BASED ON THE LIFE OF SAINT DNYANESHWAR, THIS NOVEL UNFOLDS THE INSPIRING SAGA OF DNYANDEV IN DEEPLY ENGAGING AND GRACEFUL PROSE. THE STORY BEGINS WITH HIS FATHER VITTHALPANT’S RETURN FROM RENUNCIATION (SANNYASA) TO HOUSEHOLDER LIFE AND THE BIRTH OF NIVRUTTI, DNYANESHWAR, SOPAN, AND MUKTABAI, TRACING THE SEVERE HARDSHIPS THE FAMILY ENDURED DUE TO THE SOCIAL BOYCOTT IMPOSED BY ORTHODOX COMMUNITIES IN APEGAON AND ALANDI. IT DEPICTS THE ULTIMATE PENANCE OF SELF-SACRIFICE UNDERTAKEN BY VITTHALPANT AND RUKMINI ON THE DECREE OF THE RELIGIOUS COUNCIL TO SECURE A PURIFICATION CERTIFICATE FOR THEIR SONS` SACRED THREAD CEREMONY, FOLLOWED BY THE HISTORIC PAITHAN ASSEMBLY WHERE DNYANESHWAR MADE A BUFFALO RECITE THE VEDAS—REVEALING THE FOUR SIBLINGS` PROFOUND SPIRITUAL STATURE TO THE WORLD. THE NARRATIVE FURTHER CHRONICLES DEFINING MIRACLES AND MILESTONES, INCLUDING DNYANESHWAR REVIVING THE DECEASED SACHCHIDANANDA, COMPOSING THE DNYANESHWARI, MUKTA BAKING MANDE ON HIS HEATED BACK, CREATING AMRUTANUBHAV, CHANGDEV PASASHTI, AND COUNTLESS ABHANGAS, AND RIDING A MOVING WALL TO GREET CHANGDEV. CULMINATING IN HIS PILGRIMAGE WITH SAINT NAMDEV, HIS REVIVAL OF THE BHAGAVATA DHARMA, AND HIS FINAL SAMADHI, THIS SYNOPSIS CAPTURES THE ESSENCE OF A TIMELESS SPIRITUAL JOURNEY.
ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची ही कादंबरी. विठ्ठलपंतांनी, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यासातून परत गृहस्थाश्रमात केलेला प्रवेश, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांचा जन्म. विठ्ठलपंतांनी संन्यासातून परत गृहस्थाश्रमात केलेलया प्रवेशामुळे आधी आपेगावातील आणि नंतर आळंदी येथील सनातनी लोकांनी त्यांच्या कुटुंबावर घातलेल्या ग्रामण्यामुळे विठ्ठलपंतांसह त्यांच्या कुटुंबाचे झालेले हाल, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान यांच्या मुंजीसाठी शुद्धिपत्र प्राप्त करण्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने (ज्ञानेश्वरांची आई) धर्मसभेच्या सांगण्यानुसार घेतलेले देहान्त प्रायश्चित्त, पैठण येथील धर्मसभेत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवल्यानंतर या चारी भावंडांची धर्मसभेसह सगळ्यांना कळलेली योग्यता ,मृत सचिदानंदांना ज्ञानेश्वरांनी जिवंत करणे , ज्ञानेश्वरी लेखन, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताने मांडे भाजणे, अमृतानुभव व चांगदेव पासष्टीची निर्मिती , ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना भिंतीसह सामोरं जाणे , अनेक अभंगांची निर्मिती , नामदेवांबरोबर ज्ञानेश्वरांनी केलेली तीर्थयात्रा, भागवत धर्माचं ज्ञानेश्वरांनी केलेलं पुनरुज्जीवन , ज्ञानेश्वरांच्या समाधीचा प्रसंग इ . घटना -प्रसंगांतून अत्यंत रसाळ आणि प्रासादिक भाषेतून उलगडलेली ज्ञानदेवांची ही जीवनगाथा आहे.