* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTAL HAWA-AMAR MEYEBELA PART 2
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITAY
  • ISBN : 9788184981070
  • Edition : 3
  • Publishing Year : 2010
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 464
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UDHAN WARA IS VILAS GITAY`S MARATHI TRANSLATION OF TASLIMA NASRIN`S BENGALI AUTOBIOGRAPHICAL BOOK "UTOL HAWA` WHICH IS THE SECOND PART OF AMAR MEYEBELA` (MAZE KUWARPAN) IN `UDHAN WARA` TASLIMA NASRIN TELLS THE STORY OF HER LIFE FROM THE AGE OF 16 TO 26. SHE WRITES ABOUT HER TEACHERS, HER DEAREST FRIEND CHANDANA, CHAKMA, SAJNI. IN LATER CHAPTERS, SHE WRITES ABOUT HER EDUCATION AT MAIMAN SINGH MEDICAL COLLEGE, HER EXPERIENCES AS A DOCTOR AND HER LITERARY ACTIVITIES. TASLIMA STARTED WRITING ARTICLES AND POETRY WHEN SHE WAS IN HIGH SCHOOL. LATER, SHE STARTED A LITTLE MAGAZINE SENJUTI`. SHE CAME IN CONTACT WITH THE POET RUDRA MOHAMMAD SHADIDAULLAH. THEY STARTED MEETING AT DIFFERENT PLACES. AT RUDRA`S INSISTENCE, TASLIMA MARRIED HIM WHEN SHE WAS JUST 19. THIS SHE DID WITHOUT INFORMING HER PARENTS. SHE STARTED GOING TO HIS PLACE. TO HER HORROR, SHE DISCOVERED, AFTER THEIR FIRST INTER COURSE, THAT HE HAD SYPHILIS. RUDRA CONFESSED THAT HE USED TO GO TO BROTHELS. TASLIMA ALSO CAUGHT SYPHILIS. THEY HAD TO TAKE INJECTIONS TO CURE THE DISEASE. LATER, SHE DISCOVERED THAT RUDRA WAS ALSO ADDICTED TO DRUGS AND SHE DIVORCED HIM. IN THIS BOOK, TASLIMA ALSO TELLS US ABOUT HER RELATIVES- HER PARENTS, HER BROTHER KAMAL & NAMAN, THEIR WIVES, HER YOUNGER SISTER YASMIN AND HER MATERNAL GRANDFATHER. TASLIMA`S STYLE IS FORTH RIGHT AND SHE ALSO SHOWS A GOOD SENSE OF HUMOUR.
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंदवेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे– हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    तसलिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा (`आमार मेयेबेला`) चा हा दुसरा भाग.या आत्मकथे मधे तुम्हाला भेटणार आहेत तिचे कुटुंबिय - वडिल डॉ.रजबअली जे एक संवेदनाशुन्य आणि कोरडे गृहस्थ आहेत,आई ईदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीहि साधी सहानुभुती नसलेली सत लक्तरा मधे वावरणारी ,मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समन व त्याची अहंमन्य दिसायला सामान्य बायको हसीना मुमताज उर्फ मुमु,त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा - कमाल ,त्याची बायको नखरेल गीता़, छोटी बहिण यास्मीन,नासरीन चा कवीमित्र रूद्र खरे नाव शहिदुल्ला अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी,दारुडा,वेश्यागमनी,गुप्तरोगी याने भावने चे प्रदर्शन करून नासरीन ची सही एका कागदावर घेउन तिला पत्नी घोषीत केलेले.तिच्याशी संबंध ठेवायच्या नादात तिलाहि गुप्तरोगाचा चटका देउन बसतो. यांतील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात ढिलेआहेत.डॉ.रजबअली ह्यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी रईसाबेगम सोबत केलेले आहे.लग्न झाल्यापासुन दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग.नासरीन ने रूद्र शी घेतलेला तलाक. अशा घडामेडीने गच्च अशी हि आत्म कथा अत्यंत वाचनीय! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 12-09-2010

    तारुण्यातला उधाण वारा… तस्लिमा नसरिनचं सारं बोलणं, लिहिणं, नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येतं. त्यामुळे साक्षात `उधाण वारा’ म्हणून लिहिलेलं लेखन बहुचर्चित झालं. यापूर्वी नसरिन यांच्या १९९९ मध्ये `आमार मेयेबेला’ या आत्मचरित्राच्या पहिल्या भागात तिच्या कौार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी चितारले. `उधाण वारा’ या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेतं. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते... पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. तस्लिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारं वर्णन! तस्लिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावं लागलं होतं. मॅट्रिक परीक्षेसाठी त्यावेळी पंधरा वर्षाची अट म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवलं. आई उदार, वडील कंजूष. वाढदिवस साजरा नाही करायचे, का तर खर्च होतो. तस्लिमानं तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हतं. झालं, आयुष्यातलं हाती आलेलं पहिलं प्रेमपत्र! अवघं एक ओळीचं `डोळे मनातील गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर’ तेही वडिलांना मिळावं, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झालं, पहारा बसला. बडोदा (मोठ्या भावाच्या) पहाऱ्यात शाळेत जाणं-येणं. मोठं अपराध्यासारखं वाटायचं. बरेच दिवस दुसरं पत्र न आल्यानं. मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तस्लिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची. प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठंही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तस्लिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रिणींवर लिहिलेला लेख `चित्राली’ मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तकं मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनानी प्रगल्भ झालेली तस्लिमा कॉलेजमध्ये असतानाच `सेंजुती’ हे काव्यास वाहिलेलं हस्तलिखित प्रकाशित करु लागली. यातून तिला `रुद्र’ भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर, नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पाडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तस्लिमाला मात्र प्रेमानं पश्चात्ताप दिला. ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचं हळवं मन इथं आहे नि कठेर संघर्षही! वैचारिक द्वंदाचा शाप घेऊन येणारं स्त्री जीवन हे आत्मकथन आपणास अनेक अर्थांनी बुचकळ्यात टाकतं; स्त्री समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी.) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाऱ्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी `वाचनीय’ प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून `विचारणीय’ ऐवज ठरते, ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे, पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही! या आत्मकथेत जीवनातील सर्व द्वंद्व भेटतात. श्रध्दा-अंधश्रध्दा, विश्वास-अविश्वास, आपपरभेद, जीवन-मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारं असल्यानं कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साऱ्या गोष्टी, काही कथा, कादंबऱ्या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमूळे. तस्लिमा नसरिनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री, स्वप्रज्ञ, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थानं `उधाण वारा’ पुरुषासाठी अप्रत्यक्षरीत्या एक `जागर कथा’ बनते. `मी काही खूप चांगला नाही, याचं कारण तुझं चांगलं असणं आहे’ ही यातील रुद्रची तस्लिामाबद्दलची कबुली म्हणजे तमाम पुरुषांच्यावतीने रुद्रनं दिलेला कबुलीजाब होय. `उधाण वारा’ ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 07-08-2010

    रोखठोक लेखणीचे दर्शन… एका मागासलेल्या समाजात मोठ्या झालेल्या युवतीने पुराणमतवादाची बंधने कशी तोडून टाकली, हे तस्लिमा नसरिन यांच्या `उधाण वारा’ या अनुवादित पुस्तकात वाचायला मिळते. तस्लिमा नासरिन या प. बंगालमधील वादग्रस्त लेखिका. `उतोलहवा’ या त्यांच्या आत्मकथनाचा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. या भागात तस्लिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. तस्लिमांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोक लेखणीचे दर्शन होते. तस्लिमा यांना त्यांच्या वडिलांनी डॉक्टर होण्यास प्रोत्साहन दिले; पण एकीकडे आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यास प्रोत्साहन देत असताना आपल्या पत्नीला मात्र मोलकरणीसारखे वागवणारे तस्लिमांचे वडील त्या ठिकाणच्या समाजप्रवृत्तीचे दर्शन घडवतात. लहानपणापासून केवळ दुसऱ्यांची मनं सांभाळणारी आई, काबाडकष्ट करत मुले मोठी झाल्यावर चार दिवस सुखाचे येतील म्हणून वाट पाहते, ते क्षण तिच्या वाट्याला येतच नाहीत. आईविषयी कळकळ वाटत असूनही तस्लिमा त्या पुराणमतवादी घरात तिच्यासाठी काही करु शकत नाहीत, याची त्यांना वाटणारी खंतही यातून जाणवते. आपल्या वडिलांच्या दोन भावांच्या, बहिणीच्या मानसिकतेतले बारकावे, जगण्याची-विचार करण्याची पध्दती, जीवनशैली पाहत तस्लिमा मोठ्या झाल्या. हिंदू मुलीशी विवाह केल्यानंतर आपल्याच घरात आसरा मागणारा लहान भाऊ जेव्हा मोठ्या शहरात जाऊन भरपूर पैसे मिळवू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल तस्लिमांनी चांगला टिपला आहे. तस्लिमांची लेखणी अगदी तरुण वयापासूनच धारदार होती. त्यांच्या सहजच लिहिलेल्या कवितांना प्रसिध्दी मिळाली. तिथून पुढे ती तळपतच राहिली. त्याच लेखणीच्या माध्यमातून तस्लिमांचा रुद्रशी झालेला परिचय, त्याच्याशी झालेला विवाह आणि काडीमोड यांचा तपशीलही यामध्ये आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.