* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615940
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK CONTAINS SPEECHES BY V.S.KHANDEKAR WHICH HE HAS DELIVERED ON THE PLATFORM OF VARIOUS LITERARY FESTIVALS. IT COVERS SPEECHES DELIVERED AT MARATHI SAHITYA SAMMELAN , BADODA, GOMANTAK SAHITYA SAMMELAN, MADGAO, SHARDOPASAK SAMMELAN, MUMBAI MARATHI SAHITYA SAMMELAN & SOLAPUR JILHA SAHITYA SAMMELAN. IN THESE SPEECHES V.S.KHANDEKAR PUTS LIGHT ON VARIOUS FLOWS IN MARATHI LITERATURE .
विष्णु सखराम तथा भाऊसाहेब खांडेकर हे आपल्याला माहित आहेत ते एक ज्येष्ठ आणि श्रेस्ट लघुकथाकार,लघुनिबंधकार, रूपककथाकार,कादंबरीकार आणि चिकित्सिक समीक्षक म्हणून. विविध साहित्यपीठांवरून अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या भाषणांंपैकी पाच निवडक भाषणांचा हा साक्षेपी संग्रह आहे. सहावे भाषण हे न केलेले भाषण आहे. या सहाही भाषणांंमधे त्यांनी मराठी वाङ्मयसृष्टीतील विविध साहित्यकृतींच्या निर्मितीप्रेरणांचा शोध घेतला आहे आणि त्यांची चिकित्सक समीक्षा करीत मराठी साहित्य अधिकाधिक गुणसमृद्ध कसे होईल,याविषयी नि:संदिग्ध मते सुस्पष्टपणे मांडली आहेत. विचारधनाने संपृक्त असलेल्या भाषणांचा हा संग्रह प्रत्येक साहित्यप्रेमीने अगत्याने संग्रही ठेवावा, एवढ्या मोलाचा खचितच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #सहा भाषणे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 22-12-1996

    साठ वर्षांपूर्वीची भाषणे आजही तितकीच ताजी... मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’चे मानकरी वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. त्या निमित्ताने त्यांची बहुतांशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मेहता पब्लिशिंग हाऊसचा संकल्प आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यंनी या संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आजवर तिसेक पुस्तकांची पुनर्मुद्रणे पूर्ण झाली आहेत. खांडेकरांनी १९३४ ते १९३६ या तीन वर्षांत मराठी साहित्य संमेलन कथा शाखा, गोमंतक साहित्य संमेलन - मडगाव, शारदोपासक संमेलन - पुणे, मुंबई मराठी साहित्य संमेलन आणि सोलापूर जिल्हा साहित्य संमेलन अशा पाच संमेलनात अध्यक्ष म्हणून भाषणे केली. या पाच भाषणात एका न झालेल्या भाषणाची भर घालून ‘सहा भाषणे’ हे पुस्तक १९४१ मध्ये प्रसिद्ध केले गेले. त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच निघाली आहे. ‘अभिषेक’ हा दुसरा अध्यक्षीय व वाङ्मयीन भाषणांचा संग्रहही नंतर निघाला. खांडेकरांची वाङ्मयीन भूमिका समजून घेण्यास या भाषणांचा थोडासा उपयोग होऊ शकेल. कलावाद विरुद्ध जीवनवाद यांचे प्रारंभीचे पडसाद यात वरचेवर उमटले आहेत. १९३४ मधील कथासंग्रहांचा आढावा घेऊन त्या वर्षी कृष्णाबाई, नाट्यछटाकार दिवाकार, वि.वि. बोकील, ना.सी. फडके, लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथा प्रथमच संग्रहरूपात आल्या याकडे लक्ष वेधले आहे, आनंदीबाई शिर्के, य.गो. जोशी, कुमार रघुवीर वगैरेचीही पुस्तके आली. नियतकालिकांमून बाहेर पडणाऱ्या या कथांना कला व वाङ्मय यांच्या कसोट्या लावल्या, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतका कथाही मिळणार नाहीत, असे ते मान्य करतात. पण या हौशी लेखकांतून उद्याचा सेनापती मिळेल, अशी अपेक्षाही प्रकट करतात. कथा वाङ्मय बहुजनांसाठी मानवी हृदयाशी क्रीडा करण्यासाठी जन्मास येते; ज्ञानदान हा तिचा मुख्य हेतू नसतो. कथनकला ही वसंतसेनेसारखी जी आनंदरूपी चारुदत्ताला माळ घालणार; चारूदत्ताची नीती म्हणून एखादी पत्नी असली तरी ती कुणाची पर्वा करणार नाही, असे उपमेद्वारे ते पटवू पाहतात. हेतूप्राधन्यतेने कथा रूक्ष व ओबडधोबड होते. कथेला कोणताही विषय चालतो. पण तो विषय कलासुंदर रीतीने मांडला पाहिजे. कथा, प्रणय व नीती यांचा तिरंगी सामना सदैव रंगत असतो. अद्भूतरम्य कथांतही भरपूर प्रणय सापडतो. पुराणनीतिवाद्यावर खांडेकर टीका करतात; तसेच इतर भाषापेक्षा मराठी कथा विपुलता, वैचारिक व कलागुण यात मागे रेंगाळते आहे. अशी त्यांची तक्रार आहे. या सुमार दर्जाचे कारण म्हणून मागणी तसा पुरवठा व गाजरपारखी प्रकाशन यांना ते दोष देतात. टीकाकारांचेही बक-शुक-पिक-काक असे चार वर्ग ते पाडतात. वृत्तपत्रांतील परीक्षण पांचट असतात; वाचकवर्गाने अभिरुचिसंपन्न व्हावे, लेखकाने आत्मतत्त्वाची जाण ठेवावी; कल्पनारम्यतेचा अतिरेक करू नये इ. सूत्रे सांगून कथालेखकांना काही सूचनाही देतात. त्यातील एक वाचनावर भर न देता, स्वत:च्या भल्याबुऱ्या अनुभवांतून कथा निर्माण करा. विनोदी, शास्त्रीय, चमत्कृतिजनक, अद्भूतरम्य ऐतिहासिक अशा कथाही हव्या असेही सुचवतात. आजही हे सर्व मुद्दे गैरलागू ठरत नाहीत. यात खांडेकरीय चिंतनाचा दीर्घपल्ला लक्षात येतो. सौंदर्यदृष्टी, सहदयता वैयक्तिक तत्त्वज्ञान, सूक्ष्म निरीक्षण व कलाचातुरी हे ललित लेखनाचे पंचप्राण असतात. याकडे अंगुलीनिर्देश करून खांडेकरांनी म्होपासॉ, वाल्मीकी, क्युप्रित, ब्रिओ प्रभृतींचे हवाले देत गोममकीय भाषण रंगवले आहे. छोट्या संमेलनांची आवश्यकता व कोकणी - मराठी भाषेची निकटता यांचीही आठवण देतात. शारदोपासक संमेलनात मराठी वाङ्मय कल्पनारम्यतेच्या आसपास घुटमळत असल्याची तक्रार करून केळकर, वा.म. जोशी, वरेरकर, फडके, अत्रे या सर्वांच्या कृतीत कल्पनारम्यतेचे धुके दिसते, हे दाखवून दिले आहे. पिरांदेलो, टर्जिनेव्ह यांची उदाहरणे देऊन, पावित्र्यविंडबन, मूर्तिभंजन, बदलता जीवनविषयक दृष्टिकोन यांची जाणीव देऊन भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशी ग्वाही दिली आहे. मुंबई मराठी साहित्य संमेलनातील भाषणात प्रथम, मुंबई हे शहरही मराठी ग्रंथकारांच्या दृष्टीने संपन्न आहे. मराठी पुस्तकांची आणि दैनिक साप्ताहिकांची हीच मुख्य बाजारपेठ आहे. ज्येष्ठ लेखकाप्रमाणेच बुद्धिमान तरुण लेखक येथे आहेत. याकडे लक्ष वेधले आहे. या भाषणत ललित वाङमय कलावादी भूमिकेच्या मर्यादा, जीवनवादी - ध्येयवादी दृष्टी यांचे विवेचन करताना ‘वास्तव जीवनाचे सोने, विचारांचा प्रज्वलित अग्नी आणि कलाकुशल सुवर्णकारांची निर्माणशक्ती यांच्या त्रिवेणी संगमावाचून शारदेच्या भांडारात मोलाची भर घालणारा अलंकार तयार होणेच शक्य नसते.’ असे प्रतिमात्मक भाषेत विधान केले आहे. परंतु आपले लेखक चिंतनात कमी पडतात असे, ते म्हणतात. इंग्लंडमधील बेनेट (व्यवसायिक लेखक), एव.जी. वेल्स (पढिक पंडित), गॉल्सवर्दी (न्यायाधीशांची समतोल वृत्ती) जॉर्ज बनॉर्ड शॉ (कुशल शस्त्रवैद्याची बुद्धी) हे चौघे लेखक कलावंताने विचारवंत असणेही आवश्यक आहे हे स्पष्ट करतात, असे खांडेकर म्हणतात. प्रचलित समाजाचे सत्य सर्वस्पर्शी चित्रण वाङ्मयसौंदर्याला प्रेरकच होते, असे सांगताना टर्जिनेव्ह, डोस्टोवस्की, टॉलस्टॉय्र मॅक्झिम गॉर्की यांचे दाखले देतात. ललित वाङ्मयात जीवनदृष्टी ही असायलाच हवी, मार्क्स व फ्राईड यांचाही अभ्यास हवा, लेखकांनी सामाजिक बंडखोरी करायला हवी इत्यादी विचारही मांडले आहेत. सोलापुरात झालेल्या पहिल्याच जिल्हा साहित्य संमेलनात तेथील साहित्यकारांचा प्रथम गौरवपूर्ण उल्लेख करून, मराठी साहित्याची सद्य:स्थिती आशावादी आहे, केळकर-वरेरकर-फडके यांचे लेखनवैपुल्य पाश्चात्य लेखकांच्या तोडीचे आहे, लघुकथा-लघुनिंबध, एकांकिका वगैरे नवे प्रकार उत्साहाने लिहिले जात आहेत, वाङ्मयीन वादही लढवले जात आहेत, याची नोंद घेतलेली आहे. कला व जीवन या वादाच्या विस्तृत परामर्श घेतांना आपली जीवनवादी भूमिका कशी महत्त्वपूर्ण आहे. याचे समर्थन केले आहे. वास्तववादी व सामाजिक चित्रण प्रमुख भूमिकांभोवती असणारे विभूतिमत्त्वाचे वलय, भाषेचा सुबोधपणा भाषाशुद्धी वाद, सावरकरांची लिपी सुधारणा चळवळ अशा अनेक बाबींवरचे मतप्रदर्शन आहे. सहाव्या न झालेल्या भाषणात या पाच भाषणांच्या वेळची स्थिती, समारंभातील मौजमजा (एका हाता छापील भाषण व दुसऱ्या हातात माईक घेऊन बोलताना करावी लागलेली कसरत - यामुळे पुâटलेला घाम) खांडेकर सांगतात. अध्यक्षीय भाषण हे सद्य:स्थितीत मामुली व परिणामकारक होत असल्याची खंतही त्यांना वाटते. संमेलनातील चर्चाविषयात नावीन्य हवे, अभ्यासू व वक्तृत्वशैली असणारे वक्ते हवेत अशी सूचना ते करतात. आजही या सर्व बाबींबद्दल परिस्थितीत फरक पडलेला नाही. असे दिसते. गेल्या साठ वर्षांत मराठी वाङ्मय लेखकांच्या भूमिका, विविध वाङ्मयीन वाद, सभा संमेलनाबाबतच्या भूमिका यात काही फरक पडलेला नाही. या भाषणांतील मुद्यांवरून जाणवते. खांडेकरांचे विचार वक्तृत्वपूर्ण अलंकारिक शैलीत प्रकट होतात. आपल भूमिका मांडताना ते समन्वयवादी होतात. त्यामुळे टोकाला जात नाहीत. कुठलाच विचार पूर्णत्वाला जात नाही, हेही ते जाणतात. ही भाषणे वाचताना खांडेकर आपल्याशी बोलत आहेत असे वाटते. साठ वर्षांपूर्वीची ही भाषणे असली तरी ती आजही जुनी वा कालविसंगत नाहीत. खांडेकरांचे शरसंधानही रंजक व मार्मिक असे. ‘हरिभाऊंच्या वङ्काघाताचे पहिले प्रकरण वाचावे. कापड दुकान व शिंप्याचे दुकान यातील बारकावे त्यातील मेहेरजनाचे वर्णन वाचून कळणार नाही. हे खरे (पृष्ठ ८०) मतप्रतिपादनाच्या धोंड्याने वरेरकरांच्या कलेचा कपाळमोक्ष झाला, असे नाही. (पृष्ठ ८१) ‘गाय हा उपयुक्त प्राणी आहे, याबद्दल चहा, दूध, तूप वगैरेवर सर्रास बहिष्कार पडेपर्यत तरी मतभेद होणार नाहीत. पण ती देवता आहे, असे आजच्या तरुणांना सांगितले तर या देवतेच्या मारक्या शिंगांची व्यवस्था काय, या प्रश्नांचे उत्तर देण्याची तयारी हवी.’ (पृष्ठ ६४) ‘गणपतीच्या लहानपणी मी कसा झालो हे पुस्तक नव्हते म्हणून बरे नाही तर त्याने पार्वतीला नाही नाही ते प्रश्न विचारून पुरे केले असते आणि ते प्रश्न ऐकून स्मशानापेक्षाही अधिक एकान्तांची जागा शोधण्याचा मोह शंकराला झाला असता’ (पृ. ६४) पुणे हे महाराष्ट्राचे माहेरघर आहे, असे मी म्हटले तर छे! छे! तिथे साऱ्या महाराष्ट्राला सासुरवास भोगावा लागतो.’ असे उद्गार काढणारे तीर्थस्वरूप वाङ्मयसेवक मला ठाऊक आहेत. (पृ ४९) ‘पण या संमेलनाच्या निमित्ताने एक आणा किमतीचे पुणेवर्णन लिहिणे योग्य होणार नाही.’ (पृ. ४९) ‘नाटकात खादाड विदूषकाची जागा आचरट कवीने घेतलेली दिसते. क्वचित कवी रजेवर गेला तर मास्तर त्याचे बदली काम करतो. दोघेही बिचारे गरीब प्राणी! (पृ. ६२). अशा कल्पक विधानामुळे खांडेकरांच्या भाषणांना रंगत येई. -शंकर सारडा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more