* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PUDHAKAR GHYA : PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667004
  • Edition : 11
  • Publishing Year : JUNE 2006
  • Weight : 270.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TITLE OF THE BOOK IS `PUDHAKAR GHYA` WHICH MEANS `TAKE INITATIVE`. THERE IS NO SUBSTITUTE FOR TAKING INITIATIVE. THERE MAY BE SUBSTITUTE FOR HARD WORK BUT THERE IS REALLY NO SUBSTITUTE FOR INTIATIVE. ONLY HARD WORK DOES NOT GUARANTEE SUCCESS AND THEREFORE HARD WORK IS REPLACED BY SMART WORK. HOWEVER, HARD OR SMART, WITHOUT INITIATIVE WORK IS NOT POSSIBLE. ENTIRE BOOK TALKS ABOUT TAKING INITIATIVE IN TRANSFORMING ONESELF INTO BETTER HUMAN BEING. IT CAN BE APPLIED TO ANY AGE GROUP, RELIGION PROFESSION AND QUALIFICATION. APPLICATIONS OF THIS BOOK ARE SO WIDE THAT IT MAKES NO DIFFERENCES WHETHER READER IS RURAL OR URBAN, PLUMBER OR MANAGING DIRECTOR EMPLOYED OR UNEMPLOYED/ RETIRED, WORKING WOMEN OR HOUSE WIFE, MALE OR FEMALE, MARRIED OR UNMARRIED. TEN STEPS ARE SUGGESTED FOR TAKING INTIATIVE. FIRST CHAPTER TALKS ABOUT CLEANSING OF ONE’S OWN THOUGHTS (VICHAR SHUDDHI). SECOND CHAPTER TAKES A STEP TOWARDS DISCOVERING THE PURPOSE OF ONE`S LIFE. ONLY CLEAR THOUGHTS CAN FIND OUT THE PURPOSE OF LIFE. THEREFORE, FIRST STEP IS ESSENTIAL TO UNDERSTAND THE MEANING OF THIS CHAPTER WHICH TELLS HOW TO MANAGE AND ORGANIZE THE LIFE AROUND THE PURPOSE. FOURTH CHAPTER DEALS WITH THE INTERPERSONAL RELATIONSHIPS. IT BRINGS WINING APPROACH IN INTERPERSONAL RELATIONSHIPS, CHAPTER FOUR DEALS WITH LISTENING. IT SUGGESTS THAT MOST OF US DON`T LISTEN, WE ONLY HEAR, LISTENING IS INTENT. CHAPTER SIX TELLS US ABOUT THE TEAM BUILDING AND TEAM APPROACH IN DAY-TO-DAY LIFE. CHAPTER SEVEN DEALS WITH THE HEALTH. IT SUGGESTS THAT REAL WEALTH IS HEALTH. CHAPTER EIGHT TALKS ABOUT RELAXATION AND MEDITATION FOR THE MIND. CHAPTER NINE TEACHES US SOCIAL RESPONSIBILITY AND LAST BUT NOT THE LEAST CHAPTER TEN SUGGESTS US TO BE HAPPY. IT SUGGESTS NOT TO POSTPONE HAPPINESS. ONE CAN EXPERIENCE IN PRESENT TENSE. INSTEAD OF WORKING FOR HAPPINESS, LET`S WORK OUT OF HAPPINESS.
पुढाकार घेतल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर पुढाकार घ्यावाच लागतो. परंतु पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं हेच कित्येकांना माहीत नसतं. काही मंडळींना वाटतं की, पुढाकार म्हणजे दुसयांना रेटून पुढे जाणे. परंतु आपण जर दुसऱ्यांना रेटून पुढे गेलो तर आपल्यालाही रेटणारा कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी जन्माला येतोच; त्यामुळे असला पुढाकार यश देत नाही आणि समजा दिलंच तर ते जास्त दिवस टिकत नाही आणि समजा टिकलंच तर असल्या पुढाकारानं आयुष्य तणावग्रस्त होतं. कायमस्वरूपी यश मिळवायचं असेल, मन:शांती टिकवायची असेल, तणाव कमी करायचे असतील, कंटाळवाणं आयुष्य झटकून मजेत जगायचं असेल तर ‘पुढाकार घ्या’ हे पुस्तक वाचा. त्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. हे पुस्तक तुम्हाला मित्रासारखं मार्गदर्शन करील. माझी खात्री आहे की, तुम्ही हे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचून मित्राला देऊन टाकणार नाही; तर स्वत:ची प्रत जपून संग्रही ठेवाल व दुसरी प्रत कुणा गरजूला भेट द्याल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating Starप्रा. आर. जी. लहाने

    जीवनातील सर्व आयामांला स्पर्श करणारे हे नितांत सुंदर पुस्तक आहे. आपली मांडणी सुरेख, सुबोध अशी आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भात आपले पुस्तक एक संदर्भ ग्रंथच आहे. याच मातीतील उदाहरणांचा चपखल उपयोग केला आहे.

  • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2007

    जीवन व्यवस्थापन... सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्वत:चे शरीर, मन व मेंदू कायम सज्ज ठेवावे लागतात. अफाट धावाधाव करताना स्वभावत: काही बरे-वाईट बदल घडत जातात. याबाबत सतर्क करणारे व उपयुक्त मंत्र सांगणारे पुस्तक संजीव परळीकरांनी लिहिले आहे. ‘पुढाकार घ्य : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ या पुस्तकातून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही कृतिकार्यक्रम दिले आहेत. तेही सुलभ असल्याने वाचकांना अजमावून पाहावेसे वाटतील. सवयी, लकबी, वृत्ती, प्रवृत्ती वगैरेबाबत माणसे बरीच संवेदनशील असतात. याबाबत चांगले बदल तर करावेसे वाटतात, पण नेमके ते कसे करावेत, ते समजत नाही. अशांसाठी हे पुस्तक मित्रत्वाचा सल्ला देणारे ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी मानसिकतेत बदल सुचविणारी पुस्तके गेल्या दोन दशकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निघाली. त्यात निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. हे पुस्तक स्वत: पुढाकार घेण्याचा विचार मांडते. त्यामागे वस्तुनिष्ठपणा अधिक आहे. कल्पनेतील भराऱ्या नाहीत. त्यामुळेही हे पुस्तक वाचकांना जवळचे वाटू शकेल. व्यक्तिमत्त्वातील बदलांसाठी आवश्यक असलेली विचारशुद्धी, जगण्याच्या उद्देशाची निश्चिती, दैनंदिन जीवनक्रमाचे नियोजन, भावनांना वळण लावणे, नात्यांमधली स्वत:ची जबाबदारी लक्षात आणून देणे, शांत व स्थिर मनाचे महत्त्व वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवर यात सोदाहरण विवेचन आहे. कॉर्पोरेट विश्वातली माणसे किंवा गृहिणी अथवा विद्यार्थी, अशा सर्वांनाच कार्यकुशलता व प्रभावीपणा यातला फरक उलगडून सांगायचा यात प्रयत्न आहे. पुढाकार का घ्यावा, ते सोपे की कठीण, त्यातले फायदे-तोटे कोणते, वगैरे तपशिलात समजावून सांगत लेखक नकळतपणे या संदर्भातल्या स्वाध्यायासाठी वाचकाला प्रवृत्त करतो. नोकरी मिळणे, मनासारख्या गोष्टी घडणे, कौटुंबिक कलह मिटणे व एकूणच आनंदी राहता येण्यासाठी पुढाकाराची गरज आपल्याला आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींना केव्हा, किती व कसे महत्त्व द्यायचे, याबाबत कानमंत्र या पुस्तकातून मिळतात. -निला शर्मा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-05-2007

    माणूस माणसाला भेटल्यावर प्रथमदर्शनी मनावर ठसतं ते त्याचं व्यक्तिमत्व. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्याच्या विचारातून परस्परांना होते व या विचारांची तार जुळली की नाती, मैत्री असे संबंध प्रस्थापित होतात. केवळ नात्यासाठी व्यक्तिमत्वाचा प्रभाव उपयोी पडतो असे नाही तर समाजात वावरत असताना नोकरी पेशाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी, गर्दीत व गर्दीबाहेरही आपले साथीदार असते. तेव्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपला केवळ स्वत:चाच नाही तर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियाचा पडसाद असतो. हे जाणून इनोव्हसोर्स सोल्यूशन प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव परळीकर यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र सांगणारे पुढकार घ्या हे पुस्तक लिहिले व मेहता पब्लिशिंग हाऊसने ते नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक संजीव परळीकर यांच्याशी चर्चा करताना असे जाणवले की, त्यांना मराठी तरुणाविषयी अतिशय कळकळ आहे. ते म्हणाले की कॉर्पोरेट जगात मराठी तरुण हुशार असूनही बराच मागे दिसतो. त्यांना जर काहीतरी घवघवीत मिळवायचं असेल तर त्यांना या पुस्तकातील विचार उपयोगात आणता