* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY, A PROFESSOR, A SOCIAL WORKER AND BEST OF ALL AN AUTHOR WITH THE MOST INNOVATIVE AND SKILLFUL MIND. HER WRITING IS BASED ON TRUTH, AND PRESENTED IN A WONDERFUL MODE, TOUCHING US, GIVING US IMMENSE PLEASURE. WE OFTEN COME ACROSS UNEXPECTED SITUATIONS, SAY FOR EXAMPLE YOUR GRANNY WISHES TO OVERCOME HER ILLITERACY WITH YOUR HELP, OR MAY BE THE PRESIDENT OF INDIA WISH YOUR COMPANY WHILE TRAVELLING, OR YOUR TEACHER ALL OF A SUDDEN DECIDES TO GIVE YOU MORE MARKS THAN YOU DESERVE. WHAT WILL YOU DO IN THESE SITUATIONS? WHILE READING SUDHA TAI`S STORIES YOU WILL COME ACROSS THE SOLUTIONS FOR THESE ASTONISHING SITUATIONS. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES. ONE STORY HAS A NAUGHTY STUDENT AND BELIEVE ME, HIS NAUGHTINESS WILL KEEP YOU TOTALLY ABSORBED. THE OTHER STORY TELLS US ABOUT A WIFE WHO SAVES EVERY SINGLE PENNY FROM HER HOUSEHOLD EXPENSES WITH JUST ONE DREAM, HER HUSBAND`S DREAM OF SETTING UP A NEW BUSINESS. FOR THE AUTHOR, THIS BRINGS BACK HER MOTHER`S MEMORIES AND HER ADVICE. THE AUTHOR HAS ALSO WRITTEN ABOUT HER GRANDPA AND THE PROMISE THAT SHE HAD MADE TO HIM FOR DONATING BOOKS TO THE LIBRARY IN HER VILLAGE. ALL THESE STORIES HAVE FRESHNESS, THEY ARE HEALTHY AND THEY MAKE US SMILE. EACH AND EVERY STORY IMPARTS AN IMPORTANT LESSON, HOW TO ACCOMPLISH OUR GOALS WHICH HAVE TOUCHED OUR SOUL, WHICH WE FIND VERY LOGICAL, WHICH ARE BASED ON OUR PRINCIPLES.
तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणाया लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नव्या व्यवसाय सुरु करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... `मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर,` असं वचन आपल्या नातीकडून घेणाऱ्या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणाऱ्या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य #वयाची अट नाही #रशियामधील लागनसोहळा #आज आपण त्यांना घासू म्हणतो पण उद्या... # लाल भाताची कणगी #श्री. अब्दुल कलाम #खरा दागिना #आपरो जे.आर.डी. #इतिहासाचं अगाध ज्ञान # ए फॉर ऑनेस्टी #अम्मा हे तुजे कर्तव्य नाही का? #वाटणी #निदान एकातरी वाचनालयासाठी पुस्तकं #वाळवंटातील प्रवास #यांच्यातील महान कोण? # आम्ही ते करून दाखवला #
Customer Reviews
  • Rating Starमुक्ता नंदकिशोर कुंभार

    आदरणीय लीनाजी, स.न.वि.वि. मी इयत्ता ९वी वर्गात शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही मराठीतून अनुवाद केलेले पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही पुस्तक मराठीमध्ये अनुवाद केल्यामुळ मन:पूर्वक आभार मानते. मी अनेक पुस्तके वाचली. त्यातून जास्त आवडलेलं पुस्तक ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक माझ्या जीवनाचं सार्थक करणारं आहे, हे मला कळालं. त्यातील मला आवडलेला प्रसंग म्हणजे संकटातली हसा त्यात असं लिहिलं आहे, की परीक्षेत नापास झालं तरी त्याला कधी ना कधी यश नक्की मिळते. जीवनात अपयश हे आवश्यक असते, जर माणसाच्या जीवनात सतत यश मिळत गेले, तर त्याच्यामध्ये उद्धटपणा वाढतो. क्वचित तरी अपयश मिळणे आवश्यक आहे. हे वाचल्यानंतर मला कळालं, की संकटांना हसून तोंड देण्यासाठी शिकलं पाहिजे. माझी तुम्हाला अशी विनंती आहे, की तुम्ही आमच्या शाळेस एकदा तरी भेट द्यावी, ही विनंती. आपली विश्वासू, मुक्ता नंदकिशोर कुंभार ...Read more

  • Rating StarKedar Joglekar

    सुधा मूर्ती यांना परिचयाची काहीही आवश्यकता नाही परंतु त्यांच्या `गोष्टी माणसांच्या` ह्या पुस्तकाविषयी फार ऐकायला मिळत नाही म्हणून हा परिचय. ह्या कथासंग्रहात सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि तेव्हा घडलेल्या लहान सहान रंतु मोठा प्रभाव पाडणाऱ्या प्रसंगांचं अगदी ओघवतं वर्णन केलेलं आहे. त्यांचं बालपण, कर्नाटकातल्या लहानशा खेड्यातलं त्यांचं घर, त्यांची आज्जी, त्यांचे शिक्षिका असतानाचे अनेक अनुभव इथपासून ते समाजातल्या थोर व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरचे त्यांचे अनुभव इत्यादींची फार छान मोट त्यांनी बांधली आहे. सुधा मूर्तींच्या प्रत्येक अनुभवाच्या मांडणीत अत्यंत खरेपणा नेहमीच अधोरेखित होतो तसाच एक बारीकसा उपदेश हलकेच त्या वाचकापर्यंत पोहचवतात. ३२ अनुभव कथनांच्या ह्या संग्रहात कोणताही विवक्षित कथाक्रम नाही त्यामुळेच कोणत्याही क्रमात त्या कथा वाचता येतात. नक्की वाचा! ...Read more

  • Rating Starएकनाथ मा. डुमणे

    आपल्या वतीने प्रकाशित ‘गोष्टी माणसांच्या’ या पुस्तकाचे आमच्या प्रशालेत आम्ही ‘श्रावण अभिवाचन उपक्रमात’ वाचन घेतले. दररोज एक कथा विद्यार्थ्यांना वाचून दाखवायची. सुधा मुर्तींनी इंग्रजीत लिहिलेल्या कथा लिना सोहोनी यांनी मराठीत अनुवादित करताना त्यांच्यातल गोडवा कायम राखला आहे. या कथांचे वाचन ऐकताना विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन जायचे. कथा कधी संपली हे त्यांना कळायचेच नाही. कथा ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसंगानुरूप बदलत जाणारे भावही टिपण्यासारखेच असायचे. कथा संपायची अन् विद्यार्थी भारावल्यासारखे होऊन जायचे. ‘वयाची अट नाही’, ‘लाल भाताची कणगी’, ‘खरा दागिना’, ‘वाटणी’ अशा कथातर खूपच खोलवर उतरल्या. या संग्रहाच्या रूपाने सुधातार्इंनी स्वार्थी वातावरणात दुर्मिळ होत चाललेली आजीच्या संस्काराची कुस पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने उपलब्ध करून दिलीय. ही संस्कार शिदोरी विद्यार्थी व बालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळा व ग्रंथालयाची आहे. काल्पनिक कथांपेक्षा चलत फिरत वेचलेल्या अनुभवातून प्रकटलेल्या या कथा आपल्याच घर, परिसरातल्या वाटतात. त्या हृदयात उतरून कधी संस्कार करून जातात. तेच कळत नाही. हे मात्र नक्की! अभिवाचन उपक्रमातून वाचन सुधाराला गती मिळाली. ...Read more

  • Rating StarSunetra Potnis

    अतिशय उत्तम पुस्तक ...माझ्या संग्रही आहे...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more