* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SAVALI UNHACHI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177661095
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 68
 • Language : MARATHI
 • Category : PLAY
 • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THE BOND OF WEDLOCK IS LIKE THE WELDING THAT BINDS TWO PLATES OF STEEL TOGETHER. AS A RESULT, TWO BEINGS BECOME STRONGER. LIFE GOES ON RELENTLESSLY. IT DOES NOT PAUSE FOR ANYBODY. CHILDREN GROW UP. WE LOSE THE COMPANY OF OUR FRIENDS; WE EXPERIENCE TIMES OF HAPPINESS AS WELL AS SORROW. BUT THROUGH ALL THESE UPHEAVALS THE COUPLE IS ALWAYS WITH EACH OTHER, ENJOYING THE PLEASURES OF THIS BOND. IT IS HERE THAT WE CAN EXPERIENCE HEAVEN ON EARTH. WHEREVER THERE IS SUCH ONENESS, WEDDED LIFE REMAINS UNSCATHED DESPITE THE CONFLICTS OR UPHEAVALS IN THE WORLD AT LARGE, JUST LIKE THE PHOENIX THAT RISES FROM THE ASHES. IF YOU CAN ACQUIRE THIS STRENGTH, YOU CAN LET THE WORLD BE. YOU CAN SMILE AT CRITICISMS. AS LONG AS YOU ARE SURE THAT THERE IS SOMEONE FIRMLY BACKING YOU, THERE IS NO REASON TO FEAR ANYTHING, UNDERSTAND?’
‘...ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. ते दोन जीव अधिक सामथ्र्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं. जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं. मुलंबाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते. अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत असताना तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता. ख-या अर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो. ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो. राखेतून जन्म घेणाया फिनिक्स पक्ष्यासारखा. ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता. निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल, तोवर कशालाही भिण्याची गरज नाही, कळलं?’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAKAL 08-09-2002