येतील. नुसतेच तरुण नव्हे तर स्त्री, पुरुष, युवक, विद्यार्थी की ज्यांना इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे अनेक संधीपासून वंचित राहावे लागते. अशा सर्व मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. जी मंडळी अपयशामुळे खचून गेली आहेत अशा मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. ज्यांच्या नशिबाचे फासे कायम उलटेच पडत आले आहेत. अशांना या पुस्तकामुळे एक नवीन डाव मांडता येण्याची संधी मिळावी, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेले आहे. अनेक छोटे उद्योजक ज्यांना चांगले व्यवस्थापन शिकायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. समस्त होतकरू मराठी तरुणांना ताठ मानेने समाजत वावरण्याकरता हे पुस्तक लिहिलेले आहे. आपण सर्वचजण अनेक छोट्या प्रसंगात गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेतो व त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरही या नकारात्मक विचारसणीचा प्रभाव पडतो व व्यक्तिमत्त्वाचा विकास थांबतो. या समस्येला ओळखून पुढाकार घ्या, या पुस्तकात पुढाकाराची दहा सूत्रे मांडली आहेत. त्यात विचारशुद्धी, जगण्याचा उद्देश, नियोजनाची गरज, नातीगोती कशी सांभाळावी त्याचप्रमाणे दुसऱ्याचे मत, सांघिक बळ, आरोग्य, मनाची स्थिरता व शांतता, समाजाचे ऋण जाणणे व आनंदी जगणे या गोष्टीवर भर दिला आहे. व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रकार सांगताना पहिल्या सूत्रात बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्व अधिक मोलाचे आहे. हे अतिशय सोप्या भाषेत विशद केलेले आहे. या सूत्राला लेखकाने विचारशुद्धी करा असे शीर्षक दिले आहे. या विचारशुद्धीसाठी अतिशय उच्च जीवनमूल्य सुचविलेली आहेत व त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करता येईल. हेसुद्धा सांगितलेले आहे. या विचारांचा एकत्रित समुदाय म्हणजेच दृष्टिकोन व आपले दृष्टिकोन सकारात्मक का ठेवायचे व कसे ठेवायचे, यावर या पुस्तकात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. हे दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी निसर्गाने मनुष्यप्राण्याला सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती ह्या चार देणग्या दिलेल्या आहेत. व त्याचा वापर जागृतपणे करायचा, हेही उल्लेखलेले आहे. त्याचबरोबर आपल्या जगण्याचा उद्देश आपण प्रत्येकाने शोधून काढला पाहिजे, असे दुसऱ्या सूत्रात लेखक म्हणतात. तसे केल्याने आपलेच जीवन अर्थपूर्ण होईल. परंतु त्यासाठी पुढाकार हा प्रत्येकाला घ्यावा लागेल असे लेखक म्हणतात. सजगता वापरून व कल्पकता वापरून जगण्याचा उद्देश शोधायचे तंत्र यात सांगितलेले आहे. चौफेर व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी आपली कौटुंबिक भूमिका, व्यक्तिगत भूमिका व सामाजिक भूमिका यात परिस्थितीजन्य झालेल्या बदलासह स्वत:ला तपासायला सांगितले आहे तर पुस्तकाच्या तिसऱ्या सूत्रात नियोजन कसे करावे, या विषयी अत्यंत मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 31-12-2006

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र... वर्तनशैली, नेतृत्वविकास, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर अनेक कार्यशाळा घेऊन हजारो तरुणांना प्रशिक्षित करणारे संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्यूशन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यापूर्वी जीटीएल, युनाटेड कार्बन, िकोलस पिरामल वगैरे कंपन्यात त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे. कामगार म्हणून सुरुवात करून पुढे महाविद्यालयीन पदवी घेऊन सतरा वर्षात औषध उत्पादक कंपनीत असिस्टंट मॅनेजरपर्यंत त्यांनी मजल मारली. तेथे पुढे बढतीची शक्यता न दिसल्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली. ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ आणि ‘हाऊ टू स्टे वुईथ अँड विदाऊट अँगर’ या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव आहे. त्यावर आधारित कार्यशाळा घेतल्यावर त्यांनी स्वत:चीच एक व्यवस्थापनविषयक विचारधारा विकसित केली. सुखी होण्यासाठी घ्यावयाच्या पुढाकाराची दहा सूत्रे परळीकरांनी मनाशी निश्चित करून त्यांचे सविस्तर वर्णन करण्यासाठी हे पुस्तक तयार केले आहे. ‘पुढाकार घ्या’ ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ असे नाव त्यांनी त्या पुस्तकाला दिले आहे. याशिवाय ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’, ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’, ‘चार शब्द द्यावे-घ्यावे’ ही पुस्तकेही परळीकरांच्या नावावर जमा आहेत. शेकडो प्रशिक्षण वर्ग घेतल्याने हसत खेळत, विनोद आणि दृष्टांत देत आपले मुद्दे स्पष्ट करण्याचे कौशल्य परळीकरांनी आत्मसात केले आहे. या पुस्तकातही त्याचा प्रत्यय येतो. समर्पक उदाहरणाद्वारे ते आपले विचार आणि मुद्दे वाचकांना, श्रोत्यांना पटवून देण्यात कसूर करीत नाहीत. हे पुस्तक म्हणजे एक जादूचा आरसा आहे असे परळीकर म्हणतात. आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वाला पूर्ण बदलून टाकण्याची जादू या पुस्तकात आहे असा त्यांचा विश्वास आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी पुढारीपण, पुढाकार, नेतृत्व जोपसाण्यासाठी या पुस्तकात देण्यात आलेली दहा सूत्रे अशा १) विचारशुद्धी करा. २) जगण्याचा उद्देश शोधा. ३) नियोजन करा. ४) नातीगोती सांभाळा. ५) दुसऱ्यांचे ऐकून घ्या. ६) सांघिक बळ निर्माण करा. ७) आरोग्याची काळजी घ्या. ८) मन स्थिर आणि शांत ठेवा. ९) समाजाचे ऋण फेडा. १०) आनंदी जगा. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आपल्याला आपल्या अंत:करणापासून, आंतरिक व्यक्तिमत्त्वापासून आरंभ करायला हवा. चांगली फळे हवी असतील तर बी चांगले हवे. जमिनीत रूजलेल्या मुळांची देखभाल हवी. मुळाशी साठवलेले तण दूर करून योग्य प्रकारे खतपाणी हवे. आपल्या मनात, विचारात, व्यक्तिमत्त्वात अनेक पूर्वग्रह, अनेक विकृती ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यापासून मुक्त होऊन सम्यक् विचारांची जोपासना करायला हवी. तरच सम्यक आचरण शक्य आहे. आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आनुवंशिकता, कौटुंबिक स्थिती, सामाजिक, राजकीय वातावरण इ. कारण त्यासाठी देता येतात. त्यामुळे आपण अपयशाचे खापर त्यावर फोडत राहतो. परंतु असे कोणाला तरी पुढे करून आपल्या अपयशाचे वा त्रुटीचे समर्थन करणे इष्ट नाही. हे कंडिशनिंग तोडायला हवे. त्यासाठी सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती यांचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्यावर आरोप करायचा नाही, स्वत:च्या चुकांचं समर्थन करायचं नाही. संपूर्ण जबाबदारी घ्यायची, पुढाकार फक्त सकारात्मक असायला हवा, ही पथ्ये पाळली तर आपल्या विचारांमधील एकांगीपणा कमी होऊ शकेल. आपली प्रवृत्ती असेल तर आपण कणखर राहू शकता. वास्तव स्वीकारू शकता. • परिस्थिती वैतागवाणी असली तरी मी खंबीर राहीन. • मी प्रॉब्लेम सोडवण्यात हुशार आहे म्हणून मला प्रॉब्लेम सोडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. • मी यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीन. • माझ्या आयुष्यात आलेले हे कसोटीत कठीण प्रसंग इतरांच्याही आयुष्यात येऊ शकतात, आलेले असतील. • आज मला कमीपणा घ्यावा लागतो आहे, पण असा कमीपणा घ्यायलाही मनाचा मोठेपणा लागतो. • माझं मन मोठं आहे. मी आनंदाने सगळ्यांना सामावून घेत असतो. आपली भाषा ही देखील आपल्या नेतृत्वाची निदर्शक असते. सतत मन मारून जगणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सतत पडते घेतल्याने न्यूनगंड निर्माण होतो. आपण जी भाषा वापरतो ती मन मारणारी भाषा नसावी, नेतृत्वाची असावी. जबाबदारी घेणारी असावी. आपल्याला इष्ट वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा तसाच टाकाऊ गोष्टी झुगारून देण्यासाठी पुढाकारी घ्यायला हवा. