* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789357204774
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2025
  • Weight : 220.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : INFORMATIVE
Quantity
ARE YOU LOOKING FOR A LEADERSHIP MODEL THAT IS UNCOMPLICATED, EASY TO USE AND PRODUCES AMAZING RESULTS? IF SO, THEN LEADING FROM THE BACK IS FOR YOU! IN IT YOU WILL FIND EVERYTHING YOU NEED TO BECOME A SUPERSTAR LEADER. YOU WILL LEARN HOW TO EARN RESPECT FROM YOUR TEAM MEMBERS AND HELP THEM IN ACHIEVING THE IMPOSSIBLE. NO MORE LEARNING ABOUT NUMEROUS PRINCIPLES AND LAWS OF LEADERSHIP. JUST A THREE-PART MODEL THAT HAS AN AMAZING TRACK RECORD OF PROVEN SUCCESS. THROUGH AN ENGAGING PARABLE ABOUT THE TRAVAILS OF AN UPCOMING YOUNG MANAGER, SHIV KUNDRA, WHOSE LEADERSHIP STYLE HAMPERS BOTH HIS ABILITY TO LEAD AND HIS ABILITY TO DELIVER, THE AUTHORS OUTLINE THE FASCINATING CONCEPT OF `LEADING FROM THE BACK`. LEADING FROM THE BACK IS A DISTILLATION OF THE COLLECTIVE EXPERIENCE AND WISDOM OF RAVI KANT (FORMER CEO, VICE CHAIRMAN, TATA MOTORS), HARRY PAUL (CO-AUTHOR OF THE BESTSELLER FISH! A PROVEN WAY TO BOOST MORALE AND IMPROVE RESULTS) AND ROSS RECK (CO-AUTHOR OF THE WIN-WIN NEGOTIATOR).
‘सुपरस्टार लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकात मिळतील. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांकडून आदर कसा मिळवू शकाल हे तुम्हाला या पुस्तकातून शिकता येईल, तसेच ‘असाध्य ते साध्य’ करण्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता हेही तुम्हाला या पुस्तकात समजेल. त्यासाठी नेतृत्वविषयक असंख्य सिद्धान्त व नियम शिकण्याची गरज नाही, फक्त या पुस्तकात सांगितलेले तीन भागांचे मॉडल पुरेसे आहे, ज्याची आश्चर्यकारक यशस्विता सिद्ध झालेली आहे. उद्योग जगतातील तज्ज्ञ रवि कांत, हॅरी पॉल व रॉस रेक यांच्या अनुभवसंचितातून साकारलेल्या या अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त कथारूप पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी अत्यंत सुबोध व ओघवता अनुवाद केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #अनुवादित #मार्गदर्शनपर #लीडिंगफ्रॉमदबॅक #रविकांतहॅरीपॉलरॉसरेक #सुप्रियावकील #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATION #INFORMATIVE #LEADINGFROMTHEBACKT #RAVIKANTHARRYPAULROSSRECK #SUPRIYAVAKIL
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more