* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANVADINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613045
  • Edition : 11
  • Publishing Year : FEBRUARY 1983
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I REACH HOME AT 11 IN THE NIGHT; URMILA GREETS ME IN THE MOST SIMPLE STYLE AND SAYS, "OH! HOW TIRED YOU ARE`. THIS IS WHAT KEEPS ME GOING. HER WORDS AND GESTURE MAKE ME FORGET MY TIREDNESS THROUGHOUT THE DAY. I GET MORE ENERGETIC. I CANNOT TELL YOU HOW IMPORTANT THIS SIMPLE SENTENCE IS. WHEN YOUR WIFE IS VERY MUCH TIRED AFTER COOKING A LARGE MEAL FOR MANY GUESTS SHE ALSO NEEDS ONLY ONE SENTENCE FROM HER HUSBAND, JUST LIKE THE HUSBAND WHO RETURNS HOME AFTER A VERY BUSY AND ESPECIALLY TIRING DAY. WE HAVE PROBLEMS, WE TRY TO FIND OUT THE ANSWERS SOMEWHERE ELSE, BUT CANNOT FIND IT. THE ANSWER LIES WITHIN US. THE SECOND SIDE OF THE PROBLEM IS ACTUALLY THE ANSWER, WE JUST NEED TO REVERSE OUR DIRECTION. WHY IS THAT EACH AND EVERY STORY BY VA PU IMPRESSES US EQUALLY? WHAT IS SO SPECIAL ABOUT IT? THE ANSWER IS SIMPLE. VA PU SEES THE THINGS WHICH WE FAIL TO SEE, HE EXPERIENCES IN A WAY WE NEVER THINK. THE SORROWS, HAPPINESS, MOMENTS OF PAIN AND JOY, THE STRUGGLE IN THE BUSY SCHEDULE DAY AFTER DAY, THE VARIOUS DILEMMAS AT THE JOB, THE PREDICAMENTS, THE PROBLEMS IN SEX LIFE, EGO, INSULTS AND MANY SUCH THINGS KEEP ON HAPPENING ALL AROUND US. BUT IT TAKES A VERY SENSITIVE MIND LIKE VA PU`S TO SENSE ALL THIS, TO GO THROUGH IT AS IF OUR OWN, TO PUT IT DOWN IN WORDS, AND TO PRESENT THE BEST PICTURE BEFORE US. HE FINDS SOME SORT OF POSITIVE APPROACH IN EACH PROBLEM. HE WIDENS OUR HORIZONS, HE MAKES US MORE SANGUINE TOWARDS LIFE, HE IS THE FRIEND, GUIDE AND PHILOSOPHER IN EVERYONE`S LIFE. HE HAS OPTED A SPECIAL STYLE FOR THE DIALOGUES IN THIS PRESENT BOOK `SANVADINI`, AS THE NAME SUGGESTS.
जीवनातले ताणतणाव, मानअपमान – जे एरवी कुणाच्या लक्षातही येत नाही, ते सगळं वपुंच्या मनाला भिडतं. वपु ते अलगद टिपतात आणि आपल्या सहज मिस्कील शैलीत वाचकांच्या मनात उतरवतात ! त्यांची जीवनदृष्टीच इतकी आशावादी, प्रसन्न आणि मिस्कील आहे, की त्या रंगांत रंगूनच त्यांच्या अनुभवाचा प्रत्येक क्षण चैतन्यानं खुलतो ! ‘संवादिनी’मध्ये तर संवादांतून कथा फुलवणारी त्यांची शैली वाचकाला थक्क करते !—

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarSuhas Deshmukh

    स्त्री-पुरुष आणि रिलेशनशीप्सला हात घालावा तर वपुंनीच! त्यामुळे त्यांच्या पलीकडं मराठीत तर किमान मला आजवर जाता नाही आलं... :)

  • Rating Starप्रभा जोग