  वाचनीय नाटक... (कै) रणजित देसाई यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी हे २ अंकी, त्यांनी लिहिलेलं नाटक पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालं आहे. ‘सावली उन्हाची’ या नाटकाचं कथानक जगावेगळं आहे. रवी चित्रे हे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांना पिंकी नावाची सात-आठवर्षांची मुलगी आहे. पण तिची आई या अर्भकाचं तोंड न पाहताच प्रसूतीच्या वेळी गेलेली आहे. डॉ. चित्रेंची आई हृदयरोगाने आजारी. तिला दोन अ‍ॅटॅक येऊन गेलेले. आपल्या ‘ताई’नं सूनमुख बघावं व मुलाचा संसार सुरळीत चालू व्हावा म्हणून डॉ. चित्रे यांचे मामा प्रयत्न करून शुभदाशी त्याचं लग्न ठरवतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नाटकाच्या कथाबीजाची निर्मिती होते. शुभदा डॉ. रवीला आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही. तिचं लग्नापूर्वी सारंग भोसले तशा बेरोजगार असलेल्या तरुणावर प्रेम असतं. तिनं मनानं त्याला वरलेलं असतं. डॉ. रवी चित्रे मानसोपचार तज्ज्ञ असल्यानं तिच्या भावविश्वाचा आब ठेवून शुभदाला स्पर्श न करण्याचं वचन देतात. आईच्या आजारपणात आपण दोघे मात्र सुखी पती-पत्नी आहोत, हे नाटक वठवायचं असं रवी ठरवतो. शुभदा आईची-सासूची मनापासून सेवा करते. पिंकीचं व तिचं छान जमतं. एकटा पडलेला असतो तो रवी. आईचा महिन्यानंतर समाधानानं जीव जातो. रवीला वाटतं शुभदा सोडून जाणार. लहानपणापासून ज्यानं सांभाळलं, शिकवलं तो मामाही ताईच्या मृत्यूनंतर कोकणात जातो. एकाकी अवस्थेत कसं राहायचं... डॉ. चित्रे एक वेगळाच प्लॅन करतो. तोपर्यंत बी. सारंग नावाने चित्रपटसृष्टीत स्टोरीरायटर म्हणून खूप खूप प्रसिद्धी पावलेला पण त्यामुळेच दारू व मदिराक्षी यांच्या विळख्यात अहोरात्र गुरफटलेल्या या व्यक्तीला डॉ. भेटतात... स्वत:ला पिक्चर काढायचं म्हणून सांगतात. त्यामुळे पुढे सारंग त्याच्या घरी येतो. शुभदाची त्याची भेट होते. डॉक्टर शुभदा त्याला ‘द्यायला’ निघतात. सारंग भारतीय संस्कृतीचं तत्त्वज्ञान सांगतो... शेवटी हिमालयाएवढा उंच व गंगेसारखा पवित्र असा हा आपला जगावेगळा पती... त्याच्याशी शुभदाचं पत्नीचं नातं त्या रात्री निर्माण होतं. असं हे आनंदपर्यवसानी दोन अंकी नाटक. एक सुखात्मिका. आता वास्तवाशी अशा आदर्श डॉ. पतीचं व्यक्तिरेखाटन कितपत योग्य? शुभदाचं मनोमीलन जुळण्यासाठी सारंगला नियोजन करून घरी आणणं इत्यादी. अनेक प्रश्न तसे अनुत्तरित आहेत पण असंही घडू शकतं. नियमाला अपवाद म्हणून. सारंग शुभदा भेटीत सारंग आपल्या जीवनाला (स्वैराचारी व स्वच्छंदी) रांगोळीची उपमा देतो. पहिली रांगोळी पुसल्यावरच दुसऱ्या दिवशीची रांगोळी काढावी लागते. आता मी कुठेही न गुंतता फक्त रांगोळीच काढत राहिलो आहे... ही प्रतिमा अर्थपूर्ण आहे. मात्र सारंगच्या तोंडी भारतीय संस्कृतीवरचं भाष्य... ‘कोणताही पुरुष (कोणत्याही पंथाचा व धर्माचा) जेव्हा विवाह करतो तो आयुष्याशी अखंड सोबत म्हणून... माझा शुभदाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही...’ प्रेक्षकांना त्याच्या आधीच्या स्वैर वर्तनाच्या पार्श्वभूमीवर पटणारं वाटत नाही. शेवटी डॉ. रवी चित्रे लग्नगाठ ही दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते असं म्हणतो आणि ‘उन्हाच्या सावलीत’ कुणाचा तरी भक्कम आधार असल्याशिवाय जगात कुणाला भिण्याची गरज नाही असं शुभदाला सांगतो... हे भाष्य नाटकाचं शीर्षक मार्मिकपण सिद्ध करतं. मात्र नाटकातील संघर्ष वेगळा असला तरी तो यथार्थ वाटत नाही. शुभदाचं वागणं हे तर्कापलीकडचं वाटतं. कदाचित म्हणूनही या नाटकाचे प्रयोग झाले नसतील. एका मानसोपचार तज्ज्ञाचीदेखील एक विचित्र मानसिक अवस्था कशी होते व त्यातून कोणत्या रीतीनं तो बाहेर पडतो हे वाचणं मनोज्ञ आहे हे निश्चित. संवाद, भाष्य, तत्त्वज्ञान इत्यादीमधील भाषा सहजसुंदर आहे. वाचनीय नाटक म्हणून ते मनाचा ठाव घेतं. -भावना भार्गवे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Sham V. Kendre

हा ग्रंथ वाचण्याची उत्सुकता आहे

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star
महाराष्ट्र टाइम्स १७ जुलै २०२२

हलक्याफुलक्या आणि तरीही गंभीरपणे काही सांगू पाहणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी एका कथेचे नाव संग्रहाला दिले आहे. या कथांच्या नावांमधूनच लक्षात येईल, की त्यात जपान, मॅनहॅटन, पॅरिस, नायजेरिया, टोकियो, हॉलंड आणि अर्थातच झांजीबार येथील परिसराचा ेरफटका असणार आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे. ...Read more