN AND MIND. SUGGESTS PREVENTION,EARLY DIAGNOSIS AND TREATMENT.
आपल्या संपूर्ण शरीररूपी `वाद्यवृंदाचे` कार्य पूर्णपणे नियंत्रित करणारा `मास्टर` मेंदू हाच आहे. मेंदूत बिघाड झाला तर लय-ताल सर्व लयाला जातात. मेंदू थांबला की, माणूसही संपला- पूर्ण विराम! वरवर दिसणाऱ्या सर्व शारीरिक क्रियांखेरीज अदृश्य अशा सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा यांचा कर्ता-करविता, सर्वेसर्वा मेंदूच आहे. `अफलातून मेंदू` या पुस्तकात डॉ. अनिल गांधी यांनी मेंदू आणि मन यांच्या कार्याचा उलगडा करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यात मेंदूची व मनाची रचना, कार्य, विकार यांच्याविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पुस्तकाची भाषा सामान्य वाचकांना समजावी अशीच आहे. अतिसामान्य व्यक्तीसही मेंदूचे भयानक असे जन्मजात विकार टाळण्याच्या अतिशय साध्या सोप्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या प्रतिबंधक उपचारांची माहिती करून देणे, हाही लेखकाचा हेतू आहे.
* स्नेहवर्धनरिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे डॉ. प्र.न. जोशी `विज्ञानमित्र` ग्रंथ श्रेष्ठता पुरस्कार * अ.भा.म.प्र.संघ- उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१८

No Records Found
No Records Found
Keywords
#DR. ANIL GANDHI# NEURO CRIMINOLOGY# HIBERNATION #EVOLUTION OF BRAIN #BROCA’S AREA #WERNICKE’S AREA # PERIPHERAL NERVES #AUTONOMIC NERVOUS SYSTEM #SENSE ORGANS #BRAIN OF THE EMBRYO# DIET IN PREGNANCY# INTERVENTIONAL RADIOLOGY #HOLO ANENCEPHALY #HALLUCINATIONS #COLLECTIVE MEMORY #INTUTIONS #FOBIA #OBSCESSIVE COMPULSIVE DISORDER #FRIGIDITY #DEPRESSION #PSYCHALGIA #PERIOSTEUM #MIGRAINE #SNEEZING #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANILGANDHI #MANASARJANA #AFLATUNMENDU
Customer Reviews
  • Rating Starश्री . अनिल कावणेकर २४/११/२०२०

    मा. श्री. डॉ. अनिल गांधी सप्रेम नमस्कार ... आपण लिहिलेलं अफलातून मेंदू हे पुस्तक वाचले अतिशय अप्रतिम हे पुस्तक आहे. मेंदू या विषयावरील प्रथमच इतकी सखोल माहिती माझ्या वाचनात आली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक आहे पुढील लेखनास शुेच्छा नमस्कार... ...Read more