    देखण्या, बोलक्या कथांची ‘संवादिनी’... ‘संवादिनी’ हा वसंत पुरुषोत्तम काळे यांचा कथासंग्रह. या संग्रहातील सर्व कथा पूर्वी निरनिराळ्या मासिकांतून येऊन गेलेल्या आहेत. पण त्याच कथांवर त्यांनी नवा प्रयोग केला. फक्त संवाद माध्यमातून ह्या कथा लिहिल्या आहेत.याचं कारण देतांना लेखक सांगतात की ‘मनांतले विचार व्यक्त करताना आपण संवाद वापरतो आणि घडून गेलेली घटना सांगतानाही आपण संवादच वापरतो. समोरच्या माणसाला रोखण्याचा प्रयत्न होतो तो संवादातूनच, म्हणून संवादच वापरून कथा लिहिण्याचा प्रयत्न. एखादी रुपवती स्त्री एकदाच दागिना घालून कशी सुरेख दिसते. तसंच झालंय इथे. मुळांत निवडलेल्या कथा उत्तम, आणि संवाद हे माध्यम. एखाद्या तन्मणीसारखे शोभले आहे, अत्यंत संतोषाची गोष्ट म्हणजे हा प्रयोग शंभर टक्के सफल झाला आहे. केवळ संवादांतून मनोव्यथा, मनोविश्लेषण, वातावरणनिर्मिती हे साधले आहे आणि सर्व कथा मनांवर ठसून जातात. सर्व कथांचे विषय निरनिराळे आहेत. पण ते आपल्या नेहमीच्याच जीवनांतील असल्याने आपण चटकन त्यांत शिरतो. लेखकाचे काही विचार नि:संशय धाडसी आहेत. पण व्यवहारीही आहेत असे विचार वरचेवर बोलून दाखवले गेले पाहिजेत म्हणजे ते मवाळ होतील, त्यांतील लाज वाटणारी भयकथा निघून जाईल. ‘निरंजन, मला उत्तर हवय् या कथेत पत्नीपासून मूल होणार नाही म्हणून दु:खी झालेल्या पत्नीला पति ट्यूबबेबीचा प्रयोग करण्याची संधि देतो, नव्हे तशी इच्छा व्यक्त करतो. पहिल्यांदा ह्याला नकार देणारी. त्याची पत्नी आपल्या प्रथम प्रियकरांपासून हवे ते मिळवते. पण माणसाच्या त्यागाची, मोठ्या मनाची कल्पना असलेला तो प्रियकर तिला ब्लॅकमेल करून तिच्या कडून पैसा उकळण्याचे ठरवतो. पण हा पति श्रीधर उलटेच करतो. त्यांचे पितृवात्सल्य हेलावते. आणि मग पत्नी प्रियकराला विचारते, ‘निरंजन, मला उत्तर हवय्, आता तू काय ठरवलस्’’ फार मोठ्या मनाचा माणूस पाहिजे ह्याला. पण असे झाले तर काही चांगले, दुष्ट लागण्यासारखे संसार तरीच देखणे राहतील. काळ्यांच्या संवादांत अत्यंत घरगुतीपणा आहे. आहे त्याच संसारात माणूस किती सुखी होऊ शकतो. पण समज नसते काही वेळा, काही वेळा परिस्थिती माणसाला सुख् लाभू देत नाही. ‘धरलं तर चावतं’ ह्या कथेत दोघही नवराबायको मिळवती, आर्थिक स्वास्थ्य भरपूर– ह्या सदैव नोकरीसाठी बाहेर असणाऱ्या स्त्रीला तिच्या स्वत:च्याच मुलांच्या मनांत अजिबात स्थान नसते. तिच्यावाचून त्यांचं काहीही अडत नाही. हे मोठे दु:ख परिस्थितीने निर्माण केले आहे. ‘‘शिक्षण घेतलेल्या बायका प्रकाशासारख्या पसरल्या त्या जिथे तिथे शिरल्या त्यांना आता पुन्हा घराकडे कसे वळवायचे हे सांगता येणार नाही. गंमत म्हणजे जे प्रश्न निर्माण झाले ते माणसाच्या चांगुलपणातून त्यामुळे दोषही देतां येत नाही.’’ विनोदाचा झरा काळ्यांच्या कथेत एक विनोदाचा झुळझुळता झरा असतो. तो कलावृत्तीसारखा चमकतो. त्यामुळे ह्या कथा जिवंत आहेत. कथा जणू नागाने वेटोळे सोडावं तशा सरसर उलगडत जातात. निवेदन नाही, वर्णन नाही हे जाणवत नाही. ‘आत्मानस्तु कामाय’ ही कथा सर्वांत उजवी आहे. एका स्वाभिमानी परंतु तितक्याच हळव्या, प्रेमळ नार्वेकरची ही कथा. मुलाप्रमाणे त्याला वाढवले, प्रेम केले शिकवले, तोच मुलगा, त्यांच्याच ऑफिसातील कलांतराने नार्वेकरांचा बॉस म्हणून त्यांच्याच ऑफिसांत येतो. बॉसने