Jean Sasson

About Author

Birth Date : 04/07/1947


AUTHOR OF THE NEW YORK TIMES BESTSELLING BOOK PRINCESS. HE WROTE AFTER LIVING IN THE MIDDLE EAST FOR TWELVE YEARS. FOR THIS PURPOSE, HE TOURED THE MIDDLE EAST CONTINUOUSLY FOR 30 YEARS. HE CURRENTLY RESIDES IN THE SOUTHERN PART OF THE UNITED STATES.

अलाबामातील ट्राय शहरात १९४७ साली जीन सॅसन यांचा जन्म झाला. मध्यपूर्वेतील स्त्रियांवर मूलतत्त्ववादी समाजाकडून होणार्या अन्यायावर त्यांचे लिखाण केंद्रित झालेले आहे. सॅसन यांचा जन्म छोट्या शहरात झाला असला, तरी त्यांच्या लिखाणात धाडसीपणा जाणवतो. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच त्यांना स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर घेऊन गेले आहे. १९७८मध्ये त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. तेव्हा रियाधमधील किंग फैजल सोशालिस्ट हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार विभागाचे व्यवस्थापन सांभाळत असताना त्यांची पीटर सॅसन यांच्याशी ओळख झाली. पुढे १९८२मध्ये ते विवाहबद्ध झाले. चार वर्षांनंतर जीन सॅसन यांनी हॉस्पिटल सोडले, तरी ते दोघे १९९० पर्यंत सौदी अरेबियात होते. त्या काळात सॅसन यांच्या मध्य-पूर्वेतील अनेकांशी ओळखी झाल्या. त्यांना अनेक मित्र मिळाले. रॉयल अल्-सौद कुटुंबीय हे त्यांपैकी एक होते. या कुटुंबातील प्रिन्सेस सुलताना यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. सध्या अमेरिकेतील दक्षिणभागात त्यांचे वास्तव्य आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
GROWING UP BIN LADEN Rating Star
Add To Cart INR 595
MAYADA - IRAQCHI KANYA Rating Star
Add To Cart INR 290
TBC Classic Book
YUVRADNEE Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more