THIS ANTHOLOGY BRINGS TOGETHER TIMELESS STORIES BY WORLD-RENOWNED AUTHORS. EACH STORY PEELS BACK THE LAYERS OF THE HUMAN MIND AND REFLECTS THE MANY FACETS OF HUMAN LIFE. THE LAST LEAF EXPLORES THE DELICATE BOUNDARY BETWEEN LIFE AND DEATH, HUMAN DREAMS, AND THE UNPREDICTABILITY OF FATE THROUGH THE EXPERIENCES OF TWO ARTIST FRIENDS, SUE AND JOHNSY. THE CHAMELEON OFFERS A VIVID PORTRAYAL OF A MAN ATTEMPTING TO EXTORT MONEY BY EXAGGERATING A DOG-BITE INCIDENT AND A POLICE INSPECTOR WHO CONVENIENTLY CHANGES HIS STANCE TO SUIT THE SITUATION. THE SELFISH GIANT TRACES A GIANT’S TRANSFORMATION FROM SELFISHNESS TO GENEROSITY, WHILE THE BLACK VEIL REVEALS AN EMOTIONAL BOND BETWEEN THE MOTHER OF AN EXECUTED YOUNG MAN AND A NEWLY PRACTICING DOCTOR AGAINST A MYSTERIOUS BACKDROP. IN THE GARDEN PARTY, THE CONTRAST BETWEEN A LAVISH CELEBRATION IN A WEALTHY HOUSEHOLD AND THE DEATH OF A YOUNG MAN IN A NEARBY POOR SETTLEMENT HIGHLIGHTS PROFOUND TRUTHS ABOUT HUMAN EXISTENCE. THESE STORIES, ALONG WITH OTHERS IN THE COLLECTION, ARTFULLY WEAVE TOGETHER PSYCHOLOGICAL INSIGHT AND REFLECTIONS ON LIFE, OFFERING READERS A RICH AND THOUGHT-PROVOKING LITERARY EXPERIENCE.
जागतिक कीर्तीच्या साहित्यिकांनी लिहिलेल्या कथांचं हे संकलन. मानवी मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या आणि मानवी जीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या कथा आहेत. स्यू आणि जोहन्सी या चित्रकार मैत्रिणींच्या मनोव्यापारांतून जीवन-मृत्यूची सीमारेखा, माणसाची स्वप्नं आणि नियतीची अतर्क्यता, यांचं दर्शन घडवते ‘अखेरचे पान’ ही कथा; तर कुत्रा चावल्याचा कांगावा करून पैसे उकळू पाहणारा इसम आणि मग त्या प्रसंगी, सोयीस्करपणे पक्ष बदलणारा पोलीस अधीक्षक, या व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण करते ‘रंग बदलणारा सरडा’ ही कथा, तर ‘स्वार्थी राक्षस’मधून चित्रित झालाय एका राक्षसाचा स्वार्थांधतेकडून उमदेपणाकडे झालेला प्रवास, ‘काळा बुरखा’ कथेतून, फाशी गेलेल्या तरुण मुलाची आई आणि नुकतीच प्रॅक्टीस सुरू केलेला डॉक्टर यांच्यातील भावबंध गूढ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उलगडतो. तर ‘गार्डन पार्टी’ कथेत श्रीमंत घरातील पार्टी आणि त्याच वेळी त्या घरासमोरच्या गरिबांच्या वस्तीत एका तरुण माणसाचा झालेला मृत्यू, या विरोधाभासी प्रसंगांच्या चित्रणातून अधोरेखित होतं मानवी जीवनातील सत्य. मनोव्यापार आणि जीवनदर्शनाची कलात्मक गुंफण असलेल्या कथांची ही एक झलक. अन्य कथाही याच वैशिष्ट्यांनी सजलेल्या.