बॉससारखेच वागले पाहिजे. त्याच्या गुणांवर तो बॉस झाला आहे. त्याने माझ्यापुढे नग्न होता कामा नये. असे नार्वेकरांचं म्हणणे. पण वर्तकांवर फार उपकाराचं ओझ असतं. दोघांची अतिशय कुतरओढ, नार्वेकर स्वत:च्या नोकरीचा राजीनामा देतात. पण नंतरच्या काळात बायकोबाबत त्यांची फार फसगत होते. फार वाईट अनुभव येतो. केवळ शब्दांची सहानुभूती तर राहोच, पण नार्वेकर वैवाहिक सुखालासुद्धा बायकोच्या दृष्टीकोनांतून अपात्र ठरतात. हा अपमान सहनशीलपलीकडचा असतो. नार्वेकर म्हणतात, प्रेमात पडण्याचा जसा एकच क्षण असतो. तसा एकाबद्दल उबग आणावलाही एकच क्षण पुरतो.’’ अशा तऱ्हेच्या या कथा आहेत. दिवस उद्याचा भविष्याबद्दल सतत काळजी करणारा, विचारणारा नवरा आणि आजचं सुख आज मिळवावं, उद्याचं दु:ख पाहून आज कशाला दु:खी व्हायचं’ अशा विचाराची बायको ह्यांची ही कथा. चार चाकाच्या वाहानांपासून भय असे भविष्य आणि अखेर खेळण्यातल्या मोटारीवर पाय पडून घरात होणारा अपघात हा शेवट सुंदर आहे. ‘नव्या युगातले शोध हे कल्पवृक्षासारखे आहेत, आपण त्याचा डोळसपणाने स्वीकार करायला हवा’’ हा विचार कृतीत आणण्याजोगा आहे. ‘‘एकदां, बायको रागावली प्रथम, तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकांत गेली. ती मस्तकांतच राहिली. अशी काही वाक्ये आपल्याला खुदकन् हंसायलाच लावतात. एकदम देखण्या व बोलक्या कथांची ही ‘संवादिनी’ सर्वांना प्रिय होईल अशी खात्री द्यायला हरकत नाही. ...Read more

  • Rating StarVISHAL SAHYADRI 20-02-1983

    विलक्षण प्रभावी कथा, संवादांनी विखुरलेली... आटोपशीर प्रवाही कथा वसंत पुरुषोत्तम काळे एक प्रसिद्ध कथाकार... त्यापेक्षाही उत्तम कथाकथनकार म्हणून मराठी साहित्य जगतात दिमाखाने मर्दुमकी गाजवीत आहेत. कथा क्षेत्रात काहीतरी नवे हवे असे त्यांना वाटते! केवळ ्रयोग म्हणून त्यांनी हे सहा कथांचे नाविन्यपूर्ण पुस्तक काढायचे ठरविले. १९६५ साली काळ्यांनी केवळ संवादमय एक कथा लिहिली. कथा लघुकथा ह्या फॉर्मचा त्यांना कंटाळा आला. कथेचा तोच तोच पण उबग आणणारा वाटला. तीच ती वर्णनं, बारीक बारीक तपशील, भरण्याला व. पु. काळे कंटाळून गेले. त्या कंटाळ्यातूनच कथेच्या एका नवीन स्वरुपाचा उदय झाला. मनातले विचार व्यक्त करताना आपण संवाद वापरतो आणि घडून गेलेली घटना सांगतानाही आपण संवादच वापरतो. समोरच्या माणसाच्या संवादातूनच आपण त्याला जोखण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो... आणि म्हणूनच फक्त संवादाच्या माध्यमातूनच कथा पुढे पुढे सरकवायची अशी ही कल्पना. तसा हा एकदम नवीन विचार नाही. कथेत बऱ्याच वेळा संवाद पेरलेले असतातच. पण इतर बारीक सारीक तपशीलाला इथे संपूर्ण मज्जाव आहे. त्या दृष्टीनेच पुस्तकाचे नाव ‘‘संवादिनी’’ समर्पक वाटते. नॅरेशनच्या कंटाळ्यातूनच ह्या संवादिनी कथा बाहेर पडल्या. १९७०च्या स्त्रीच्या दिवाळी अंकात एका मिठीची कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर काळ्यांनी सत्तर सालच्या दिवाळी अंकात पाच कथा पुन: एकदा संवादावर भर देऊन लिहिल्या. संवादामुळे कथा एकदम आटोपशीर होते. कथाप्रवाह जोराने वाहतो. ह्या संग्रहातील सहाही कथा अत्यंत दर्जेदार अशाच आहेत. ‘एका मिठीची कथा’, ‘आज तरी भांडशील ना,’ ‘‘निरंजन मला उत्तर हवंय!’ आणि ‘दिवस उद्याचा’ ह्या सहा कथा! संपूर्ण संवादाच्या आधाराने पुढे पुढे चालणाऱ्या इतकेच काय पण पुस्तकांची प्रस्तावना ही संवादानेच नटलली आहे. एका मिठीची कथा एका मिठीची कथा... ह्या संवादामधील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण कथा! छोट्या पंपूपासून... मिठी आणि मुके... ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे जोडपे... पंपूने कोणत्या प्रकारचा सिनेमा पाहिला ह्यावरून उद्विग्न होतात... आणि शेवटी त्यांना सिनेमाचा फ्लॉट कळतो. अगदी साधी स्टोरी नऊ वर्षांच्या मुलीची एक बाहुली सापडावी म्हणून काय काय करते, कुठे कुठे शोधते त्याचं पिक्चर शेवटी ती बाहुली सापडते. ती मुलगी बाहुलीला मिठी मारते... भराभरा मुके घेत राहते... इथे पिक्चर संपते! ...व संवादांनी नटलेली कथा येथेच संपते! समर्थ लेखणीची ऐट काळ्यांच्या इतर कथाही अशाच वरच्या... आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समजाबद्दल आहेत. त्यांच्या कथानायिका ना. सी. फडके यांच्या नायिकाच्या सारख्याच वाटतात! ‘धरलं तर चावतं’ ...ही कथा नोकरी करणाऱ्या बायकी बद्दलची आहे. कामावरून दमून आलेली पत्नी. पतीला, मुलांना आनंद देऊ शकत नाही. आगरकरांच्या काळात स्त्रियांना शिक्षण कसं देता येईल. हा प्रश्न आगरकर सोडवू शकले नाहीत. तो प्रश्न नंतरच्या पिढीने सोडवला. ‘‘शिक्षण म्हणजे ज्ञान साक्षात प्रकाशच! शिक्षण घेतलेल्या बायका प्रकाशसारख्या पसरल्या. ह्यांना आता पुन्हा घराकडे कशा वळवायच्या खरोखरीच बायकोने नोकरी करावी का सोडावी ह्या बाबतीत धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत अशीच आजची अवस्था झाली आहे. काळ्यांच्या कुशल लेखणीतून एक चांगली कथा निर्माण झाली. स्पर्धा नको, साथ हवी! ह्या कथांचे सारे सामर्थ्य संवादांतच आहे! काळ्यांचे संवाद काही काही ठिकाणी फारच धारदार विलक्षण प्रभावी झाले आहेत. नाटकातील संवादाइतकेच ताकदीचे, आचार्य अत्रे म्हणत, नाटकातील संवाद बंद्या रुपयासारखे खणखणीत वाजायला हवेत म्हशीच्या शेणासारखे फदाफदा पडून वाकणार नाहीत!’’ काळ्यांच्या कथांचे संवाद इतके प्रभावी झाले आहेत की कथा वाचताना ती पात्रे आपल्या डोळ्यासमोर रंगमंचावर वावरतच आहेत. असे वाटते. कथा वाचून होते... आणि मग आपण भानावर येतो... अरेच्या हो कथा आहे! संवादांनी नटलेली नाटक नव्हे! ते संवाद चटकदार आहेत... खणखणीत आहेत. उदा. ‘‘पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बायकोला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या मार्तृत्वाचे प्रांत अनभिन्नच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कौतुक टिकतं. त्यात काय आहे. मी पण करीन! इथे अर्पण भाव संपला. स्पर्धा आली. कौतुक संपलं. तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली!’’ ‘‘घरात एकदा संगती पावल उमटली, काचेच्या वस्तु फुटायला लागल्या, खेळण्याचा पसारा पडायला लागला. गालीच्यावर रंगीबेरंगी नकाशे उठायला लागले म्हणजे मधु. पहिल्या रात्रीनं घातलेला उखाणा आपोआप सुटेल?’’ संवाद : कथांचा प्राण असे विलक्षण प्रभावी संवाद, सर्वकथांतून विखुरलेले आहेत नव्हे संवाद हाच ह्या कथांचा प्राण आहे. कथांतील वर्णनाचा बारीक बारीक तपशील वाचून वाचून कंटाळलेल्या वाचकांना इथे जरा नवे आढळते. काळ्यांच्या संवादाचे वैशिष्ट्य आणली आहे. हे संवाद कंटाळवाणे रुक्ष होत नाही. इथे सारे स्पष्ट आहे व संवादातून कथेचा ओघ वहात राहतो. पुस्तकाची सजावट श्री. काळे यांनी स्वत:च केली आहे त्यांतही निराळेपण आहे. एकूण वपु काळ्यांच्या कथाकथनाइतकेच ‘संवादिनी’ पुस्तक लोकांना आवडेल असे वाटते. -शकुंतला बोरगावकर ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    केवळ संभाषणातून फुलत जाणाऱ्या नाट्यपूर्ण कहाण्या... ‘संवादिनी’ या कथासंग्रहामधील सहाही कथा या संवादात्मक आहेत; आणि तरीही नाट्यपूर्ण अनुभूती देणाऱ्या आहेत. वपुंच्या आशावादी, उत्साही व आनंदवादी दृष्टिकोनाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. ‘उद्याचा दिवस’ मध्येराजाभाऊ आपल्या एका मित्राला व त्याच्या पत्नीला सांगतात, ‘‘भाई, अष्टमेश मंगळ बाराव्या घरातून जातोय; तुम्हाला जपायला हवं.’’ राजाभाऊ हे पत्रिकेपेक्षा संख्याशास्त्रावर भर देतात. ते ताईला एक अंक मनात धरायला सांगतात. ती सदतीस अंक सांगते. तेव्हा राजाभाऊ इशारा देतात, ‘‘भाई, तुम्ही स्वत:ला वाहनापासून जपायचं.’’ भाई विचारतो, ‘‘हे मोघम बोलणं झालं. वाहन कुठलं? किती चाकाचं?’’ तेव्हा राजाभाऊ पुन्हा एक अंक धरायला सांगतात. त्यावर राजाभाऊ म्हणतात, ‘‘चार चाकी वाहन. पुढचे पंधरा दिवस जपायला हवे.’’ या पंधरा दिवसात भाईच्या लांबच्या बहिणीची, सुमनची डिलिव्हरीची तारीख येत असते. पंधरा वर्षानंतर ती प्रथमच गरोदर असते... धास्तावलेला भाई पंधरा दिवसांची चक्क रजा काढतो. तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्येच राहतो... तेव्हा राजाभाऊंनाच वाटतं की आपण उगाचच यांना भविष्य सांगितलं. ते ताईला म्हणतात, ‘‘मी भविष्य सांगितलं ही एक मोठी चूक केली.’’ पण पत्रिका न बघताही मला माणूस कळतो असे म्हणणारी ताई तरीही विचारते, ‘‘भार्इंना खरोखरच तशी काही भीती नाही ना? राजाभाऊ, कितीही चमत्कार घडला तरी रस्त्यावरची मोटार फार तर फूटपाथवर चढेल; पण तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत घुसणार नाही. ..आणि पंधराव्या दिवशी, घरातून बाहेर न पडताही, भार्इंचा डावा हात संपूर्ण प्लॅस्टरमध्ये असतो. हे कसे घडले ?... ते येथे सांगण्यात मतलब नाही. पण राजाभाऊंना भाई फैलावर घेतो, ‘‘तुझं संख्याशास्त्र एकदम बोगस आहे. मला धोका रस्त्यावर, म्हणजे घराबाहेर नव्हताच. मी घरातच पडलो.’’ .... तुझं ते संख्याशास्त्र आणि त्यावर मी विकत आणलेली ती पाच पुस्तकं माझ्यासमोर जाळून टाक.’’ राजाभाऊ मग ताईशी बोलतात. ताई त्यांना सांगतात, ‘‘ये बाबा, आलास. तुझी वाटच पाहत होते.. तू सांगितलंस तसंच घडलं... त्यांना अजून ते माहित नाही... त्यांना कळलं तर ते संख्याशास्त्रावरची आणखीन ४०/५० पुस्तकं घरात आणून टाकतील.’’ वाचकमित्रहो, आता या ताई-राजाभाऊंच्या संभाषणावरून काय लक्षात येते, त्याचा तुम्हीच मागोवा घ्या. राजाभाऊंचे भविष्य तर खरे ठरलंय, आणि भाई आपल्या तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून पंधरा दिवसात एकदाही बाहेर पडले नाहीत हेही खरे! अपघात वाहनाने, तोही चार चाकी वाहनाने झाला हेही खरे!... वपुंचे कौशल्य या अशा नाट्यपूर्ण घटनांची उत्कंठापूर्ण रंगत वाढवण्यात दिसते. राजाभाऊंशी होणाऱ्या या जोडप्याच्या गप्पांची लज्जत तर चाखता तर येतेच, त्यापेक्षाही जास्त गंमत ताई-भाई यांच्यातील जुगलबंदीने येते. ‘‘माझ्याकडे का पाहताय?’’ ‘‘मग कुणाकडं पाहायचं? तू माझी बायको. मला जपायला हवं ही सूचना राजाभाऊंनी तुला तुला दिली आहे. बघा, राजाभाऊ, कसं हसण्यावारी नेते, पाहा.’’ ‘‘अहो पण...’’ ‘‘आता काही सांगू नकोस. पाहिलंत राजाभाऊ? घरातल्या माणसांनी जर गंभीर गोष्टीची अशी चेष्टा चालवली तर आमचं रक्षण आम्हीच करायला हवं की नको?’’ ‘‘तुम्ही अगदी कमाल करतांय हं. जपायला हवं असं हे म्हणतात. पण त्यांना आधी विचारा की कशापासून जपायचं? किती दिवस? कशा तऱ्हेने? हे सगळं विचाराल की नाही?’’ ‘‘तू जर ह्याच तऱ्हेने बोलणार असशील तर मला तुझ्यापासून आधी जपलं पाहिजे.’’ ‘‘उत्तम. मला परवानगी द्या. की मी चालले.’’ ‘‘कुठं?’’ ‘‘अर्थात माहेरी.’’ ‘‘हे पाहा राजाभाऊ. माझ्या जिवाला अपाय आहे असं तुम्ही सांगताय आणि ही निघाली माहेरी, बघून ठेवा. ‘‘अहो पण भाई...’’ ‘‘मी कसा संसार केला असेन हे जाणून घ्या. ह्यांना बायकोची मुळीच गरज नाही...’’ ‘निरंजन, मला उत्तर हवंय’ या ‘संवादिनी’मधील पहिले दृश्य माथेरानचे आहे. पेडर रोडवर राहणारे जोडपे श्रीधर व माधुरी माथेरानच्या शांत वातावरणात एकमेकांच्या सहवासात रममाण झालेले आहे. ‘‘श्रीधर, चेष्टा नाही. खरंच, मी फार सुखी आहे ह्या क्षणी. अगदी तृप्त आहे.’’ असे ती म्हणते आणि श्रीधरच्या चेहऱ्यावर असे तिला काही दिसते की, ‘‘तुमचा चेहराच सांगतोय, काही लपवायचं नाही माझ्यापासून’’ असे तिला म्हणावे लागते. आणि नंतर विषय निघतो तो मुलाचा, ‘‘मला मूल हवंय. पण ते तुमच्याकडून हवंय.’’ ‘‘मला नकोय का तसं?’’ पण तसं ते होणार नाही म्हणून... टेस्ट ट्युबचा मार्ग.’’ ‘‘श्रीधर, प्लीज वेट, आय कान्ट बेअर इट. इट्स व्हेरी क्रुड. सगळी विटंबना वाटते...’’ या पुढच्या दृश्यात माधुरी दिसते ती निरंजन या नटाबरोबर बोलताना. लग्नाआधी आठदहा वर्षे माधुरीने नाट्यक्षेत्रात काढलेली असतात. निरंजनबरोबर भामिनीची भूमिका केलेली असते. परंतु लग्नानंतर नाट्यक्षेत्राकडे तिने पाठ फिरवलेली असते. आता नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी माधुरीची आणि निरंजनची गाठ पडते. पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि ती त्याच्याशी एकान्त साधते; आणि नंतर त्याला सांगते, ‘‘आपल्या मिलनाची खूण या क्षणी माझ्या पोटात वाढत आहे.’’ निरंजन चक्रावतो. ‘श्रीधरचं काय?’ असा प्रश्न करतो. ती त्याला समजावून सांगते, ‘‘श्रीधर मला मूल देऊ शकत नाही. म्हणून आम्ही दोघांनी टेस्ट ट्युब बेबीचा प्रयोग करायचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांशी अपॉइंटमेंटही घेतली आहे... श्रीधर दौऱ्यावरून परत आल्यावर डॉक्टरांकडे जायचे आहे.’’ त्याचवेळी ती हेही स्पष्ट करते की डॉक्टरांना विश्वासात घेऊन टेस्टट्युब बेबीचं नाटक करायचं...’’ —‘‘माझा रंगमंच जरा मोठा आहे. त्यात अंक नाहीत. प्रवेश नाहीत. प्रॉम्प्टर नाही. पडदा पडणार तो एकदाच. नंतर मिळणाऱ्या टाळ्याही मालकीच्या नाहीत.’’ - हे खास वपु शैलीतले वाक्यही ती उच्चारते. ‘‘ही श्रीधरची फसवणूक नाही का ? असेलही. पण अनभिज्ञतेच्या दु:खापेक्षा ह्यातली वेदना सौम्य आहे.... काही काही व्यथा पत्कराव्या लागतात. सांभाळाव्या लागतात. ह्या माझ्या कृतीनं श्रीधरपेक्षा जास्त ताण मलाच सहन करावा लागणार आहे....’’ अशी तिची या क्षणीची भावना आहे. आता पुढची कलाटणी वपु कशी देतात या कहाणीला? दहा वर्षांनी निरंजनचा फोन येतो.. ‘‘माझी नाटक कंपनी बंद पडली. मी मरता मरता वाचलो. आता एकटा राहतो. बायको माहेरी राहते. नोकरी करून मुलांचे पोट भरते....’’ तो माधुरीकडे कर्ज फेडण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी करतो. ती नाही म्हणते तेव्हा तो ‘दहा वर्षांपूर्वीचा हिशेब सव्याज वसूल करायची’ भाषा, ब्लॅकमेलची भाषा करतो. ती त्याला सांगते. ‘‘आज पाच हजार दिले की काही दिवसांनी तू पुन्हा मागणी करशील. एवढं करूनही त्या रकमेशी तू प्रामाणिक राहशील असं नाही. अगोदर पैसा घालवायचा आणि शेवटी संसार घालवायचा. त्यापेक्षा पैसा वाचवते. कायम डोक्यावर तलवार नको. तू ये. श्रीधरना जरूर भेट.’’ श्रीधरला निरंजन भेटून हे सर्व सांगतो; तेव्हा श्रीधरची प्रतिक्रिया त्याला अनपेक्षित अशी होते. ‘‘एनी हाऊ,तुम्ही मला विलक्षण ताणातून मुक्त केलंत...एका कलावंताचं रोप माझ्यासारख्या रसिकाच्या घरी वाढतंय याचा मला आनंद वाटतोय... हा पोरगा कोणाचा हे जर समजलं नसतं तर कदाचित त्याचं व्यक्तिमत्त्व फुलवण्याच्या कामात मला अपयश आलं असतं. आता तसं व्हायचं नाही...’’ ब्लॅकमेल करायला आलेल्या निरंजनला श्रीधर सांगतो, ‘‘तुम्हाला काय हवंय ते आता ठरवा.. पैसे हवे असतील तर आकडा सांगा... बाप म्हणून बापाला जी भूक असते ती मी किंवा मधु पुरी करू शकणार नाही. तुम्हाला बाप म्हणून मुलाकडून जे हवं असेल ते फक्त मुलगा आनंद हाच देऊ शकेल... तेव्हा तुमची मागणी सांगा...’’ मानवी स्वभावाचे असे अनोळखी, अपरिचित कप्पे दाखवण्याची वपुंना विलक्षण हौस होती. त्यांची माणसे रूढ चाकोरीतून जात नाहीत; ती काहीतरी वेगळ्या पण स्वत:च्या स्वभावाशी सुसंगत अशी वागतात. अधिक जिवंत वाटतात. खरी माणसे वाटतात. नाही ती अपराधभावना मनाशी जपत आपले आयुष्य नासवायला तयार नसतात. वस्तुस्थितीचा स्वीकार करायची वेळी आली की डगमगत नाहीत; अहंकाराचा वा प्रतिष्ठेचा संभावित बुरखा झुगारून देताना कचरत नाहीत. कथानकातले वेगवेगळे टप्पे हे अत्यंत कौशल्याने समोर येत राहावेत अशी कमालीची दक्षता वपु घेतात. कौशल्य सारे रचनेत आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे साधे साधे किस्सेही ते रंगतदार बनवून पेश करतात. त्यांची पेशकश ही त्यांच्या कथाकथनतंत्राच्या सगळ्या क्ऌप्त्या चपखलपणे वापरणारी असते. पती आणि पत्नी घरी निवान्त एकान्ती असताना मिठीत येऊ पाहतात; पण त्यावेळी