* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF AN OUTSIDER
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789386888310
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE MOST HATED MAN IN THE MOST DOUR TOWN IN SCOTLAND IS SLEEPING WITH THE FISHES, OR - MORE ACCURATELY - HAS BEEN DUMPED INTO A TANK FILLED WITH CRUSTACEANS. ALL THAT REMAINS OF THE MURDERED VICTIM ARE HIS BONES. BUT ONCE THE LOBSTERS HAVE BEEN SHIPPED OFF TO BRITAIN`S BEST RESTAURANTS, THE WHOLE AFFAIR QUICKLY LANDS ON THE PLATE OF CONSTABLE HAMISH MACBETH. EXILED TO THE DREARY OUTPOST OF CNOTHAN, MACBETH SORELY MISSES HIS BELOVED LOCHDUBH, BUT BEFORE HE CAN HEAD BACK HOME HE HAS TO CONTEND WITH A DETECTIVE CHIEF INSPECTOR WHO WANTS THE MURDER HUSHED UP, A DARK-HAIRED LASSIE WHO IS OUT TO SEDUCE HIM, AND A KILLER WHO HAS MADE MINCEMEAT OF HIS LAST VICTIM, AND WILL NO DOUBT STRIKE AGAIN...
स्कॉटलंडमधील लॉचढभवासीयांचा लाडका इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथची बदली जवळच्या क्नॉथन शहरात काही दिवसांसाठी झालेली असते. मॅक्बेथ आपल्या टाऊझर कुत्र्यासोबत क्नॉथनला येता; पण क्नॉथनमध्ये त्याचं मन रमत नाही. हॅमिश मॅक्बेथ हा शांत, सुस्त व खुशालचेंडू वृत्तीचा माणूस आहे. क्नॉथनला आल्यावर त्याला लॉचढभच्या निसर्गसौंदर्याची व त्याच्या आवडत्या प्रिसिला हालवर्टन स्मिथच्या निव्र्याज प्रेमाची उणीव सतत भासत राहते. क्नॉथन शहरासारखीच तिथली माणसंही रुक्ष, धार्मिक आणि आतल्या गाठीची. दुसऱ्या शहरातून आलेल्या माणसांकडे ती नेहमी संशयानं व अविश्वासानं पाहत. हॅमिशलाही तोच अनुभव येतो. क्नॉथनमध्ये एक विचित्र व विक्षिप्त स्वभावाची व्यक्ती राहत असते– विलिमय मेनवेअरिंग. मेनवेअरिंग हा मूळ इंग्रज माणूस. आपली मावशी खिस्तवासी झाल्यावर तिची इस्टेट सांभाळण्यासाठी तो आठ वर्षांपूर्वी क्नॉथनला येऊन स्थायिक झालेला असतो. वेअरिंग अतिशय गर्विष्ठ व तुसड्या स्वभावाचा झालेला असतो. साऱ्या जगाचं ज्ञान आपल्या एकट्याला आहे, अशा तोऱ्यात तो वावरत असे. गावातल्या लोकांवर हुकमत गाजवायची एकही संधी तो सोडत नसे. त्यामुळे गावातल्या प्रत्येकाचीच त्याच्यावर खुन्नस होती. विलियम मेनवेअरिंगचा जेव्हा खून होतो, तेव्हा गावातल्या एकाही माणसाला दुःख होत नाही. त्याचा खून होणार हे जणू लोकांनी गृहितच धरलेलं असतं. पण मेनवेअरिंगला विचित्ररीत्या मारण्यात येतं. मोठमोठे लॉबस्टर्स असलेल्या हौदात त्याला बुडवण्यात येतं. हौदातले लॉबस्टर्स काही तासांतच मेनवेअरिंगला फस्त करून टाकतात. पण हेच लॉबस्टर्स जेव्हा लंडनमधल्या दर्जेदार हॉटेलमध्ये जाऊन पोहोचतात, तेव्हा या प्रकरणाची चव अधिकच वाढते. मेनवेअरिंगच्या खुनाचा छडा लावण्याची जबाबदारी जेव्हा हॅमिशवर येते, तेव्हा संशय यावा अशा अनेक व्यक्ती त्याच्या नजरेसमोर येतात. त्यातला नेमका खुनी कोण हे शोधणं हॅमिशसाठी मोठं आव्हान असतं. आणि ते आव्हान त्याला एकट्यालाच पेलावं लागतं. अनेक गुपितं माहीत असूनही गावातली माणसं मूग गिळून बसलेली असतात. मॅक्बेथच्या बॉसला खून प्रकरणाची उकल करण्यापेक्षा ते दाबून टाकण्यातच अधिक रस असतो. त्यातच एक काळ्याभोर केसांची लावण्यवती ललना त्याला वश करून घेण्यासाठी विवश झालेली असते. आणि तो अज्ञात खुनी तर कोणत्याही क्षणी आणखी एक बळी घेणार असतो. हॅमिश मात्र सर्व प्रतिकूल परिस्थितीवर शांतपणे मात करत आपल्या खास पद्धतीने खुन्याच्या हातात बेड्या ठोकण्यात यशस्वी होतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#AHAMISHMACBETHMYSTERY#DETECTIVESTORIESINMARATHI#
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEATH OF AN OUTSIDER by M. C. Beaton स्कॉटलंड मधील छोट्याश्या खेड्यात राहणारी एक विक्षिप्त,स्वभावाची व्यक्ती . गावातील सर्वानाच तिचा त्रास . प्रत्येकीला वाटते ही व्यक्ती मरावी आणि त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होते . मोठं मोठे लॉबस्टर असलेल्या हौदात तया व्यक्तीला मारण्यात येते आणि हेच लॉबसटर लंडनच्या हॉटेलात जाऊन पोचतात . ह्या सर्व प्रकरणाची जबाबदारी इन्स्पेक्टर हॅमिश मॅकबेथवर येऊन पडते . मॅकबेथ आपल्या कुत्र्याला घेऊन बदलीवर त्या खेड्यात आलाय . हे खून प्रकरण दाबून टाकण्यासाठी मॅकबेथ वर दबाव येतोय . तर कोणत्याही क्षणी अजून एक खून होईल याची त्याला चिंता आहे . एक वेगवान कथा.स्कॉटलंडमधील लॉचढभवासीयांचा लाडका इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथची बदली जवळच्या क्नॉथन शहरात काही दिवसांसाठी झालेली असते. मॅक्बेथ आपल्या टाऊझर कुत्र्यासोबत क्नॉथनला येता; पण क्नॉथनमध्ये त्याचं मन रमत नाही. हॅमिश मॅक्बेथ हा शांत, सुस्त व खुशालचेंडू वृत्तीचा माणूस आहे. क्नॉथनला आल्यावर त्याला लॉचढभच्या निसर्गसौंदर्याची व त्याच्या आवडत्या प्रिसिला हालवर्टन स्मिथच्या निव्र्याज प्रेमाची उणीव सतत भासत राहते. क्नॉथन शहरासारखीच तिथली माणसंही रुक्ष, धार्मिक आणि आतल्या गाठीची. दुसऱ्या शहरातून आलेल्या माणसांकडे ती नेहमी संशयानं व अविश्वासानं पाहत. हॅमिशलाही तोच अनुभव येतो. क्नॉथनमध्ये एक विचित्र व विक्षिप्त स्वभावाची व्यक्ती राहत असते– विलिमय मेनवेअरिंग. मेनवेअरिंग हा मूळ इंग्रज माणूस. आपली मावशी खिस्तवासी झाल्यावर तिची इस्टेट सांभाळण्यासाठी तो आठ वर्षांपूर्वी क्नॉथनला येऊन स्थायिक झालेला असतो. वेअरिंग अतिशय गर्विष्ठ व तुसड्या स्वभावाचा झालेला असतो. साऱ्या जगाचं ज्ञान आपल्या एकट्याला आहे, अशा तोऱ्यात तो वावरत असे. गावातल्या लोकांवर हुकमत गाजवायची एकही संधी तो सोडत नसे. त्यामुळे गावातल्या प्रत्येकाचीच त्याच्यावर खुन्नस होती. विलियम मेनवेअरिंगचा जेव्हा खून होतो, तेव्हा गावातल्या एकाही माणसाला दुःख होत नाही. त्याचा खून होणार हे जणू लोकांनी गृहितच धरलेलं असतं. पण मेनवेअरिंगला विचित्ररीत्या मारण्यात येतं. मोठमोठे लॉबस्टर्स असलेल्या हौदात त्याला बुडवण्यात येतं. हौदातले लॉबस्टर्स काही तासांतच मेनवेअरिंगला फस्त करून टाकतात. पण हेच लॉबस्टर्स जेव्हा लंडनमधल्या दर्जेदार हॉटेलमध्ये जाऊन पोहोचतात, तेव्हा या प्रकरणाची चव अधिकच वाढते. मेनवेअरिंगच्या खुनाचा छडा लावण्याची जबाबदारी जेव्हा हॅमिशवर येते, तेव्हा संशय यावा अशा अनेक व्यक्ती त्याच्या नजरेसमोर येतात. त्यातला नेमका खुनी कोण हे शोधणं हॅमिशसाठी मोठं आव्हान असतं. आणि ते आव्हान त्याला एकट्यालाच पेलावं लागतं. अनेक गुपितं माहीत असूनही गावातली माणसं मूग गिळून बसलेली असतात. मॅक्बेथच्या बॉसला खून प्रकरणाची उकल करण्यापेक्षा ते दाबून टाकण्यातच अधिक रस असतो. त्यातच एक काळ्याभोर केसांची लावण्यवती ललना त्याला वश करून घेण्यासाठी विवश झालेली असते. आणि तो अज्ञात खुनी तर कोणत्याही क्षणी आणखी एक बळी घेणार असतो. हॅमिश मात्र सर्व प्रतिकूल परिस्थितीवर शांतपणे मात करत आपल्या खास पद्धतीने खुन्याच्या हातात बेड्या ठोकण्यात यशस्वी होतो. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    स्कॉटलंड मधील छोट्याश्या खेड्यात राहणारी एक विक्षिप्त,स्वभावाची व्यक्ती . गावातील सर्वानाच तिचा त्रास . प्रत्येकीला वाटते ही व्यक्ती मरावी आणि त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होते . मोठं मोठे लॉबस्टर असलेल्या हौदात त्या व्यक्तीला मारण्यात येते आणि हेच लॉबसटर लंडनच्या हॉटेलात जाऊन पोचतात . ह्या सर्व प्रकरणाची जबाबदारी इन्स्पेक्टर हॅमिश मॅकबेथवर येऊन पडते . मॅकबेथ आपल्या कुत्र्याला घेऊन बदलीवर त्या खेड्यात आलाय . हे खून प्रकरण दाबून टाकण्यासाठी मॅकबेथ वर दबाव येतोय . तर कोणत्याही क्षणी अजून एक खून होईल याची त्याला चिंता आहे . एक वेगवान कथा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.