BHADRAKALI TARARANI`... A LUMINOUS SPARK FROM THE MOHITE-BHOSLE LINEAGE... THE DAUGHTER-IN-LAW OF CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ... A WARRIOR QUEEN WHO SWALLOWED THE GRIEF OF WIDOWHOOD AT THE AGE OF TWENTY-FIVE AND ROSE TO PROTECT SWARAJYA... A HEROINE WHO STOOD TALL AGAINST MIGHTY ENEMIES LIKE THE MUGHALS AND THE CRUEL AURANGZEB... A SHREWD STATESWOMAN WHO MADE ASTUTE DECISIONS ON THE BATTLEFIELD AND IN GOVERNANCE... A RESOLUTE WOMAN WHO PRESERVED HER IDENTITY AND SELF-RESPECT, EVEN ENDURING IMPRISONMENT RATHER THAN YIELDING TO SHAHU MAHARAJ’S TEMPTATIONS... A COURAGEOUS SOUL WHO BORE THE ANGUISH OF HER SON`S DEATH, KEPT HER GRANDSON IN EXILE, AND PLACED HIM ON CHHATRAPATI’S THRONE WHEN THE RIGHT MOMENT ARRIVED... A POLITICAL TACTICIAN WHO HELD HER OWN AGAINST NANASAHEB PESHWA. THIS GLORIOUS SAGA OF TARARANI’S VALOR IS UNRAVELED FROM THE PAGES OF HISTORY BY SUVARNA NAIK NIMBALKAR.
‘भद्रकाली ताराराणी’ ...मोहिते-भोसले घराण्यांतील एक तेजशलाका...शिवाजी महाराजांची स्नुषा...वयाच्या पंचविसाव्या वर्षी वैधव्याचं दु:ख गिळून स्वराज्यरक्षणासाठी सिद्ध झालेली रणरागिणी...मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूला, औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला पुरून उरलेली वीरांगना...रणांगणात आणि राज्यकारभारातही चातुर्याने निर्णय घेणारी चतुरा...शाहू महाराजांच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वत्व, स्वाभिमान जपत प्रसंगी तुरुंगवास पत्करणारी खंबीर स्त्री...पुत्राच्या मरणाचं दु:ख सोसून, नातवाला अज्ञातवासात ठेवून, योग्य वेळ येताच त्याला छत्रपतींच्या सिंहासनावर बसवणारी धीरोदात्त स्त्री...नानासाहेब पेशव्यांना शह देणारी राजकारणपटू...ताराराणींच्या पराक्रमाची अशी ही तेजस्वी गाथा इतिहासाच्या पानांतून उलगडली आहे सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी.