Kanchan Ghanekar

About Author

Birth Date : 16/09/1947


MRS. KANCHAN KASHINATH GHANEKAR IS THE DAUGHTER OF VETERAN FILM ACTRESS SULOCHANA AND WIFE OF FILM AND THEATER ACTOR KASHINATH GHANEKAR. HE WAS BORN ON 16 SEPTEMBER 1947. HE DID HIS BA IN MARATHI AND PHILOSOPHY FROM MUMBAI UNIVERSITY. DEGREE AND M.A. FROM THE SAME UNIVERSITY. THIS DEGREE WAS ACQUIRED WITH THE SUBJECTS OF MARATHI AND LINGUISTICS.

श्रीमती कांचन काशिनाथ घाणेकर या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुलोचना यांची कन्या आणि सिने-नाट्य अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर१९४७ रोजी झाला. त्यांनी मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठातून एम.ए. ही पदवी मराठी व भाषाशास्त्र या विषयांसह संपादन केली. १९६९ पासून विविध वृत्तपत्रांतून, सिनेसाप्ताहिकांतून आणि दिवाळी अंकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नाथ हा माझा या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या त्यांच्या चरित्रग्रंथाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स तर्पेÂ केल्या गेलेल्या दशकातील १०१ मराठी पुस्तकांच्या यादीत चरित्र विभागात या पुस्तकाची नोंद झाली आहे. भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, सुलोचना, राजा परांजपे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील १५ दिग्गजांवरील व्यक्तिचित्रांवर आधारित रेशीमगाठी हा लेखसंग्रहही मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला असून, त्याच्याही तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीवर आधारित आठवणींचं पुस्तक माझी माणसं याचं लेखन सध्या त्या करत आहेत. नाट्यविषयक लोकप्रिय ग्रंथ गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती विश्वस्त प्रतिष्ठानच्या त्या सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेकरीता, म.टा. सन्मान - महाराष्ट्रतर्फे आयोजित स्पर्धेकरीता (चित्रपट विभागासाठी), महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाकरीता, चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी दोनदा आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
24 %
OFF
KANCHAN GHANEKAR COMBO SET - 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 565 INR 429
NATH HA MAZA Rating Star
Add To Cart INR 395
RESHIMGATHI Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book