* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF A GOSSIP
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789386888341
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN A FAMOUS GOSSIP COLUMNIST IS MURDERED AT THE LOCAL FISHING SCHOOL, NO ONE IS READY TO TALK. IT`S UP TO HAMISH MACBETH, WITH THE INSPIRING ASSISTANCE OF THE LOVELY PRISCILLA HALBURTON-SMYTHE, TO SNIFF OUT THE RIGHT RAT AMID ALL THE CUNNING ANGLERS WITH SECRETS TO HIDE. BUT SOMEONE HAS BAITED A HOOK FOR HIM . . .
स्कॉटलंडच्या सुंदर, निसर्गरम्य वातावरणात ही कथा उलगडते. जॉन आणि हेदर कार्टराईट हे दाम्पत्य स्कॉटलंड- मधील एका टुमदार खेड्यात मासेमारी प्रशिक्षण संस्था चालवीत असतं. या संस्थेत विद्यार्थी म्हणून रॉथ हे अमेरिकन दाम्पत्य, चार्ली नामक बारा वर्षीय मुलगा, जेरेमी हा देखणा तरुण वकील, एलीस एक गरीब नोकरदार तरुणी, डाफने ही ऑक्सफर्डमधील तरुणी, मेजर पीटर हा निवृत्त लष्करी अधिकारी आणि लेडी जेन ही विधवा स्त्री पत्रकार यांचा समावेश आहे. पात्रांत याखेरीज हामिश मॅक्बेथ हा त्या गावचा पोलीस इन्स्पेक्टरही आहे. वर्ग सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी अचानक लेडी जेनचा पुÂगलेला मृतदेह जॉनच्या गळाला लागतो. इन्स्पेक्टर मेक्बेथला पाचारण केलं जातं. नंतर शहरातून गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख ब्लेअर यांनाही बोलावलं जातं. पोलिसांना एकच पुरावा सापडतो... तो म्हणजे एक अर्धवट फाटलेला फोटो. या फोटोवरून पोलीस जेनच्या खुन्यापर्यंत कसे पोहोचतात, याचं उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#AHAMISHMACBETHMYSTERY#DETECTIVESTORIESINMARATHI#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 06-05-2018

    गुंतवून टाकणारी रहस्य मालिका... रहस्यमय मालिकांची लोकप्रिय लेखिका असा विशेष परिचय असलेली एफ. सी. बीटन (जन्म स्कॉटलंड) तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. लेखिका, पुस्तक विक्रेती, क्राइम रिपोर्टर. लेखिकेची शंभरहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रस्तुत पुस्तकातील रहस्यकथा एका लहान गावात घडलेली. एका संस्थेभोवती घडलेली आहे. ‘लॉक्ड’ ही मासेमारी प्रशिक्षण संस्था. जॉन कार्टराईट हा त्याचा मालक व पत्नी हेदर ही सहनिर्माती. या संस्थेत मासेमारीचं रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी विविध क्षेत्रांतील, वयोगटातील लोक येत. स्कॉटलंडच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांचं आणखी एक आकर्षण होते. लॉक्ड हॉटेल संस्थेत प्रवेश घेतलेल्यांमध्ये तरुण-तरुणी, लेडी पत्रकार, बॅरिस्टर, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. हॅमिश हा त्या गावातील पोलीस इन्स्पेक्टर. या प्रत्येक व्यक्तिरेखेचे त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. खासगी आयुष्यात गतकाळातील घटना आहेत. ज्या आजही त्यांच्या मनाच्या तळाशी रुजल्या आहेत. त्यांचा वर्तमानावर परिणाम होऊ नये यासाठी ते सतर्क आहेत. याबाबत काहींच्या मनात एक प्रकारची भीती आहे. लेखिकेने खुनामागचे रहस्य अखेरपर्यंत गूढ ठेवून वाचकांची उत्सुकता अखेरपर्यंत वाढवत गेली आहे. यात ती यशस्वीही झाली आहे. खुनाचा शोध डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर ब्लेअर लावू शकत नाही. तसा पुरावा त्याला मिळत नाही. हॅमिशची गावठी इन्स्पेक्टर म्हणून त्याची खिल्ली उडवतो, पण हॅमिश मोठ्या चतुराईने खुनाचा माग शोधून काढण्यात यशस्वी होतो. ‘खुनी कोण?’ हे रहस्य अखेर उलगडतं आणि त्यामागचं कारणही. वाचकही काहीसा स्तंभित होतो हेच या रहस्यकथेचं यश आहे निश्चितच. लेखिकेने दिलेले पुस्तकाचे शीर्षकही सार्थ ठरते. -माधुरी महाशब्दे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 15-04-2018

    रहस्यमय शोधकथा... मॅरिऑन चेस्ने ही ऐंशीच्या दशकात लिहिती झालेली स्काटिश लेखिका प्रामुख्याने ओळखली जाते ती तिच्या गूढ आणि रहस्यांनी काठोकाठ भरलेल्या कादंबऱ्यांसाठी. ‘अ‍ॅगाथा रेझीन’ ही काल्पनिक हेर व ‘हॅमिश मॅक्बेथ’ हा हुशार पोलीस अधिकारी, या व्यक्तिरखांना घेऊन ‘एम. सी. बीटन’ या टोपणनावाने चेस्नेने दोन स्वतंत्र कादंबरी मालिका लिहिल्या आहेत. त्यातील ‘हॅमिश मॅक्बेथ’ मालिकेतील पहिली कादंबरी १९८५ साली प्रकाशित झाली. ती कादंबरी होती- ‘डेथ ऑफ अ गॉसिप’! तिथपासून मॅक्बेथ मालिकेतील कादंबऱ्यांनी अमेरिकी वाचकांवर भूरळच घातली. या कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या कादंबरीचे कथानक घडते ते स्कॉटलंडमधील लॉचडभ या गावी. तिथे जॉन कार्टराइट हा लोकांना मासेमारीचे प्रशिक्षण देत असतो आणि त्याच्या वर्गाला स्कॉटलंडच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. एका खासगी तलाव्याच्या काठी त्याचे छोटेसे हॉटेलही असते. त्याच्या वर्गात उदयोन्मुख राजकारणी-व्यापारी मार्विन रॉथ आपल्या पत्नीसमवेत आलेला असतो. लेडी जेन विंटर्स ही पत्रकार महिला, बॅरिस्टर जेरेमी ब्लिथ, त्याची साहाय्यक एलिस विल्सन, १२ वर्षांचा चार्ली बॅक्स्टर, निवृत्त मेजर पीटर फ्रेम, ऑक्स्फर्डचा डॅफने गोर ही मंडळीही आलेली असतात. शोध-पत्रकारिता करणारी लेडी जेन ही विधवा असून तिला सतत लोकांच्या खासगी बाबींत नाक खुपसण्याची सवय असते. त्याचा प्रत्यय तिथे आलेल्या प्रत्येकाला येतोच. त्यातून अनेकांशी तिचे वाद होतात. त्यामुळे सगळेच तिच्यावर वैतागलेले असतात. एका संध्याकाळी मासेमारीचे प्रात्यक्षिक करायला सगळे जण तलावाच्या काठी जातात. तिथून रात्री सगळे परत येतात, पण जेन मात्र परतत नाही. शोध घेतला असता तिचा मृतदेह तळ्याजवळ आढळतो. तिच्या या आकस्मिक जाण्याने प्रशिक्षण वर्गातच नव्हे, तर त्या छोटय़ाशा खेडय़ातही वादळ उठते. तिथला पोलीस अधिकारी हॅमिश मॅक्बेथ तपासाची सूत्रे हाती घेतो आणि लेडी जेनच्या खुनाचे रहस्य मॅक्बेथ हुशारीने शोधून काढतो. त्याची ही शोधमोहीम कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचण्याशिवाय गत्यंतर नाही! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book