Shop by Category INTERVIEWS (1)SCIENCE (36)RELIGIOUS & SPIRITUALS (31)PLAY (20)COMBO SET (53)GIFT COUPON (8)DICTIONARY (1)PHILOSOPHY (6)BIOGRAPHY (142)TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE (8)View All Categories --> Author S. V. KASHYAPE ()AGARWAL GANGABHISHAN ()APARNA NAYAGAONKAR ()SUDHIR KAUTHALKAR ()SIMON LEWIS ()VASUNDHARA PENDSE NAIK ()SHRINIWAS ()HILLARY RODHAM CLINTON ()SANJAY RAUT ()AZHARUDDIN MOHAMMED ISMAEL ()UDAY BHIDE ()
Latest Reviews DIGVIJAY by B. D. KHER, RAJENDRA KHER Ravindra Parse दिग्विजय, नेपोलीयन बोनापार्ट... ही कादंबरी वाचायला घेतली आणि काय सांगु मित्रांनो ती ख़ाली ठेवलीच जात नव्हती.. या पुस्तक़ात मी अक्षरशः गुन्तलो होतो. नेपोलीयन ग्रेट होता ही माहीत होतं पण या कादंबरी नंतर तर मी त्याचा फ़ैनच झालोय. ४ दिवसात वाचुन संपावलेी कादंबरी आनी बोनापार्ट चे आयुष्य यावर अजुनहि विचार चालू आहें ज़णूकाही बोनापार्ट फ़ीवरच चढलाय मला.... ...Read more ADNYAT by CHHAYA MAHAJAN महाराष्ट्र टाइम्स अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो. `सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. `निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. `अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं. ...Read more
DIGVIJAY by B. D. KHER, RAJENDRA KHER Ravindra Parse दिग्विजय, नेपोलीयन बोनापार्ट... ही कादंबरी वाचायला घेतली आणि काय सांगु मित्रांनो ती ख़ाली ठेवलीच जात नव्हती.. या पुस्तक़ात मी अक्षरशः गुन्तलो होतो. नेपोलीयन ग्रेट होता ही माहीत होतं पण या कादंबरी नंतर तर मी त्याचा फ़ैनच झालोय. ४ दिवसात वाचुन संपावलेी कादंबरी आनी बोनापार्ट चे आयुष्य यावर अजुनहि विचार चालू आहें ज़णूकाही बोनापार्ट फ़ीवरच चढलाय मला.... ...Read more
ADNYAT by CHHAYA MAHAJAN महाराष्ट्र टाइम्स अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो. `सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. `निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. `अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं. ...Read more