  • Rating StarDainik DivyaMarathi 7-7-15

    माणसाचं हृदय काेमल की कठाेर अशी चर्चा असते; पण, दाेन्हींचा संबंध मेंदूशीच असताे, हृदयाशी नाही. मेंदू जिवंत ताेपर्यंत मनाचेही अस्तित्व असते. काेणाच्याही मनाचा थांग लागत नाही, असा अाजपर्यंतचा समजही शासकीय संशाेधनाने फाेल ठरवला अाहे. अाता मनुष्याच्या मेदूत डाेकावणे शक्य झाले अाहे. इतकेच नव्हे, तर दुसऱ्याच्या मेंदूतील विचार समजून घेऊन त्यात बदल करण्याचीही किमया साधली अाहे. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने ब्रेन वाॅशिंग शक्य झाले अाहे. या पुस्तकात मेंदूची रचना, कार्य याखेरीज मनाचे विकार, मेंदूचे अाजार याविषयी ऊहापाेह केला अाहे. तसेच ते टाळण्यासाठी किंवा लांबवण्यासाठी व्यायाम, अाहार याविषयी माहिती दिली अाहे. मेंदू अाणि मज्जारज्जूंचे अॅनन केफॅली, हायड्राेकेफॅलस, एन केफॅलाेसील, मनिंगाेसील असे विकृती निर्माण करणारे किंवा अर्भकाचा अंत करणारे भयाण अाजार अगदी साध्या उपायाने बहुतांशी टाळता येतात. मातृत्व स्वीकारण्याचा निर्णय हाेताच त्या स्त्रीस फॉलिक अॅसिडची एक गाेळी राेज घेणे हा ताे साधा उपाय अाहे. हे सांगणे हा या पुस्तकाचा प्रमुख हेतू अाहे. विश्वाचा शाेध घेणे जितके कठीण, तितकेच कठीण या मेंदूत शिरणे. पण, वैज्ञानिक मुख्यत: मेंदूवर संशाेधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वरवर लहान दिसणाऱ्या या मेंदूचा अनेक पद्धतींनी वेध घेतला. अचपळ मन माझे-नावरे अावरिता या अाेळीचा प्रत्यय जसा माणसाला येताे, तसाच या शाेधवैमानिकांना येऊ लागला. त्या अगाध मेंदूचा हा डाॅ. अनिल गांधींनी घेतलेला वेध अाणि शाेध. अर्थातच जगभर हे हजाराे शास्त्रज्ञ या शाेधात सामील झाले अाहेत. त्यांच्या शाेधांचे हे विलक्षण वाचनीय असे विवेचन! निसर्गाच्या या अथांग मन:शक्तीचा, मेंदूचा हा अभ्यास वाचकाला विनम्र अाणि विचक्षकही करताे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 23-04-2017

    अफलातून मेंदूची रंजक माहिती... आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार करायला सुरुवात केली, तर मेंदूची कार्य पाहिली, की चक्रावून जायला होतं. अजूनही मेंदूबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नाही. जी आहे तीही मेंदूलाच मुंग्या आणणारी; पण त्याबाबत उत्सुकता-आकर्षण वाढवणारी आहे. आपल्याला अगदी लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात; पण काल-परवा घडलेल्या घटना अनेकदा आठवत नाहीत. काही वेळा तर अगदी १०-१५ मिनिटांपूर्वी घडलेली घटनाही लक्षात राहत नाही. स्मरण आणि विस्मरणाचं केंद्रही आहे आपला मेंदूच! विश्वनिर्मितीच्या शोधाचं आव्हान जेवढं अवघड, तेवढंच अवघड मेंदूच्या मुळाशी जाणं आहे. मेंदूच्या विविध कार्याची ओळख ‘अफलातून मेंदू’ या पुस्तकातून डॉ. अनिल गांधी यांनी करून दिली आहे. मेंदू व मनाची रचना, कार्य, विकार यांची सविस्तर चर्चा डॉ. गांधी यांनी आपल्या पुस्तकातून केली आहे. मेंदू हे बुद्धिमत्तेचं केंद्र आहे; पण बुद्धिमत्ता म्हणजे काय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. आधुनिक जगातला सर्वांत बुद्धिमान माणूस म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मेंदूचे तुकडे करून जतनही करण्यात आले आहेत. त्यांचा अभ्यास अजूनही शास्त्रज्ञ करत आहेत. ‘सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल समस्या समजून घेण्याची, नवीन गोष्टी पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता’ अशी व्याख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ५२ शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये केली. काहींनी यात स्मरणशक्तीचा अंतर्भाव केला. बुद्धिमत्तेचं प्रमुख नऊ प्रकारही करण्यात आले. या सगळ्याचा हेतू मेंदू समजून घेणं असाच होता. एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतरही मेंदूचं आपल्याला संपूर्ण आकलन झाल्याचं म्हणता येत नाही. मेंदूचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. तोपर्यंत झालेल्या ‘संस्कारा’च्या शिदोरीवर मेंदू आयुष्यभर काम करतो, असा दावाही संशोधकांनी आता केला आहे. संगणकासह सर्व शास्त्रीय शोधांचा जनक हा मानवी मेंदूच आहे. मानवी मेंदूतली ‘न्यूरल नेटवर्क’सारखी रचना अत्याधुनिक संगणकात केल्यानं त्याचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. भाव-भावना, अनुभवाधारित निर्णयक्षमता संगणकाला साध्य होऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी माणसाची सर त्याला येणार नाही. मानवी मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी ‘रिव्हर्स इंजिनिअिंरग’च्या पद्धतीनुसार मेंदूचा अभ्यास सुरू आहे; पण हा अभ्यासही अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपलं शरीर हे एका वाद्यवृंदासारखं आहे, असं गृहीत धरलं, तर त्याचा संचालक मेंदू आहे. संचालकाकडून चुकीच्या सूचना गेल्या किंवा संचालकाचा तोल गेला, की संपूर्ण शरीराचा तोल ढासळणारच. शारीरिक क्रियांखेरीज सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा या सर्वांचा कर्ताकरविता मेंदूच आहे. डॉ. गांधी यांनी पुस्तकाची सुरुवात ‘मेंदूवर घाला’ या विषयापासून केली आहे. आधुनिक साधनांद्वारे मेंदू ‘हॅक’ करता येऊ शकतो का, हा याचा मध्यवर्ती विषय. त्यानंतर मेंदूची रचना, एकपेशीय जिवाणूंपासून वनस्पती, प्राणी व मनुष्य यांच्या मज्जासंस्थेची उत्क्रांती, अर्भकाच्या मेंदूची वाढ अशा सर्व विषयांचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. माणसाच्या अथांग मनाचा थांग घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. त्यात लेखकानं शिक्षण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ‘वेदना सखी तू, नसे वैरिणी’, अशा विचारांतून वेदना असली, तरी ती एक संवेदना आहे, हे उत्तमरितीनं समजावून सांगितलं आहे. मेंदूच्या आजार आणि विकारांवरही सविस्तर चर्चा केली आहे. गंभीर आजारांची माहिती देत असतानाही ती कुठंही फक्त शास्त्रीय न ठेवता सर्वसामान्यांना समजू शकेल, अशा भाषेत लिहिली आहे. धर्माची निर्मिती, उत्क्रांती, मोक्ष यांच्या चर्चेबरोबरच प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्यांचे अनुभव; बौद्ध भिक्खूंच्या मेंदूचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेला अभ्यासाची माहिती देतानाच धर्म आणि शास्त्र यांची सांगड कशी घालता येते, यावर डॉ. गांधी यांनी भाष्य केले आहे. शास्त्रीय अचूक माहिती देताना ती कंटाळवाणी होणार नाही, याची दक्षता लेखकाने घेतली आहे. प्रत्येकाला आपल्या मेंदूची किमान माहिती असली पाहिजे. ती मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. वैद्यकिय सामान्यज्ञान आणि माहितीचा संगम पुस्तकात आहे. सकारात्मक जीवनशैलीसाठी अंतर्दृष्टी या पुस्तकाद्वारे जागृत व्हावी, ही अपेक्षा! -सुरेंद्र पाटसकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 09-04-2017

    मेंदू हा शरीरातला सर्वांत महत्त्वाचा भाग. या मेंदूचं अंतरंग ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल गांधी यांनी उलगडून दाखवलं आहे. अगदी गुंतागुंतीची माहितीही त्यांनी सोप्या पद्धतीनं समजावून सांगितली आहे. मेंदूची रचना, त्याचं कार्य, मज्जासंस्थेची उत्क्रांती,त्याचा एकूण शरीराशी, मनाशी संबंध, विस्मरण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता, झोप, बुद्धी अशा अनेक गोष्टींमागची गुंतागुंत डॉ. गांधी यांनी उलगडून दाखवली आहे. मनोविकार, मेंदूचे आजार, त्यांची लक्षणं, मज्जासंस्थेचे आजार यांच्याविषयीही त्यांनी विस्तारानं लिहिलं आहे. मेंदूशी संबंधित आजार अगदी साध्यासुध्या उपयांनी कसे टाळता येऊ शकतात, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more