* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: RANGDEVTA
 • Availability : Available
 • ISBN : 9788171616770
 • Edition : 4
 • Publishing Year : 1953
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 128
 • Language : MARATHI
 • Category : PLAY
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THIS IS A COMPILATION OF IMPORTANT AND FAMOUS DIALOGUES FROM THE TOPMOST DRAMAS WRITTEN BY EMINENT PERSONALITIES, RIGHT FROM ANNASAHEB KIRLOSKAR TO V. V. SHIRWADKAR. IT HELPS US TO UNDERSTAND THE PROGRESS OF MARATHI THEATER IN A BETTER WAY. TODAY, WE ALL MISS THE IMPORTANT THEATER TRIO; THE ACTOR, THE PLAY-WRITER AND THE THEATERS. TILL THE SCENARIO CHANGES TO BETTER, WE NEED TO SURVIVE ON THE PAST MEMORIES OF THEATER AND DRAMAS. THIS BOOK ALLOWS THE READERS TO TRAVEL THROUGH THE BYGONE RICH ERA OF MARATHI THEATER. IT WILL SURELY INITIATE AN INTEREST TO FURTHER STUDY THE DRAMAS IN DETAIL
कै. अण्णासाहेब किर्लोस्कर ते वि. वा. शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेच्यांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला, त्याचा अस्पष्ट आलेख या वेच्यांतून सूचित होतो. आज नट, नाटककार आणि नाट्यगृहे या नाट्यकलेच्या वैभवाला आवश्यक असलेल्या तिन्ही घटकांचे एक प्रकारचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पालटेपर्यंत मराठी रंगभूमीला जुन्या वैभवावरच जगले पाहिजे. `रंगदेवता` या ग्रंथात वाचकांना या वैभवाचे, अंशत: का होईना, दर्शन घडेल आणि या वैभवाला कारणीभूत झालेल्या निवडक नाट्यकृतींच्या समग्र अभ्यासाला ते प्रवृत्त होतील. रंगदेवता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #रंगदेवता
Customer Reviews
 • Rating StarDAINIK TARUN BHARAT MUMBAI 16-08-1998

  ज्येष्ठ नाटककाराची नाटयशैली… कादंबरीकार म्हणून अधिक प्रसिद्ध असलेले वि. स. खांडेकर समीक्षक म्हणूनही तितकेच गण्य आहेत. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास सुपरिचित आहे. त्यातून जशी त्यांची अभ्यासक वृत्ती दिसते, त्याचप्रमाणे त्यांनी संादित केलेला ‘रंगदेवता’ हा नाट्यवेच यांचा संग्रह त्यांच्यातील समिक्षकाची साक्ष पटवतो. ‘रंगदेवता’मध्ये किर्लोस्कर ते शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेचे आहेत. किर्लोस्करांचे ‘सौंभद्र’, वा. बा. केळकरांचे ‘त्राटिका’, देवलांचे ‘शारदा’, कोल्हटकरांचे ‘मूकनायक’, खाडिलकरांचे ‘सत्वपरीक्षा’, गडकऱ्यांचे ‘राजसंन्यास’, वरेरकरांचे ‘भूमिकन्या’, ‘सीता’, अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’, कणेकरांचे ‘आर्शिवाद’, आणि शिरवाडकरांचे ‘दूरचे दिवे’ या नाटकांतील वेचे ‘रंगदेवता’ मध्ये आहेत. यातील