* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SURYASTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662313
  • Edition : 7
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 48
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO 119 BOOKS
Quantity
PEOPLE WHO DO NOT WRITE OFTEN ASK US, HOW DO YOU WRITE? FROM WHERE DO YOU GET THE IDEAS FOR WRITING? ARE THESE IDEAS TAKEN FROM ALL ABOUT YOU OR DO YOU CREATE THEM? IF YOU FIND THEM ALL AROUND YOU, THEN HOW COME WE DO NOT NOTICE THEM? I WOULD SAY THAT THE IDEAS ARE ALL AROUND US. EACH IDEA HAS THE IMMENSE POTENTIALITY OF EXPRESSIONS. BUT ALL OF THEM ARE NOT CONVERTED INTO ANY FORM OF LITERATURE. WHY DOES THIS HAPPEN? I AS AN AUTHOR FEEL THAT IT IS BECAUSE OF THE LIMITATION AN AUTHOR HAS. NOT EVERY AUTHOR HAS THE CAPACITY TO METAMORPHASE EACH AND EVERY IDEA INTO A BEAUTIFUL BUTTERFLY. SOMETIMES, SOME IDEA INVOKES SOME INNER STRENGTH AND AUTOMATICALLY THE MIND FILLS IN WITH WORDS, PHRASES, SENTENCES. SOME OF IT TAKES A FORM OF LITERATURE, SOME OF IT JUST DOES NOT. I HAVE BEEN A WRITER SINCE LAST 50 YEARS. FOR HALFACENTURY I HAVE BEEN SHARING MY IDEAS WITH YOU. I AM REALISING THAT MY ENERGY IS DRAWING BACK THESE DAYS, ONE SHOULD NOT ACCEPT THE BOON OF YOUTH FOREVER. THIS COLLECTION CONTAINS A FEW OF MY EXPERIENCES. THEY GIVE ME UTMOST PLEASURE. THEY WILL GIVE A ME A FEELING OF FULFILMENT IF YOU DERIVE PLEASURE, HAPPINESS, MORAL SUPPORT, RELIEF OR ENTERTAINMENT.
‘सूर्यास्त’ हा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. खरंखोटं, सुष्टदुष्ट यांच्या संघर्षात अंतिम विजय सत्याचाच असतो, हेही कालातील सत्य आहे; कोणतीही शक्ती मग ती कितीही बलाढ्य का असेना सत्याला जिंकू शकत नाही; सत्य आपल्या आत्मतेजानं झळाळत असतं आणि ते अंगिकारलं, तर ‘अस्त’सुद्धा ‘सूर्यास्ता’सारखा लखलखीत असतो, हे तत्त्व लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून वाचकांच्या मनावर ठसवतात; आणि जीवनातल्या उच्च मूल्यांची वाचकांच्या मनात प्रतिष्ठापना करतात. त्यासाठी ते अस्सल आणि बेगडी, श्रेष्ठ आणि कनिष्ठ समोरासमोर ठेवतात. कधी आपल्या परखड लेखणीने ते खोट्या ढोंगी प्रतिष्ठेचे मुखवटे फाडतात; तर कधी उपरोधाने खोट्याचा खोटेपणा ठळक करून सत्याचा उदघोष करतात, तर कधी रूपककथांतून सहजतेने जीवनाचं मर्म उलगडून दाखवतात. रूपककथा हे कै. वि. स. खांडेकर यांच्या लेखनाचे सामथ्र्य आहे, हे या कथांतून प्रत्ययास येते.
Video not available
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #सूर्यास्त
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-11-2015

