THIS BOOK GUIDES PARENTS ON HOW TO BRIDGE THE GROWING GAP IN PARENT-CHILD RELATIONSHIPS IN TODAY`S TIMES AND HOW THEY CAN CHANGE THEMSELVES AND EMPOWER THEIR CHILDREN THROUGH EFFECTIVE COMMUNICATION. THE AUTHOR SUGGESTS USING "WILL YOU DO IT?" INSTEAD OF "CAN YOU DO IT?" WHEN COMMUNICATING WITH CHILDREN. EXPLAINING THE SUBTLE BUT SIGNIFICANT DIFFERENCE, THE AUTHOR STATES THAT "CAN YOU DO IT?" IMPLIES A HIDDEN DOUBT, WHILE "WILL YOU DO IT?" REFLECTS TRUST IN THE CHILD. HOWEVER, PARENTS SHOULD ALSO MAINTAIN THEIR SELF-CONFIDENCE, AVOID CONSTANTLY GIVING IN, AND REFRAIN FROM OVER-EXPLAINING THINGS TO THEIR CHILDREN. CHILDREN DON`T NEED PERFECT PARENTS; BUT THEY DEFINITELY NEED PARENTS WHO WILL STRIVE THEIR BEST AND TAKE RESPONSIBILITY FOR THEIR MISTAKES INSTEAD OF BLAMING OTHERS. THIS WAY, CHILDREN WILL LEARN TO TAKE RESPONSIBILITY FOR THEIR OWN MISTAKES BY EMULATING THEIR PARENTS. THIS IS WHAT THE BOOK CONVEYS.
आजच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.