RAVINDRA DHAMAPURKAR

About Author


TALGAON IN MALVAN TALUKA IS THE BIRTH VILLAGE OF RABINDRA DHAMAPURKAR. HE HAS RECEIVED DEGREES SUCH AS M. A. (MARATHI), M. A. (HINDI). HE TAUGHT IN THE FAMOUS TOPIWALA HIGH SCHOOL AND JUNIOR COLLEGE IN MALVAN. HE EARNED A REPUTATION AS A PEDAGOGIC AND A STUDENT-FRIENDLY TEACHER AND IS ALSO FAMOUS AS A SANTACHARITRAKAR (THE ONE WHO WRITES ABOUT SAINTS). HIS LITERARY CONTRIBUTION SO FAR HAS BEEN FIFTEEN FAMOUS AND INFAMOUS SAINTS PALATIAL BIOGRAPHIES, TRANSCENDENTAL WORSHIP, PRINCIPLE-CONTEMPLATIVE BOOKS RELATED TO SADHANA, SHABDBRAHMA, YA ITHE TARUTALI ETC. THE PORTRAITS IN HIS COLLECTION MALVANI MEN (UNPUBLISHED) ARE REMINISCENT OF P. L. DESHPANDES VAKTI AND VALLI. HIS WRITINGS HAVE BEEN PRAISED BY RENOWNED SENIOR WRITERS SUCH AS DURGA BHAGWAT, MADHU MANGESH KARNIK ETC.

मालवण तालुक्यातील तळगाव हे रवींद्र धामापूरकर यांचं जन्मग्राम. एम. ए. (मराठी), एम. ए. (हिंदी) बी.एड. अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. त्यांनी मालवणच्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूलमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन केले. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. ‘संतचरित्रकार’ म्हणून प्रख्यात. आतापर्यंत पंधरा प्रसिद्ध-अप्रसिद्ध संतांचे रसाळ, प्रासादिक चरित्रग्रंथ, पारमार्थिक उपासना, साधनेसंबंधी तत्त्व-चिंतनात्मक ग्रंथ, ‘शब्दब्रह्म’, ‘या इथे तरुतळी’ हे लेखसंग्रह इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांच्या ‘मालवणी माणसे’ (अप्रकाशित) या संग्रहातील व्यक्तिचित्रे पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्लीं’ची आठवण करून देतात. दुर्गा भागवत, मधु मंगेश कर्णिक इ. नामवंत ज्येष्ठ साहित्यिकांकडून त्यांच्या लेखनाची प्रशंसा झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BHAVGIRI Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.