N/A
मुळशी धरणावर एक भेकर जीपपुढून आडवे पळत गेले. क्षणार्धात मी बार टाकला. माझे बागाईतदार मित्र निंबाळकर जीपखाली उतरून ते भेकर घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘अरारा! भाऊसाब र्गिभणी हाये हो!`` कोथरूडला निंबाळकरांच्या बागेत आम्ही भेकर सोलत असताना पुरी वाढ झालेले पोर तिच्या पोटातून बाहेर काढलेले पाहून निंबाळकरांची म्हातारी कळवळून म्हणाली,‘‘अरं लेकरानू, का सराप घेतला रे हा!`` पण अशा प्रसंगांमुळे बंदूक टाकून मी दुर्बीण हाती घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले, तर कोणता चांगला माणूस जिवंत राहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील?