* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANRAGINI DURGARANI
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745491
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 48
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO SET
Quantity
"INDIA; A LAND OF GREAT PEOPLE; SAINTS AND PATRIOTS; SAGES AND SOCIAL WORKERS; IN THE STRUGGLE OF FREEDOM, ENDLESS NUMBER OF PEOPLE SACRIFICES THEMSELVES COMPLETELY AND TOTALLY; MANY REMAIN ANONYMOUS TODAY; THE GREAT LEADERS SHOULDERED THE RESPONSIBILITY OF LEADING THE COMMON PEOPLE AND IGNITE THEIR MINDS WITH UNCOMMON WILL TO FIGHT FOR THE FREEDOM; NEITHER THE COMMON MEN, NOR THE WOMEN, THE CHILDREN OR THE LEADERS HESITATE TO OFFER THEIR LIVES AT THE FEE OF MOTHER INDIA, IN AN ATTEMPT TO FREE HER FROM THE CLUTCHES OF THE BRITISH. WE OWE THE INDEPENDENCE, PROSPERITY AND HERITAGE TO THEM. THIS BOOK ALLOWS US TO MEET SOME OF THESE LEADERS; IT ALSO BRINGS IN RENOWNED WORLD-FAMOUS PERSONALITIES ACROSS NATIONS. I AM SURE THAT YOU ARE EAGERLY WAITING TO INTERACT WITH THEM. "
"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतवंÂच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!"

No Records Found
No Records Found
Keywords
RANRAGINI DURGARANI, R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. पतीच्या निधनानंतरही स्वराज्यासाठी, प्रजेसाठी झटणाऱ्या गोंडवनाच्या रणरागिणी दुर्गाराणी यांची चरित्रकथा मुलांना प्रेरणादायी वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Pawan Chandak

`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे ? गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील ? पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील ? शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का ? त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का ? तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more

LEFT TO TELL
LEFT TO TELL by IMMACULEE ILIBAGIZA, STEVE ERVIN Rating Star
Sandip Darwade

आफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more