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी पुढाकार घेताना इतरांना ओरबाडून टाकणे म्हणजे नेतत्व नाही. इतरांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना बरोबर घेऊन उन्नती करणे त्यासाठी सजगता, विवेकबुद्धी, इच्छाशक्ती या निसर्गदत्त देणग्यांचा पुरेपूर वापर पुढाकार घेताना करावा लागतो. नोकरी नाही, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, कुटुंबात कलह आहे, आपल्या मार्गात अडचणी येताहेत त्याबद्दल इतरांना दोष देत बसू नका. त्याबद्दल संपूर्ण जबाबदारी घ्या आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या. प्रश्न सोडवण्यासाठी पुढे पाऊल टाका. एका क्षणात प्रश्न सुटणार नाहीत. पण... प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल तर पडेल. करिअर डेव्हलपमेंट, मुलांचे संगोपन, आई-वडिलांबाबतीची कर्तव्ये, पती-पत्नी म्हणून जबाबदारी, आरोग्य संवर्धन अशा नानाविध क्षेत्रासंबंधी आपल्याला नियोजन करण्याची गरज असते. आपल्याला मिळणारा वेळ त्यात ही सर्व कामे करण्यासाठी कसरत करावी लागते, दररोज करायची कामे, आठवड्याला करायची कामे, महिन्याला करायची कामे, त्रैमासिक कामे, षण्मासिक कामे, वार्षिक कामे अशी त्यासाठी नोंद करता येईल. तातडीची कामे, गौण कामे, महत्त्वाची कामे सवडीने करायची कामे अशीही विभागणी करता येईल. घराची साफसफाई नातलगांच्या भेटीगाठी, पत्नीबरोबर शॉपिंग वा फिरणे, डायरी, पत्रलेखन, मुलांचा अभ्यास, घरात मदत, व्यायाम, स्कुटरची वा वाहनाची देखभाल, घरातील नळाची गळती थांबवणे, गॅसनोंदणी, किराणा माल खरेदी, वैद्यकिय तपासणी, डिव्हिडंड भरणे, बँकेची कामे करणे, अशी कितीतरी कामे करण्याची निकड असते. त्यासाठी वेळ काढायला लागतो. त्याचबरोबर काही दीर्घ पल्ल्याची कामे व त्यांचे नियोजनही महत्त्वाचे असते. आर्थिक गुंतवणूक, इन्कम टॅक्सने रिटर्न भरणे, वैद्यकीय तपासणी, वैयक्तिक विकास (व्यायाम, कौशल्य संपादन, प्रशिक्षण) नातेसंबंधांची जपणूक यांनाही टाईम मॅनेजमेंटमध्ये स्थान द्यायला हवे. आपले आरोग्य उत्तम असेल तरच जगातील सुखांचा, सोयींचा उत्तम प्रकारे आपण उपयोग घेऊ शकतो. शरीराची सहनशक्ती वाढवणे, लवचिकता वाढवणे आणि स्नायूंची शक्ती वाढवणे यासाठी व्यायामाची गरज असते. शारीरिक लवचिकता असेल तर स्वभावात लवचिकता आढळते. आडमुठेपणामुळे दीर्घकालीन यश लाभत नाही. मन शांत आणि स्थिर ठेवणे हे यशाचे, पुढाकाराचे नेतृत्वाचे आठवे सूत्र आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा, शवासन, विपश्यना, एकांतामध्ये मौन, पूजाप्रार्थना, लेखन यांचा उपयोग होऊ शकतो. ‘पुढाकार घ्या’ या पुस्तकातील एकूणच सर्व विवेचन या दृष्टीने तुम्हाला बळ देणारे ठरेल. जीवनाकडे सकारात्मक, जबाबदारीच्या दृष्टीने बघण्यास त्यामुळे प्रेरणा मिळेल. आपल्या यशस्वी जीवनाचा भक्कम पाया घालण्याच्या दृष्टीने योग्य ती उद्दिष्ट्ये समोर ठेवून, विवेकाने वेळेचे व नात्यांचे, कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे नियोजन करून आपल्या क्षेत्रात आपणास निकोप मनाने आणि सुदृढ शरीराने प्रगतीचा वेग टिकवता येईल अशी ग्वाही देणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.