    जीवनाचे मर्म उलगडणाऱ्या कथा... रूपककथांतून जीवनाचं मर्म उलगडून दाखवणं हे वि. स. खांडेकर यांच्या लेखनाचं सामर्थ्य आहे. सूर्यास्त या त्यांच्या कुमारवयातील मुलांसाठीच्या कथासंग्रहातून ते प्रत्ययास येतं. यामध्ये एकूण चार कथा आहेत. ‘बुध्दाची गोष्ट’, ‘सूरयास्त’, ‘अनाथ’ आणि ‘प्रतिमा’. ही प्रत्येक कथा विचार करण्यास प्रवृत्त करते. या कथांचे विषय अगदी साधे-सरळ, रोजच्या आयुष्यात घडलेले, पाहिलेले, तरीही या कथा अंतर्मुख करतात. ‘बुध्दाची गोष्ट’ ही एका विद्यार्थ्याची कथा आहे. हा मुलगा ज्याला अनेक प्रश्न पडतात. तो मास्तरांना प्रश्न विचारून त्याचं निरसन करून घेत असतो. विशेषत: बुध्दाच्या गोष्टीच्या निमित्ताने समोर आलेल्या विविध प्रसंगातून त्याला जीवनाचे कंगोरे आणि सत्य उलगडत जाते. ‘सूर्यास्त’ ही अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणासाठी धडपडणाऱ्या एका तरुणीची कथा आहे. तिच्या मनाची घालमेल, अस्वस्थपणा आणि सरतेशेवटी संधिप्रकाशात तिच्या वडिलांना गवसलेला जगण्याचा मार्ग, हे खूप छान पद्धतीने मांडलं आहे. ‘अनाथ’ ही एका भुकेल्या मुलाची छोटीशी कथा. ती वाचताना डोळ्यात नकळत पाणी तरळतं. प्रतिमा कथेतूनही एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. या कथांतील प्रसंग इतक्या बारकाव्यांसह रेखाटले आहेत, की ते अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभे राहतात़ यातील प्रत्येक व्यक्तिरेखा नकळत बऱ्याच गोष्टी सांगून जाते. खरं-खोटं, सुष्ट-दुष्ट यांच्या संघर्षात अंतिम विजय सत्याचाच असतो. सत्य आपल्या आत्मतेजानं झळाळत असतं. ते अंगिकारलं, तर अस्तसुद्धा सूर्यास्तासारखा लखलखीत असतो, हे तत्त्व लेखक आपल्या कथांतून वाचकांच्या मनावर ठसवतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
SANDIP CHAVAN

सेकंड लेडी ही आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकाची गाजलेली रहस्यकथा (कादंबरी) आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केलेला आहे. रशियाची गुप्तचर संस्था केबिजी, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल (डमी) तयार करते. अमेरिका अध्यक्षांची खर पत्नी जेव्हा एका ठरलेल्या कार्यक्रमासाठी मॉस्को मध्ये येते तेव्हा तिच्या जाग्यावर नकली व्यक्ती अतिशय योजनाबद्ध रीतीने बदलवली जाते. या कामासाठी केबिजीने तीन वर्षे मेहनत घेतलेली असते. या योजनेचा हेतू काय असतो? ही गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला समजते का? अमेरिकी अध्यक्षांना या गोष्टीचा सुगावा लागतो की नाही? केबीसीला हवी असणारी माहिती मिळते की नाही? आणि शेवटी व्हाईट हाऊसमध्ये राहते ती अध्यक्ष्यांची खरी पत्नी असते की खोटी? हे जाणून घ्यायला ही कादंबरी वाचायला हवी. ही कादंबरी वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या रहस्यकथेत आपण इतके हरवून जातो की काळ- वेळेचे भानही आपल्याला राहत नाही. समोर एखादा हॉलिवूड चित्रपट पाहतोय अशी रंगत ही कादंबरी वाचताना येते. पुढे काय होणार याची उत्कंठा शेवटापर्यंत राहते हे या कथेचे यश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी बदलणे आणि तिच्या जागी खोटी व्यक्ती पत्नी म्हणून पाठवणे हे काम म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटते. परंतु पूर्वग्रह न ठेवता पुस्तक वाचल्यास वाचक त्यामध्ये हरवून जातो हे निश्चित! ही काल्पनिक कथा वाचत असताना पाश्चात्य लेखकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. अनुवादकाने घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे. ...Read more

CORPOKSHETRA
CORPOKSHETRA by DEEPAK KAUL Rating Star
DAINIK LOKMAT 08-12-2019

आधुनिक महाभारताची विनोदी गाथा... महाभारत आणि रामायण तसे हिंदू धर्माची अस्मितेची प्रतिके. लहानपणापासूनच या साहित्याची ओळख आपआपल्यापरीने प्रत्येक कुटुंबात करून दिले जाते. पण तुमच्या हातात जर हेच महाभारत, त्यातील सर्व पात्रे फक्त आधुनिक व कॉर्पोरेट क्षत्राशी संबंधित पद्धतीने जुळवून आले तर किती आनंददायी अनुभव असेल नाही का? कॉर्पोक्षेत्र हे पुस्तक म्हणजे एमबीए युगातील महाभारत वाचकांसमोर ठेवते. त्यातून मराठी वाचकांना हे पुस्तक पुराणातील अनुभव देण्यासोबतच आधुनिक दृष्टी देईल. आजच्या काळात महाभारतातील पात्रांशी काही संबंध शोधण्याचा प्रयत्न करेल. कॉर्पोक्षेत्र यातील कथा ज्या रंजक शैलीने आणि विनोदीपद्धतीने मांडतानाच युवकांचा विचारप्रवाह बदलू शकेल इतकी सामथ्र्यशाली आहे. महाभारताची आधुनिक ही गाथा मनोवेधक आहे. -दीपक कुलकर्णी ...Read more