* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: A HOUSE DIVIDED
 • Availability : Available
 • Translators : BHARATI PANDE
 • ISBN : 9789392482694
 • Edition : 1
 • Publishing Year : MAY 2022
 • Weight : 350.00 gms
 • Pages : 368
 • Language : MARATHI
 • Category : NOVEL
 • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Print Books:
A HOUSE DIVIDED, THE THIRD VOLUME OF THE TRILOGY THAT BEGAN WITH THE GOOD EARTH AND SONS, IS A POWERFUL PORTRAYAL OF CHINA IN THE MIDST OF REVOLUTION. WANG YUAN IS CAUGHT BETWEEN THE OPPOSING IDEAS OF DIFFERENT GENERATIONS. AFTER 6 YEARS ABROAD, YUAN RETURNS TO CHINA IN THE MIDDLE OF A PEASANT UPRISING. HIS COUSIN IS A CAPTAIN IN THE REVOLUTIONARY ARMY, HIS SISTER HAS SCANDALIZED THE FAMILY BY HER PREMARITAL PREGNANCY, AND HIS WARLORD FATHER CONTINUES TO CLING TO HIS TRADITIONAL IDEALS. IT IS THROUGH YUAN`S EFFORTS THAT A KIND OF PEACE IS RESTORED TO THE FAMILY.
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इाQच्छणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अहाउसडिव्हायडेड #सन्स #पिढीदरपिढी #पर्लएसबक #भारतीपांडे #अनुवादितकादंबरी #काळी #आहेकट्टरतरी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #AHOUSEDIVIDED #SONS #PIDHIDARPIDHI #PEARLS.BUCK #BHARATIPANDE #ANUVADITKADAMBARI #KALI #AAHEKATTARTARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
 • Rating Starकौशिक लेले

  “Good Earth”, “Sons”, आणि “A house divided” अशी त्रिखंडात्मक कादंबरी आहे. ह्यातल्या तिसऱ्या पुस्तकाचा “पिढी दर पिढी” हा अनुवाद आहे. पहिल्या पुस्तकात “वांग लुंग” नावाच्या एका सामान्य चिनी खेडूत शेतकऱ्याचं जीवन दाखवलं होत. तो स्वतःच्या कष्टाने आणि नशिबच्या झोक्यांनी एक प्रतिष्ठित जमीनदार होतो. आणि तिथे ती कादंबरी संपते. दुसऱ्या भागात त्याच्या मुलांच्या वेगवेगळ्या आयुष्याचं वर्णन आहे. तर ह्या तिसऱ्या भागात त्याच्या नातवांच्या आयुष्याच्या तारुण्याचा कालखंड आहे. “युआन” नावाच्या नातू हा मुख्य नायक आहे. परिस्थितीच्या आंदोलनांतून कधी इकडे तर कधी तिकडे झुकणाऱ्या; आयुष्य समजून घेऊ पाहणाऱ्या संवेदनशील युआनची ही कहाणी आहे. युआन आपल्या वडिलांबरोबर – टायगर वांग – बरोबर वाढतोय. टायगर हा सैन्य राखून सत्ता गाजवणारा स्थानिक सरदार आहे. त्याने युआन ला सैनिकी शाळेत पाठवले. पण लढाई, शस्त्र, लोकांकडून जबरदस्तीने कर वसूल करणे हे युआनच्या स्वभावातच नाही. तो संवेदनशील, थोडा स्वप्नाळू, कवी मनाचा, शेतीबद्दल अनामिक ओढ असणारा आहे. हे द्वंद्व त्याच्या आयुष्यात असताना; तो जिथे शिकतोय तिथले गुरुजी तिथल्या विद्यार्थ्यांना सरदार लोकांच्या अन्यायाविषयी सांगतायत. म्हणजे पुढे-मागे त्याला क्रांतीत सामील व्हायला लागेल आणि ते सुद्धा स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध लढायला लागेल अशी चिन्हे आहेत. दुहेरी कात्रीत सापडलेला युआन आपलं आयुष्य वेगळ्या वाटेवरून चालायचा प्रयत्न करतो. प्रत्येक टप्प्यावर त्याला दोन भिन्न मार्ग दिसतात. खेड्यात राहायचं का शहरात ? शहरातल्या परदेशी लोकांच्या सवयी चांगल्या की आपल्याच चिनी पारंपरिक सवयी चांगल्या ? क्रांती करून सत्ता उलथवून गरिबांच्या हाती सत्ता आली पाहिजे; का आळशी, स्वाभिमानशून्य, लाचार गरिबांशी आपल्याला काही घेणं देणं नाही ? हे ठरवण्यात त्याची मानसिक ओढाताण होते. परदेशात गेल्यावर त्याला तिथल्या सोयी सुविधा, लोकांची ज्ञानलालसा आकर्षक वाटते पण लोकांचा गौरेतरांकडे बघण्याचा तुच्छभाव सुद्धा जाणवतो. चीनबद्दल त्यांचं आकर्षण दिसतं तसंच चीन मधलं दारिद्र्य, अज्ञान ह्याचा फायदा घेऊन धर्मप्रसारासाठी उत्सुक लोकही दिसतात. मोकळ्याढाकळ्या वागणाऱ्या मुलींचं अप्रूपही वाटतं आणि “आपल्या चिनी घरंदाज स्त्रिया” असं वागणार नाहीत हा सूक्ष्म अभिमान सुद्धा त्याच्या मनात येतो. युआनला कुठलाही मार्ग परिपूर्ण वाटत नाही. दोन्ही मार्गांवर तो जायचा प्रयत्न करून बघतो. दोन्हीकडे त्याला थोडं समाधान मिळतं आणि दोन्हीकडे कुचंबणा. कुठल्याही एकाच एक गोष्टीचा आंधळा अभिनिवेश बाळगणाऱ्या त्याच्या भावंडांचा भ्रमनिराससुद्धा त्याला दिसतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रेम म्हणजे काय; कुठली मुलगी आपल्याला जीवनसाथी म्हणून आवडेल ह्याची पण त्याची चाचपणी सुरु आहे. वेगवेगळ्या मुलींचे वेगवेगळे अनुभव देखील तो घेतोय. सैनिकी शाळा-खेडं-शहर-परदेश-पुन्हा चीन मधलं शहर- क्रांती झाल्यावरची नवीन राजधानी असा युआनच्या आयुष्याचा मोठा कालखंड ह्यात मांडला आहे. त्याला हे वेगवेगळे अनुभव येतायत कारण त्याकाळात चीन मधली परिस्थिती सतत बदलते आहे. सरंजामशाही, युरोपियनांनी काबीज केलेली शहरं आणि कम्युनिस्ट क्रांती अश्या संघर्षाचा हा कालखंड. त्यामुळे चिनी समाजात कशी घुसळण होत होती हे ह्यातून टिपलं जातं. सामाजिक आणि वैयक्तिक विचारसरणीलाही धक्के बसत होते. पूर्वी आईवडील आपल्या मुलांची लग्न स्वतःच्या सोयीने बघत आता मुलांना ते पटत नव्हतं. मुलींना स्वयंनिर्णयाचा अधिकार पाहिजे होता. खाणं-पिणं आणि कपड्यांची स्टाईल सुद्धा परदेशी हवी असं वाटायला लागलं होत. गरीब-श्रीमंत; शहरी-खेडूत; स्थानिक-परदेशी; स्वदेशप्रेमी-परदेशप्रेमी; राजप्रेमी-क्रांतिकरी अश्या ताण्याबाण्यांनी सुंदर गुंफलेली ही कादंबरी आहे. काही प्रसंग वाचूया सैनिकी शाळा आणि आपले म्हातारे सरदार वडील ह्यांना कंटाळून युआन आपल्या मूळगावी, शेतातल्या मातीच्या घरात राहायला येतो. सरदाराचा मुलगा आलाय म्हणजे नक्कीच त्याचा काहीतरी डाव असणार असा संशय गावकऱ्यांना येतो. पण युआनच्या मनात त्यांच्या बद्दल प्रेम, कुतूहल, त्यांच्या सध्या जीवनाचा हेवा, वाईट सवयींचा राग अशा मिश्र भावना उमटतात. युआनचा चुलतभाऊ मेंग हा बंडखोर विद्यार्थ्यांच्या/तरुणांच्या गटात काम करणारा असतो. युआन ने सुद्धा त्यात सामील व्हावं; बुरसटलेल्या विचारांतून देशाला वाचवावं असा त्याचा आग्रह असतो. त्यांच्या चळवळीतली आणि एक तरुणी युआनचे वर्गमैत्रिण असते. ती युआनला लाडीगोडी लावून चळवळीत ओढायचा प्रत्यन करते. ह्या प्रयत्नांना बधून युआन गुप्त बैठकीत सामील होतो. तेव्हा परदेशात राहताना परकेपणा जाणवत असताना त्याच्यावर माया करणारे शिक्षक त्याला भेटतात. हे शिक्षक त्याला ख्रिश्चन धर्मात ओढायचा सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मुलीला हे जाणवत असत. ती धर्मबिर्म ना मानणारी नव्या विचारांची मुलगी असते. पण आईवडिलांचा मान ठेवून त्यांना थेट विरोध करत नाही. स्वदेश-परदेश; स्वधर्म-परधर्म; प्रेम-आकर्षण-मैत्री ह्या भावनिक गुंतागुंतीचा प्रत्यय. “शेंग”, “मेंग”, “आय-लान” आणि युआन ही चुलत भावंडं. शेंगला परदेश मनापासून आवडला. तिथेच राहायची, तिथलंच होऊन जायची. आनंदात, सुखासमाधानात राहायचं हे त्याचं स्वप्न. पण कुटुंबाच्या आग्रहाखातर त्याला चीन ला परत यावं लागतं. मेंग आता क्रांतीमुळे आलेल्या नव्या सरकारात मोठ्या हुद्द्यावर आहे. पण तिथेही तो नाराज आहे. युआन स्वखुशीने परत आलाय पण आयुष्यात नक्की काय करायचंय ह्याचा गोंधळ त्याच्या मनात. छानछोकीत रमणारी, एका प्रौढ माणसाशी तिसरं लग्न केलेली आय-लान. पारंपरिक विचारांचे त्यांचे आईवडील. हे सगळे एकत्र येतात तेव्हा…. “पिढी दर पिढी” आणि “अ हाऊस डिव्हायडेड” हे पुस्तकाचं शीर्षक सार्थ करणाऱ्या प्रसंगातला एक भाग “काळी” प्रमाणेच अतिशय संथ लयीत चालणारं कथानक आहे. छोटे छोटे प्रसंग आहेत. तो प्रसंग कुठे घडतोय, कसा घडतोय, पात्रांची देहबोली कशी आहे ह्याचं योग्य ते आणि योग्य तेवढंच वर्णन आहे. ह्या वर्णनातून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि लेखिकेला जे सांगायचं आहे तो भाव अधोरेखित होतो. फार सनसनाटी असं काही घडत नाही पण तरीही गोष्ट सतत नवनवीन आणि अनपेक्षित वळणं घेत राहते. पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता लागते पण ती एका रहस्य कथेसारखी नाही…म्हणजे कधी एकदा रहस्य कळून हे पूर्ण होतंय असं नाही … काहीतरी वेगळीच … लेखिके तू सांगता राहा मी ऐकत राहतोय; असा भाव मनात येतो. “काळी” वाचताना पण हेच जाणवलं होतं. साडे तीनशे पानं ही लय ठेवणाऱ्या पर्ल बक ह्यांना प्रणाम. भारती पांडे ह्यांनी ह्या “इंग्रजी हिऱ्याला मराठी सोन्याचं कोंदण” दिलं आहे. भाषांतर सहज, प्रभावी आणि प्रवाही झालाय. त्यासाठी भारती पांडे ह्यांना प्रणाम. तर हे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल “मेहता पब्लिशिंग हाऊस” ला धन्यवाद. “काळी” मधला काळ जुन्या चीन मधला होता. तो काळ आपण आत्ता अनुभवू शकत नाही. त्याचं फक्त वर्णन वाचू शकतो. त्यामुळे त्या काळाचं प्रभावी वर्णन असणारी “काळी” ही आवर्जून वाचावी अशी वाटली. “पिढी दर पिढी” मधला काळ थोडाच जुना आहे. त्यात दिसणारे सामाजिक बदल आज भारतातही आपण अनुभवतो आहोत. त्या अनुभवांवरचं ललित लेखन सुद्धा खूप होतं आहे. कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा अगदी नवीन विषय सध्या बहु-लिखित झाला आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर