MAZI PATRAKARITA’S’ AUTHOR SUHAS BARTAKKE SHARES HIS PERSONAL EXPERIENCES SPANNING A CAREER IN JOURNALISM THAT BEGAN IN 1990. THE UNDERLYING OBJECTIVE IS TO PROVIDE PROPER GUIDANCE TO THE YOUNGER GENERATION, PARTICULARLY THOSE PURSUING A CAREER IN JOURNALISM. SINCE THERE ARE FEW BOOKS AVAILABLE ON THIS SUBJECT, THE AUTHOR UNDERTOOK THIS PROJECT. THE ABILITY TO CLEARLY CALL OUT WHAT IS GOOD AS GOOD AND WHAT IS BAD AS BAD IS CONSIDERED A HALLMARK OF A JOURNALIST, AND THE AUTHOR FEARLESSLY CONVEYS THIS VERY PERSPECTIVE THROUGH THE ARTICLES IN THIS BOOK.
‘‘एखाद्या सत्य गोष्टीचा खूप आक्रमकपद्धतीनं शोध घेणं, खोटेपणा उघड करणं, अन्यायाला वाचा फोडणं, हे शोध पत्रकारितेची मुख्य अंग आहेत.’’ असं ब्रूस लॉकलीन यांनी म्हटलेलं आहे. बघायला गेलं तर, तेच खरं आहे; परंतु आजकाल असं दृष्य बघायला मिळत नाही. याच वास्तविकतेसह १९९०पासून सुरू झालेली पत्रकारिता आणि त्यातील काही स्वानुभव लेखक ‘सुहास बारटक्के’ यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत. आजच्या तरुण पिढीला, खासकरून पत्रकारिता करणाऱ्यांना योग्य दिशा मिळावी हा यामागचा हेतू आहे. पत्रकारिता या विषयावर अल्प पुस्तकं बघायला मिळतात. म्हणून लेखकानं हा घाट घातला आहे. ‘चांगलं ते चांगलं आणि वाईट ते वाईट’ असं स्पष्टपणे सांगणं हा पत्रकाराचा गुण मानला जातो आणि याच विचारांचं आदानप्रदान लेखक यातील लेखांत निर्भीडपणे करतात.