प्रत्येक नाटकाने रंगभूमी गाजवलेली आहे. अर्वाचीन वाङ्मयाच्या इतिहासात या नाटककारांना आणि त्यांच्या या नाटकांना उच्च स्थान आहे. ‘मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला त्याचा अस्पष्ट आलेख’ म्हणून या संग्रहाचा उल्लेख प्रकाशक करतात. साहजिकच इथेही खांडेकरांमधला इतिहासाचा अभ्यासक लपलेला नाही. मूळ वेच्यांचा भाग सोडला, तर प्रस्तावना आणि प्रत्येक वेच्याचा परिचय एवढा भाग खांडेकरांचा आहे. त्यामुळे जितके महत्त्वपूर्ण वेचे आहेत तितकेच महत्त्वपूर्ण खांडेकरांची समिक्षाही आहे. प्रस्तावनेत खांडेकरांमधील इतिहासांच्या अभ्यासकाला अधिक वाव मिळाला आहे. १८८० ते १९५० या काळातील नाट्यक्षेत्रातील विकासाचा आढावा प्रस्तावनेत घेतला आहे. १८८०-९० या दशकात साहित्याच्या सर्वच क्षेत्रात विकास घडत होता. साहजिकच तो नाट्यक्षेत्रातही घडत होता; काव्य, नाट्य, कादंबरी वगैरे लोकप्रिय वाङ्मयप्रकारांचा एक प्रकारचा पुनर्जन्म झाला, असे खांडेकर म्हणतात. साहित्य क्षेत्रातील ‘या काळात या सर्व वाङ्मय प्रकारांची कात गळून पडली’ असे वर्णन केले तर चुकीचे होणार नाही.’ नाट्यक्षेत्रात क्रांती घडवण्याचे श्रेय किर्लोस्करांना जाते. किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’च्या रूपाने रंगभूमीवर नवे युग सुरू झाले. पौराणिक, ऐतिहासिक कथा भागांवर आधारित नाटकांच्या जमान्यात किर्लोस्करांनीही तोच मार्ग पत्करला. त्यांच्या संगीत नाटकांनी मराठी रसिकांची मने काबीज केली. ‘सौभद्र’ने किर्लोस्करांच्या प्रतिभेचे खरेखुरे दर्शन घडते, असे खांडेकर म्हणतात. विलक्षण लोकप्रियता मिळण्यासारखे अनेक गुण या नाटकात आहेत. संस्कृत सुखान्त नाटकांच्या प्रभावामुळे किर्लोस्करांनी सुभद्राहरणाची सुखान्त प्रेमकथा ‘सौभद्र’साठी निवडली. आपल्या रसाळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी त्या कथेचा कुशलतेने विकास केला. ‘महाभारतातल्या मूळ कथेत नसलेला, पण हरिदासी कथांतून पिढ्या-न्-पिढ्या आलेला अर्जुनाच्या संन्यासंग्रहणाचा भाग नाट्यदृष्ट्या अत्यंत रसाळ व रंजक होईल, हे नाटककाराने ओळखले आणि कथेच्या विकासाला आणि विलासाला त्याचा उपयोग करून घेतला.’ याच भागाचे चित्रण ‘त्रिदंडी संन्यास’ या वेच्यात होते. प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोदनिर्मिती हे या प्रवेशाचे प्रमुख अंग आहे, या वेच्यात येणारे नणंदा-भावजयांचे संवाद सामान्याच्या घरातले वाटतात, त्यामुळे प्रेक्षक नाटकाशी समरस होतात, असे खांडेकर म्हणतात. मराठी नाटकांवर संस्कृतप्रमाणेच इंग्रजीमधील नाटकांचाही प्रभाव होता, त्यामुळे इंग्रजी नाटकांचे भाषांतर व रूपांतरेही मराठीत मोठ्या प्रमाणावर झाली. वासुदेव बळवंत केळकर यांनी शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ द श्रू’ ‘त्राटिका’ हे रूपांतर केले. या नाटकाचे मूळ पाश्चात्य आहे. याचा विसर पडायला लावणारी खुसखुशीत भाषा आणि अस्सल देशी रूप यामुळे केळकरांची कौशल्य स्पष्ट होते. ‘त्रिदंडी संन्यास’ प्रमाणेच ‘त्राटिका’ आणि ‘प्रतापराव’ हा वेचाही विनोदप्रधान आहे. त्राटिकेला वठणीवर आणण्यासाठी प्रतापरावाने केलेल्या क्ऌप्त्यांमधून ही विनोदनिर्मिती होते. या वेच्यातून विनोदाचे ‘तरल नर्तन’ दिसते, असे खांडेकर म्हणतात. किर्लोस्करांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांना खांडेकर त्या काळातले ‘मूर्धाभिषिक्त नाटककार’ म्हणतात. ‘शारदा’सारख्या नाटकाने त्यांनी सर्वस्वी स्वतंत्र विषयावरचे नाटक रंगभूमीवर आणले. गद्याइतकीच पद्याची रचनाही अर्थपूर्ण व रसाळ असणे हे देवलांच्या नाटकांचे वैशिष्ट्य ‘शारदा’मध्येही जाणवते. बालाजरठं विवाहाच्या समस्येवर आधारलेल्या या नाटकाने सामाजिक नाटकांचे युग सुरू झाले. ‘मराठी नाट्यकला समाजाभिमुख करण्याचे आणि ललितकृती लोकरंजनाबरोबर लोकशिक्षणाचेही कार्य साधू शकते. हे सिद्ध करण्याचे श्रेय ‘शारदा’ इतकेच दुसऱ्या कुठल्याही मराठी नाटकाला देता येणार नाही’, असे मत खांडेकर ठामपणे मांडतात. ‘गुडघ्याला बाशिंग बांधणारा म्हातारा’ या वेच्यात हास्यरस व करुणरस यांचे मिश्रण दिसते. मात्र दोन्ही रस एकमेकांना बांध न आणता साथ देतात, हे विशेष. इतर नऊ नाटकांविषयी विस्तृत निवेदन करणारे खांडेकर कोल्हटकरांबाबत मात्र मौन पाळतात. ‘कोल्हटकरांच्या संवादातले, विनोदातले आणि कल्पना चमत्कृतीतले बुद्धिचापल्य प्रेक्षकांना गुदगुल्या करते. पण ते त्यांची हृदये मात्र हलवू शकत नाही’ असे थोडक्यातच कोल्हटकरांबद्दल ते लिहितात. कोल्हटकरांच्या ‘मूकनायक’ मधील बहिरा प्रतिनायक हा वेचाही विनोदावर आधारित आहे. सुंदर, सूचक आणि विनोदी संवादांनीही हे नाटक भरलेले आहे. विक्रांतचे मुकेपण, केयूराचे बहिरेपण या दोन सोंगांमधून घडणारा विनोद आणि प्रतोदाने केयूराचे सोंग उघडकीस आणणे असा या वेच्यातील प्रसंग आहे. ‘शारदा’ इतकेच मराठी रंगभूमीला नवे वळण लावणारे नाटक म्हणून ‘मूकनायक’चा उल्लेख खांडेकर करतात. खाडिलकरांनी मराठी सुखान्तिकांची परंपरा झुगारून दिली. त्यांच्या व्यक्तित्त्वातील उग्रता, उत्कटता, उदात्तता, देशभक्ती, लोकजागृती हे विशेष त्यांच्या नाटकांतूनही जाणवतात. ‘सत्वपरीक्षा’ या पौराणिक नाटकातून घेतलेला ‘हे पोट फेकून दिले !’ हा वेचा खाडिलकरांचे तेजस्वी तत्त्वज्ञान आणि त्याची नाट्यपूर्ण व हृदयस्पर्शी मांडणी करण्याची त्यांची पद्धत एक चांगला नमुना आहे’, असे खांडेकर म्हणतात. हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास यांच्या कथेची पाश्र्वभूमी लक्षात घेता या वेच्याची परिणमकारकता प्रत्ययाला येते. गडकऱ्यांची आपल्या नाटकात कोल्हटकरांचे वाङ्मयगुण आणि खाडिलकरांचे नाट्यगुण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ‘राजसन्यास’ हे त्यांचे ऐकमेव ऐतिहासिक नाटक अपूर्ण राहिले. खांडेकर म्हणतात, ‘कलावंताच्या मृत्यूमुळे अपूर्ण स्थितीत राहिलेले डोंगरातले एखादे भव्य, सुंदर लेणे पाहावे, तसा भास ‘राजसंन्यास’ नाटक वाचताना होतो. ‘संभाजीच्या स्वैर पण तेजस्वी स्वभावरेखेवर ‘राजसंन्यास’ आधारलेले आहे. हिरोजी, साबाजी, येसूबाई आणि तुळशी यांच्या स्वभावाचे प्रभावी दर्शन या लहानशा वेच्यांतूनही घडवण्याचे गडकऱ्यांचे लेखणीचे सामर्थ्य जाणवल्या वाचून राहत नाही. वरेरकरांना खांडेकर ‘मराठी नाट्यसृष्टीचे शेलारमामा’ म्हणून संबोधतात. ते जितके कलावंत, तितकेच प्रचारक व समाजसुधारक. ज्या सामाजिक प्रश्नाविषयी जिव्हाळा होता. तोच त्यांच्या ‘भूमिकन्या सीता’ या पौराणिक नाटकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्रीजातीवर होणारा अन्याय त्यांनी सीतेंच्या माध्यमातून मांडला आहे. सीतात्यागाच्या प्रसंगाला शंबूक आणि उर्मिला या दोन भूमिकांची जोड देऊन नाविन्य निर्माण केलेले आहे. ते ‘प्रभू रामचंद्रांचे अग्निदिव्य’ या वेच्यातून दिसते. उर्मिलाच्या स्वाभिमानी स्त्रीमनाचे प्रभावी चित्रण यात येते. काही गंभीर स्वरूपाच्या नाटकानंतर खांडेकर पुन्हा विनोदाकडे वळले आहेत. शेक्सपिअरइतकाच मोलिएर या फ्रेंच नाटककाराच्या नाटकांनीही मराठी नाटकावर प्रभाव पडला आहे. त्याच्याच ‘ला व्हार’ या नाटकाचे अत्र्यांनी ‘कवडीचुंबक’ हे रूपांतर केले. ‘पंपूशेठ पैठणकर’ या वेच्यातून अत्र्यांच्या प्रसन्न विनोदशैलीचे प्रतिबिंब दिसते. ‘कुलवधू’कार रांगणेकरांच्या ‘आर्शिवाद’मध्ये स्त्री प्रश्नांचेच कौटुंबिक पद्धतीने केलेले चित्रण आहे. ‘पितृऋण’च्या वेच्यात मध्यमवर्गीय स्त्रीपुढे पडलेला सामाजिक पेच सहानुभूतीने चितारला आहे. ‘रंगभूमीच्या पडत्या काळात रांगणेकरांनी तिची मोलाची सेवा केली,’ असे खांडेकर म्हणतात. शिरवाडकरांची कल्पक व तेजस्वी कवीवृत्ती त्यांच्या नाटकांमधूनही तितक्याच समर्थपणे जाणवते. ‘दूरचे दिवे’ या त्यांच्या नाटकाला ऑस्कर वाइल्डच्या ‘आयडियल हजबंड’चा आधार आहे. या नाटकात धर्म आणि व्यवहार यांच्या संघर्षाचे चित्रण आधुनिक काळाला अनुरूप अशा कथानकाद्वारे केलेले आहे. विश्रामचे आधुनिक तत्त्वज्ञान. ‘पूजा ! पण कुणाची ? या वेच्यातून व्यक्त होते. प्रत्येक वेच्याच्या परिचयामध्ये खांडेकरांनी कधी सविस्तर तर कधी संक्षिप्त नाट्यपरिचय दिला आहे. त्यातून त्यांच्यातला समिक्षक प्रभावीपणे जाणवतो. विनोद, कारुण्य, नाट्य, रसात्मक अशा विविध गुणांनी नटलेले नाट्यवेचे व अभ्यासपूर्ण समीक्षा यांचा हा संग्रह अर्वाचीन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरतो, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASA : ASHI SAHASA
ASHI MANASA : ASHI SAHASA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Krishna Diwate

सुलभा प्रभुणे कोवळे दिवस, सत्तांतर, करूणाष्टके अशी अनेक पुस्तके लिहिणारे, जंगल वाटांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांची वेगळी ओळख करुन द्यायला पाहिजे असे अजिबात नाही. कॉलजच्या त्या अधाशासारख्या वाचण्याच्या वयात माडगूळकर एकदा हातातपडल्यावर आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कधी पडलो हे समजतच नाही. अतिशय बारकाईने केलेले निरिक्षण, प्रत्येक अनुभव अतिशय मनापासून घेतलेला, अतिशय साधी सरळ पण थेट हृदयाला हात घालणारी त्यांची भाषा, ह्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी अतिशय सुरेख आहेत. त्यांनीच लिहिलेले हे आणखी एक पुस्तक म्हणजे अशी माणसे : अशी साहसं. माडगूळकर स्वतः कायमच वेगळ्या वाटांनी चालत राहिले. त्यामुळे स्वतःच्या पावलांनी नव्या वाटा पाडणारे, कितीही कष्टदायक प्रवास असला तरी आपल्याला हवे ते मिळविण्याचा ध्यास घेतलेली माणसे हा त्यांच्या आवडीचा भाग. अशा अनेक लोकांची पुस्तके त्यांच्या संग्रहात असल्याने त्यांच्या वर वेळोवेळी लेख लिहिले. ते वाचकांना अतिशय भावले. त्यामुळे ही पुस्तके कुठे मिळतील? लेखकांबद्दल अधिक माहिती विचारणारे प्रश्न वाचक करत असत. तेव्हा श्री. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाचे संपादन करत होते. त्यांनी माडगूळकरांना अशा साहसी संशोधकांवर लेख लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार सामान्य वाचक, वन्य प्राण्यांवर प्रेम करणार्‍या, वेगळेच साहस करण्याची आवड असणार्‍यांना ओळख व्हावी म्हणून हे लेख लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 8 लेख आहेत. जिम कॉर्बेट, सलीम अली, जेन गुडाल, फर्ले मोवॅट, मारूती चितमपल्ली वगैरे नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पण तरीही सगळेच फक्त जंगलात हिंडणारे नाहीत. तर नाईल नदी एकट्यानेच पार करणारा कूनो स्टुबेन आहे, सिंदबादसारखा सात सफरी करणारा टिम सेव्हरिन आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचे त्यामागची कारणे वेगळी पण झपाटलेपण हे सगळ्यांमध्ये सारखॆच आहे. आपण एखादी अत्यंत अवघड गोष्ट ठरविणे आणि मग त्याचा न कंटाळा करता पाठपुरावा करणे हे सोपे नाही. ते ‘येरा गबाळ्याचे काम’ नाही. पहिला लेख टिम सेव्हरिनवरचा आहे. स्वतः आयरिश. भूगोल विषयाचा अभ्यासक, त्याने सिंदबादच्या सात सफरी वाचल्यावर ह्या गोष्टी खर्‍या आहेत का हे शोधण्यासाठी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपणही असा प्रवास करू या हे ठरविले. त्याप्रमाणे तयारीला लागला. त्यासाठी त्याने नवव्या शतकातील जहाजे कशी असत, अरबी व्यापाराचे स्वरुप काय होते हे सर्व अभ्यासायला सुरुवात केली.बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा नकाश मिळाला. एकही खिळा ना वपरता अरबी जहाजे तयार होत असत ही माहीती मिळल्यावर तो त्याच्या शॊधासाठी ओमानला गेला. बरेच निरिक्षण केले. या मध्ये बहुधा त्याची इच्छाशक्ती फार जबर असणार त्यामुळे ओमानच्या सुलतानाने ह्या त्याच्या संपूर्ण सफरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. मग तिथंपासून ते जुन्या पध्दतीने जहाज बांधणे व ते प्रत्यक्ष पाण्यात उतरवणे हा अतिशय रोमहर्षक प्रवास पुस्तकातूनच वाचायला हवा. नंतर त्या सोहर जहाजातून पुढचा केलेला प्रवास हा खरोखरच सिंदबादच्या सफरीइतकाच विलक्षण आहे. 3 नोव्हेंबर 1980 ला निघालेले जहाज 1 जुलैला 1981 ला चीनला पोहचले. ‘द सिंदबाद व्हॉयेज’ हे प्रवासवृत्तावर लिहिलेले टिम सेव्हरिनचे पुस्तक 1982 मध्ये प्रसिध्द झाले. ते मोठ्या आकाराचे व 20 पानांचे आहे. त्याचा संक्षिप्त अनुवाद म्हणजे हा पहिला लेख आहे. त्यानंतरचा लेख चिंपाझींचा अभ्यास करून पीएच.डी मिळवलेल्या जेन गुडाल बद्दल आहे. पण तिने पुढे ह्युगो ह्या छायाचित्रकाराशी लग्न केल्यावर दोघांनी मिळून टांझानियातील गोरोंगारो इथे राहून रानकुत्री, तरस, कोल्ही यांचा अभ्यास केला. त्यावर ‘इनोसंट किलर्स’ हे पुस्तक लिहिले त्याची ओळख ह्या लेखातून करून दिली आहे. त्यांनी बरोबर आपला नऊ महिन्यांचा मुलगा नेला होता. हे वाचताना आपल्याच छातीत धडधडायला लागते. दोघांनी केलेले निरिक्षण, न कंटाळता तासनतास बारकाईने पहाण्यात घालवलेले दिवस हे वाचताना तर थक्कच व्हायला होते. इतक्या लहान मुलाला सोबत घॆऊन जंगलात राह्यचे हे सुध्दा आपल्या सारख्यांना किती कठीण वाटते मग अशा कोणत्या प्रेरणांमुळे असे साहस करावेसे वाटते हे कळत नाही. पुढचा लेख ‘हरिण पारधी’ नावाचा असून तो फर्ले मोवॅट बद्दल आहे. त्याने उत्तरध्रुवाकडील ओसाड प्रदेशात केलेला प्रवास ही एक अदभूत वाटावी अशी कथा आहे. मूळ पुस्तक 1952 मधले आहे. 1935 मध्ये फर्ले जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा आपल्या काका बरोबर त्याने आर्क्टिकचा पहिला प्रवास केला होता. तेव्हा त्याने रेल्वेने जाताना अर्धामैल रुंदी असलेला आणि सुमारे तासभर संथ गतीने रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाणारा कॅरिबू हरिणांचा कळप पाहिला. त्याची आठवण त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. पण त्यानंतर 1946 मध्ये सक्तीने सैनिक म्हणून महायुध्दात सामिल व्हावे लागले, त्यामध्ये भयंकर संहार पाहिल्यावर युध्द संपल्यावर आता कुठेतरी शांत ठिकाणी जावे म्हणून तो परत 1947 मध्ये अगदी जुजबी तयारी करून हडसन बे च्या किनार्‍यावरच्या चर्चील बंदरावर रेल्वेने गेला. नंतर तिथून तो बॅरन्स येथे संशोधनासाठी गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थित तो तिथे काही काळ राहून एस्किमो लोकांचा इतिहास शिकला,त्यांची भाषा शिकला, त्यांच्या देवदेवता त्यांच्या ष्रध्दा , सुख-दुःख, त्यांच्या समस्या याबद्दल त्याने आपल्या पुस्तकात अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. ते पुस्तक म्हणजे The country of the people of the deer. पुस्तकाविषयी माडगूळकरांनी अतिशय रसाळ भाषेत, प्रेमाने लिहिले आहे. खरंतर यावर आपण ही ते मूळ पुस्तकच वाचलं पाहिजे अगदीच शक्य नसेल तर निदान व्यंकटेश माडगूळकारांनी सविस्तरपणे करून दिलेला हा परिचय तरी वाचलाच पाहिजे. ह्याच फर्ले मोवॅट बद्दल अजून दोन दिवसांनी आपण परत वाचणार आहोत. ‘हत्तींच्या कळपात’ ह्या लेखात ओरिया या विलक्षण तरूणीची कहाणी आहे. ती आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्षे राहिली. टांझानियातील मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जिथे 450 हत्ती, सिंह, मस्तवाल रानरेडे, म्हशी होत्या विषारी सर्प होते अशा ठिकाणी राहिली तिथेच जोडीदार मिळाला, ती आईही झाली. ह्या सगळ्या जगावेगळ्या अनुभवांचे चित्रण तिने आपल्या वाचकांसाठी केले आहे. तिचे अनुभव वाचता वाचताना आपल्या तोंडाचा विस्फारलेला ‘आ’ खरोखरच मिटत नाही. कशी ही जगावेगळी माणसे असतील!! दोन तीन महिन्याच्या लहान बाळाला पाठीला बांधून हिंडणारी, अनेक प्राणी सहजपणे पाळणारी, हत्तींबद्दल अतिशय प्रेम असणारी, त्यांच्यांशी मैत्री करणारी अशी तिची विलक्षण रुपे म्हणजे थक्क करणारी आहेत. हे जोडपे तिथे पाच वर्षे हत्ती सोबत राहिले. हत्तींचा सखॊल अभ्यास केला, शंभरहून अधिक हत्तींशी मैत्री केली. अनेक चित्तथरारक अनुभवांना सामोरे गेले. वाचताना तो थरार आपल्याला केवळ शब्दांतून ही जाणवतो. जिम कॉर्बेट् या धाडशी शिकार्‍यावर माडगूळकरांनी लिहिलेला लेख तर अप्रतिम आहे. जिम कॉर्बेट् च्या पुस्तकातून म्हणजे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं, मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, माय इंडीया अशा अनेक पुस्तकातून आपल्याला त्याचा परिचय तर झालेला आहेच. जिम कॉर्बेट् हा निष्णात शिकारी असूनही सहृदय होता. शेवटपर्यंत तो एकटाच राहिला, तो कधीच पोशाखी बनला नाही, तो अक्षरशः आदिवासींसारखेच आयुष्य जगला. अतिशय काटक असलेला जिम निरिक्षण करण्यात निष्णात होता, तो जंगलात असताना कोणत्याही डबक्यातील पाणी न शंका बाळगता पीत असे. लेखक म्हणून जागतिक कीर्ती मिळवून दिलेली त्याची पुस्तके त्याने केवळ स्मरणावर लिहिली आहेत. त्याने कधीच त्याच्यासाठी डायरी ठेवून त्याच्या नोंदी केल्या नाहीत. आपल्या हयातीत त्याने एकूण पंचेचाळीस नरभक्षक वाघ मारल्याची नोंद आहे. कुमाऊ आणि गढवाल इथल्य़ा लाखो लोकांची त्याने मरणाच्या भयानक भीतीपासून सुटका केली. पण असे असले तरी जंगलाला आग लावणे, पाण्यावर बसून शिकार करणे, कारण नसताना जनावर मारणे या गोष्टीचा त्याला अतिशय राग होता. तो शिकारी असला तरीही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही इतकीच शिकार करणारा, नियम पाळणारा शिकारी होता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा ठिकाणी तो जंगलावर