* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR MAIN PURA PAYA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177666830
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`I FEEL CONTENTED WITH THE THOUGHT OF DEATH, OF WHICH ALL ARE SCARED.`_ KABIR. THOSE WHO ARE IGNORANT ARE SCARED OF DEATH. THOSE WHO UNDERSTAND DEATH, HAVE CONQUERED LIFE. DEATH IS THE SUPREME BEAUTY OF THIS WORLD. IF YOU WANT TO DESTROY YOUR SHADOW, YOU JUST HAVE TO STAND STILL AT A PLACE, THIS KILLS YOUR SHADOW. THE SAME THING APPLIES TO DEATH. THE MORE YOU TRY TO RUN AWAY FROM DEATH, THE MORE IT WILL FOLLOW YOU. BUT STAND STILL, GIVE IT A FEARLESS GLANCE AND YOU WILL FIND ELIXIR IN IT. STOP AND FACE THE DEATH. LEARN TO RECOGNIZE DEATH. YOU WILL COME ACROSS THE GOD. OSHO TRIES TO REVEAL NEW MEANING FROM KABIR`S `DOHA`. OSHO`S SIMPLE LANGUAGE MIGHT HELP YOU TO COME ACROSS THE TRUE MEANING OF LIFE.
``सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते.`` — कबीर जे अज्ञानी आहेत तेच मृत्यूला घाबरतात. ज्यांनी मृत्यू ओळखला आहे, त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्यूचेही तसेच आहे. मृत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्यूला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोह्यांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 24-09-2006

    आपल्या जीवनाविषयी, भोवतालच्या जगाविषयी अनेक प्रश्न ‘मृत्यू’ विषयीचे असतात. जन्माकडून मृत्यूकडे होणाऱ्या प्रवासात आपण सुखदु:खाच्या छायाप्रकाशात चाचपडत असतो. अशा वेळेस जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी भगवान रजनीश उर्फ ओशो यांची पुस्तके निश्चितच मार्गदर्श ठरतात. त्यातलेच एक पुस्तक ‘मृत्यू अमृताचे द्वार’ ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या ‘कहे कबीर मैं पुरा पाया’ या हिंदी पुस्तकातील सात ते तेरा प्रकरणे मीना टाकळकर यांनी मराठीत अनुवाद केली आहेत. या सात प्रवचनांचे संकलन म्हणजेच ‘मृत्यू अमृताचे द्वार’ संत कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ओशो यांनी जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे. पहिले प्रवचन आहे, ‘जो जागा झाला त्यालाच ईश्वर भेटला! कबीर म्हणतात, ‘भैर चढै सो अधधर डूबै।’ या दोह्याचे विश्लेषण ओशोंनी केले आहे. कोणत्याही नावेमध्ये चढलात तरी प्रवाहाच्या मध्यभागी ती डुंबणारच. ‘निराधार भार पार’ ज्यांनी कोणत्याही आधार घेतला नाही, ते पैलतीरी सहज पोहोचतील. याबद्दल ओशो म्हणतात, जो नावेमध्ये चढला त्याच क्षणी त्याचे डुबणे सुरू झाले. कारण तो पोहू शकत नव्हता. म्हणून तर तो चढला. हा जीवनाचा प्रवास खरे तर एकट्याचा आहे. तो एकट्यानेच पोहून पार करावयाचा आहे. कुणावरही अवलंबून न राहाता स्वत:च्या सामर्थ्याने, श्रद्धा विश्वासाने पार पाडायचा असतो. कबिरांच्या वचनांचा अर्थ ओशोंनी वेगवेगळ्या दृष्टातांनी दाखले देऊन उलगडून सांगितला आहे. जो निराधार आहे तो त्याचा त्यालाच आधार आहे. जर परमेश्वराला आधार बनवले तर तुमच्या परमेश्वरांची काय किंमत राहिली? तुमचा परमेश्वर म्हणजे तुमची कल्पना आहे. जर तुम्ही परमेश्वराचा आधार न मानता स्वत:च स्वत:चा आधार झालात तर तिथेच परमेश्वर आपण होऊन आधार