* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF THE LUCKY LOSER
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789386888365
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE FIRST WOMAN WOULDN`T EVEN GIVE HER NAME. BUT THE CLEAR, FEMININE VOICE FALTERED CONSIDERABLY OVER THE QUESTION OF WHAT PERRY MASON`S CHARGES WOULD BE FOR A DAY IN COURT - A DAY DOING NOTHING BUT LISTENING.
अ‍ॅडिसन बाल्फोरचा ‘बाल्फोर अलाईड असोसिएट्स’ हा उद्योग व प्रॉपर्टी त्याच्या पुतण्याच्या नावे टेड बाल्फोरच्या नावे करण्याचे त्याने ठरवले आहे. टेडच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गुथ्री व त्याची बायको डोर्लाने टेडला वाढविले आहे. अ‍ॅडिसनला असे कळते, की टेडकडून गाडीच्या बाबतीत काही भानगड झाली आहे. टेडने मोटारच्या धडकेने कुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे टेडचा वारसाहक्क अ‍ॅडिसनकडून रद्द केला जाण्याची शक्यता असते. नंतर असं कळतं, की ती कार कोणी स्त्री चालवत होती. तिनेच टेडला त्याच्या घरी सोडलं व त्याचे कपडे वगैरे बदलले व गाडीची चावी त्याच्या पायजम्याच्या खिशात ठेवली. टेडच्या गाडीच्या धडकेमुळे जो माणूस मेलेला असतो, त्याच्या शवाची तपासणी केली असता, एका छोट्या कॅलिबरच्या ताकदवान गोळीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. म्हणजे ही अपघाताची घटना कुणीतरी घडवून आणल्याची दाट शक्यता असते. या शक्यतेला वस्तुस्थितीत बदलण्यासाठी पेरी मेसन कशा युक्त्या लढवतो, त्याचं मनोरंजक चित्रण म्हणजे ‘द केस ऑफ द लकी लूजर.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI# #PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    पेरी मेसनला एका केसच्या सुनावणीसाठी कोर्टात प्रेक्षक म्हणून हजर राहण्यासाठी अज्ञात स्त्रीकडून फी दिली जाते. ती केस आहे हिट अँड रनची.आरोपीला याबद्दल काहीच माहिती नाही. पोलीस जेव्हा त्याच्याकडे आले तेव्हा तो झोपेतून उठला होता.दारूच्या नशेत काय घडले हे ्याला आठवत नाही. आरोपी एका प्रचंड उद्योगांचे साम्राज्य असलेल्या व्यक्तीचा पुतण्या आहे .भविष्यात तोच हे सर्व सांभाळणार आहे . त्याच्या विरुद्ध एका साक्षीदाराने प्रचंड आत्मविश्वासाने साक्ष दिली आहे आणि त्यावरूनच ती खोटे बोलतेय अशी मेसनची खात्री झालीय . काही कारणाने पुढे ती केस पेरी मेसनकडे येते . आता पेरी मेसनपुढे आरोपीला निर्दोष सोडविण्याचे आव्हान आहे . पेरी मेसन हे आव्हान स्वीकारेल . मुळात एकदा मृत्यू झालेल्या माणसाचा पुन्हा कसा मृत्यू होऊ शकतो . मग खून झालेली व्यक्ती कोण आहे . एक शुल्लकसा दुवा ही पेरी मेसनला हे कोडे सोडविण्यास मदत करेल . पण कसे .....??? ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more