व्याख्याने देत असे. त्यामध्ये तो जंगलातील जनावरे कोणता आवाज काढून एकमेकांशी बोलतात, वाघ उठला की पाखरं कसे इशारे देतात ह्याचे प्रात्यक्षिक तो दाखवे. वाघ झाडाझुडूपात दिसेनासा होताना त्याचे आवाज कसे बदलत जातात हे तो दाखवत असे. पण व्याख्यानाच्या शॆवटी वने, आणि त्यातील जीव यांचा संभाळ करणे आपल्या सगळ्याच्या हिताचे आहे हे तो आवर्जून सांगत असे. तराईतील प्राण्यांची, पक्ष्यांची छायाचित्रे त्याने काढली आहेत. तोंडाने आवाज काढून वाघाला जवळ बोलावायचे विलक्षण कसब त्याच्याकडॆ होते. 1955 मध्ये प्रसिध्द झालेले ‘ट्री टॉप्स’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. पुस्तकाच्या शेवटी पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि मारूती चितमपल्ली यांच्या वरचे दोन छोटे लेख आहेत. सगळेच लेख आपल्याला भारावून टाकणारे. कोणत्या मूशीतून अशी माणसे जन्माला येत असतील. अशी कोणती प्रेरणा असेल की ज्यामुळे ती असे आपल्या दृष्टीने वेडे साहस करायला धजत असतात, आपल्या सारख्यांना हे कळणं ही कठीण आहे आणि जरी कळले तरी आपली रोजची रुळलेली वाट सोडून आपण अशा अनवट वाटांवर जायला तयार तरी होऊ का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्कीच तयार होतात हीच त्या पुस्तकाची ताकद आहे असे मला वाटते. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
वाचक

🚩शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩 महासम्राट या सिरीज मधील खंड पहिला झंजावात आज वाचून पूर्ण झाला. विश्वास पाटील यांचे संभाजी वाचले होते तेव्हा मला वाटून गेले होते की याच लेखकांनी शिवरायांबद्दल पण लिहिले पाहिजे. मध्यंतरी ही जेव्हा बातमी कळली तव्हा खूप आनंद झाला. छत्रपती शिवरायांवरील अशा मालिकेची मराठीत नितांत आवश्यकता होतीच. पुस्तक सुरू होते ते थोरले महाराज शहाजीराजे यांच्या घोडदौडीपासून. अधे-मध्ये भोसले परिवाराचा इतिहास सुद्धा अनुभवायला मिळतो. दख्खन मध्ये वावरत असणाऱ्या जुलमी परकीय सत्ता त्यांनी ,माजवलेला हल्लकल्लोळ शहाजी महाराज यांची धावपळ येणारे कठीण प्रसंग यानंतर वाचक प्रवेश करतो तो छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात. प्रतिकूल परिस्थितीत झालेला जन्म बंगलोर मधील दिवस पुण्यातील दिवस स्वराज्य स्थापना लोकप्रशासन. उत्तम करव्यवस्था सैनिकांचे प्रशिक्षण या बाबी हायलाईट केलेल्या आहेतच शिवाय पाठ्यपुस्तकातून वगळलेले अनेक प्रसंग संदर्भ या पुस्तकात वाचायला मिळतात पुरंदर बद्दलचे वेगळे संदर्भ त्यांचे महत्त्व जावळीचे प्रकरण आणि पुस्तकाचा शेवट होतो तो अफजलखानाचा वध या प्रकरणाशी. यानंतर आता याच सिरीजचा दुसरा खंड Rankhaindal वाचणार आहे. ऐतिहासिक पात्रे त्यांचे वर्णन आजूबाजूचा परिसर आणि घटना लेखकांनी जिवंत केल्या आहेत. त्यामुळे इतिहासाचा रियल आस्वाद घ्यायची संधी मिळते ...Read more