देतो, त्याआधी नाही. ‘एक परम समाधान’ या दुसऱ्या प्रवचनातही ‘अहंकारा’ विषयीचे कबिराचे वचन उलगडून सांगितले आहे. ते म्हणतात. अहंकार अडचण आहे, समर्पण उकल आहे. अहंकाराने रोग निर्माण केले तर समर्पणामुळे ते संपतील म्हणून तर सगळ्या शास्त्रांनी सगळ्या परंपरांनी समर्पणाचा महिमा गायला आहे. एक महत्त्वाचे सूत्र ओशोंनी सांगितले आहे की, आपला प्रश्न नीटपणे समजून घेतला आहे, त्यांचे समाधान होईल. दुसरे कुठेही नाही तर प्रश्नामध्येच उत्तर लपले आहे. ज्याला तुम्ही शोधताय ते कुठेही दुसरीकडे नसून ते तुमच्यातच दडले आहे. ‘अमृताचे दार मृत्यू आहे’ या तिसऱ्या प्रवचनात ‘मृत्यू’ संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखवला आहे. एका बाजूने बघताना जीवन मृत्यू आहे. दुसऱ्या बाजूने बघताना जीवन संपूर्ण परमानंद वाटते. ते पूर्ण परमानंद आहे. ते उच्च परमजीवन आहे. बघण्याच्या दृष्टिकोनावर सारे अवलंबून आहे. चवथे प्रवचन ‘संन्यास परम सौभाग्य आहे.’ या शिर्षकाचे आहे. प्रत्येकच प्रवचनात सुरुवातीला कबिराच्या ओव्या दिल्या आहेत आणि पुढे प्रवचनात त्या ओवीचा अर्थ उदाहरणं, दाखले, देऊन ओशोंनी समजावून सांगितला आहे. पाचवे प्रवचन आहे ‘पंडितापासून सावधान’ या प्रवचनात कबिराविषयी आपल्याला काय वाटते ते ओशो सांगतात. ते म्हणतात. संतांमध्ये कबिराच्या तोडीचे कोणीच नाही. सगळे संत अद्भूत आहेत. त्याचे अद्वितीयपण हे आहे की त्यांचे उसने असे काहीच नाही. कबिराचा मार्ग मोठा सरळ-साधा आहे. खूप कमी लोकांचा रस्ता इतका सरळ साधा असतो. वाकड्या तिरक्या गोष्टीं कबिरांना पसंत नाहीत म्हणूनच त्यांच्या मार्गाचे नाव आहे ‘सहजयोगी’ण् सहावे प्रवचन आहे ‘शून्यामध्ये उडी’ या प्रवचनात चर्चा केली आहे ते मुद्दे म्हणजे - (१) मी शून्य होत आहे आता काय करू? (२) धर्मगुरुंसारखा कबिराचा व्यापक प्रभाव का पडला नाही? (३) दु:खापासून मुक्ती कशी मिळेल? (४) माझ्यावर गुरुकृपा कधी होईल? या चार मुद्यांवर कबिराच्या वचनांचा अर्थ सांगत उदाहरणे देऊन ओशोंनी चर्चा केली आहे. त्यात शेवटी म्हटले आहे की, माळी कोणतीही फुले स्वत:हून उमलवत नाही. पाणी देतो, खाद्या देतो परंतु कोणतेही फूल हाताने उमलवत नाही. रोपट्याला सुद्धा संधी देतो, की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा पिकेल, जेव्हा वसंत येईल, जेव्हा फुलांच्या आत उमलण्याची क्षमता निर्माण होईल, तेव्हा फूल आपणहून उमलेल. आपणहून उमलणे हा सहजयोग आहे. सहजतेला समजलात तर कबिराला समजलात. शेवटच्या प्रवचनाने शीर्षक आहे ‘शब्दांची साधना करो’ जे शब्द शांतता आणि शीतलतेपासून येतात. असेच शब्द ऐका. क्रोध, शत्रुत्व, हिंसा आणि तिरस्काराचे शब्द ऐकायचे नाहीत. त्याचप्रमाणे युद्ध आणि विषाने भरलेला शब्द ऐकू नका. जेव्हा मनामध्ये तिरस्कार निर्माण होईल तेव्हा एकांतात बसा. परमेश्वराचे स्मरण करा. शीतल व्हा, शीतल बोला, शांतता ही जीवनशैली बनवा. तीच तुमची जीवनप्रणाली आहे. शांत होता होता, साधक होता होता एक दिवस तुम्ही साधू होऊन जाल. साधू होता एक दिवस तुम्ही कृतार्थ होऊन जाल. ‘मृत्यू अमृताचे द्वार’ हे पुस्तक म्हणजे कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ‘ओशो’नी दिलेला जीवनाचा नवा अर्थ वाचकांना मार्ग दर्शविणारा आहे. ओशोंच्या रसाळ भाषेतल हे चिंतन जीवन-मृत्यूसंबंधी तत्वज्ञान सांगणारे आहे. -रजनी अपसिंगेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती