* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SINS OF THE FATHER
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184989205
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 33 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS ONLY DAYS BEFORE BRITAIN DECLARES WAR ON GERMANY. HARRY CLIFTON, HOPING TO ESCAPE THE CONSEQUENCES OF A FAMILY SCANDAL, AND REALIZING HE CAN NEVER MARRY EMMA BARRINGTON, HAS JOINED THE MERCHANT NAVY. WHEN A GERMAN U-BOAT SINKS HIS SHIP, HARRY AND A HANDFUL OF SAILORS ARE RESCUED BY THE SS KANSAS STAR, AMONG THEM AN AMERICAN NAMED TOM BRADSHAW. THAT NIGHT, WHEN BRADSHAW DIES, HARRY SEIZES A CHANCE TO BURY HIS PAST?BY ASSUMING THE MAN`S IDENTITY.
न्यू यॉर्क १९३९. टॉम ब्रॅडशॉ याला खुनाच्या आरोपाखाली अटक होते. आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर असतो. सेफ्टन जेल्क्स हा न्यू यॉर्क मधील अत्यंत नावाजलेला वकील कोणताही मोबदला न घेता त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येतो आणि अगदी कमीत कमी शिक्षा मिळवण्याची हमी देतो. तेव्हा त्याचा हा प्रस्ताव स्वीकारण्यावाचून टॉम ब्रॅडशॉपाशी दुसरा काही पर्यायही नसतो. टॉमवर खटला चालवण्यात येऊन त्यात त्याला अपराधी ठरवण्यात येते. आणि जेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात येते, तेव्हा मात्र आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्यासमोर केवळ एकच मार्ग असतो. तो म्हणजे, आपली खरी ओळख जगापुढे उघड करणे. पण त्याला स्वत:च्या प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या एका स्त्रीला त्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून तसं कदापि न करण्याची शपथ त्याने घेतलेली असते. दरम्यान ही तरुण स्त्री, त्या दोघांच्या प्रेमातून जन्माला आलेल्या त्यांच्या बाळाला घरी ठेवून न्यू यॉर्कला येते. आपल्या बाळाच्या पित्याला कसेही करून शोधून काढून त्याच्याशी लग्न करायचे असा दृढनिश्चय तिने केलेला आहे. त्याचे समुद्रात बुडून अपघाती निधन झाल्याची ऐकीव बातमी खरी मानायला तिचे मन तयारच नाही. आपला प्रियकर जिवंत असण्याचा एकमेव पुरावा तिच्या डोळ्यासमोर आहे, तो म्हणजे एक पत्र! कधी न उघडण्यात आलेले पत्र! ब्रिस्टॉलच्या एका घरातील टेबलावर गेले वर्षभर बंद पाकिटात असलेले ते पत्र! जेफ्री आर्चर यांच्या या महाकादंबरीत जसजशी एक-एक करून कौटुंबिक रहस्यं उलगडत जातात, तशी-तशी त्या परिवाराच्या सदस्यांची निष्ठा पणाला लागते. या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महान कादंबरीकाराबरोबर आता आपल्याला सर्वांना एका प्रदीर्घ प्रवासाला निघायचे आहे. या प्रवासात तुम्हाला कुठेही ‘स्टॉप साइन्स...’ ‘वन वे रोड साइन्स...’ किंवा ‘डेड एंड साइन्स...’ आढळणार नाहीत...!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THESINSOFTHEFATHER #THESINSOFTHEFATHER #दसिन्सऑफदफादर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #JEFFREYARCHER #जेफ्रीआर्चर "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    हॅरी क्लिफ्टन काही कारणांमुळे आपली खरी ओळख लपवून टॉम ब्रॅडश्या नावाने एका जहाजावर नोकरी करीत असतो . दुर्दैवाने खऱ्या टॉमच्या हातून आपल्या सख्या भावाचा खून होतो . सेफ्टन हा टॉमचा वकील हॅरी पुढे कमी शिक्षेचा पर्याय पुढे करून आरोप स्वतःवर घ्यायला लावतो हॅरीपुढे दुसरा पर्याय नसल्याने तो हे मान्य करून तुरुंगात जातो . दरम्यान हॅरीची पत्नी आणि त्याच्या बाळाची आई त्याला शोधायला घराबाहेर पडते . हॅरीचे समुद्रात पडून निधन झाल्याची बातमी खरी मानायची तिची तयारी नाही . हातात कोणतेही धागेदोरे नसताना खऱ्या हॅरीला जगासमोर आणायचा आणि त्याच्याशी लग्न करायचे असा निश्चय करूनच ती घराबाहेर पडते .तिच्या या प्रवासात अनेक कौटुंबिक रहस्ये उलगडली जातात . पण खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा टॉम ब्रॅडश्या हा खरा हॅरी आहे हे सिद्ध होते . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more