पप्पूनं आपल्याला बघितलं का अशी शंका पतीला येत राहते; आणि त्या धावत्या भेटीची मजा हरवते. पप्पूनं आपल्याला ओझरतं तरी पाहिलं असावं या शंकेची खातरजमा करून घेण्यासाठी पप्पूला सूचक प्रश्न विचारण्यात येतात. मिठी वगैरे प्रकार मुलांना कळू नयेत ही जबरदस्त नैतिक जाणीव.... पण तिच्या पार ठिकऱ्या होतात. कशा ? पप्पू एका बालचित्रपटाला जातो. नऊ वर्षाच्या मुलीची एक बाहुली हरवते. ती खूप शोधते. शेवटी बाहुली सापडते; आणि ती मुलगी बाहुलीला मिठी मारून तिचे मुके घेत सुटते.... जागरुक नीतिवादी पालकांची अशी दैना होते; आणि वपुंना ती मिस्किलपणे सांगण्यातही थ्रिल वाटते. आफिसमध्ये अत्यंत सचोटीने, सिन्सिअरली काम करण्याऱ्या ‘गृहिणी’ला -इंद्रायणीला रजा काढून घरी राहिल्यावर काय करायचं तेच कळत नाही. वेळ जात नाही. मुलांनाही तिचं घरी राहणं चमत्कारिक वाटतं. नेहमी फिरतीवर असणारा तिचा नवराही तक्रार करतो, ‘‘ती रजेवर आहे. तिनं आता फुलायला हवं. पण नाहीच रे. आमचे एवढ्यातेवढ्यावरून क्लॅशेस उडत आहेत. मुलांशी क्लॅशेस. घरगड्याशी क्लॅशेस.’’ रजा नकोशी होते मग ! — आणि नोकरी करणाऱ्या बायकांच्या सायकॉलॉजीकडे वपु लक्ष वेधतात. नोकरी करणाऱ्या बायका घरापेक्षा ऑफिसात जास्त प्रसन्न असतात. ऑफिसचं काम अंशमात्र त्यांच्यावाचून खोळंबून राहतं. चार आजूबाजूची माणसं दहा वेळी चौकशी करतात. नवऱ्यापेक्षा ऑफिसातला सहकारी जवळचा वाटतो. आपण आपल्या बायकोचं कधीच ऐकू शकणार नाही. ऑफिसातला तिचा मित्र सगळं ऐकतो. कारण तिच्या संसारातल्या दु:खाला तो मित्र मुळीच जबाबदार नसतो. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. इतक्या कळत नकळतपणे बायको दुरावते. इट इज सॉर्ट ऑफ स्लो पॉयझनिंग.’’ (२१) पुरुषांना स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं. ‘त्यात काय आहे, मी पण करीन’ - इथं समर्पणभाव संपला. स्पर्धा आली. कौतुक संपलं. तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली. (२२) ‘‘शिक्षण घेतलेल्या बायका. प्रकाशासारख्या पसरल्या. जिथं तिथं बायका. ह्यांना आता पुन्हा घरांकडे कशा वळवायच्या हे तुला मला सांगताच येणार नाही. क्वचित पुढची पिढी सांगू शकेल. तेही ह्या पिढीला गरज पडली तर.’’ दोन पैजांची गमतीदार कहाणीही वपु खुलवून सांगतात. ‘‘रमेश, ही मोहिनी साठे. आमच्या ऑफिसातच काम करते. आज सिनेमाला आम्ही दोघे परस्पर चाललोय. कृपया संजीवनीला निरोप पोचवशील? नाहीतर ती काळजी करील.’’ संजीवनी ही रमेशची बहीण. मिस्टर देवधरांची पत्नी. संजीवनी, माझी बहीण-तापट स्वभाव... पण हा निरोप ऐकूनही शांतच राहते. कारण? तिने शांत राहण्याची पैज मारलेली असते. शंभर रुपयांची... संजीवनी जिंकते आणि देवधर ? देवधरही ऐंशी रुपयांची पैज हरतात. त्यांची ऑफिसात पैज मारलेली असते. बायको भांडेल म्हणून, पण ती भांडतच नाही. — वपुंच्या या सारख्या मिस्किल कथा वाचताना मोपासांचे स्मरण होते. शेवटी कलाटणी देण्यात व मानवी मनाचे गुंते दाखवण्यात मोपासांही कुशल होता. वपुंच्या कथांची म्हणून इंग्रजी फ्रेंचमध्ये भाषांतरे व्हायला हवीत. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more