ALEX PATTAKOS ,CO-AUTHOR ELAINE DUNDON

About Author


HE IS CO-FOUNDER OF THE GLOBAL MEANING INSTITUTE AND COAUTHOR WITH ELAINE DUNDON OF THE INTERNATIONAL BEST-SELLING BOOK, PRISONERS OF OUR THOUGHTS: VIKTOR FRANKLS PRINCIPLES FOR DISCOVERING MEANING IN LIFE AND WORK, AVAILABLE IN OVER 20 LANGUAGES AND NOW IN A 3RD, REVISED AND EXPANDED, EDITION.

अॅलेक्स पॅटाकोस हे परिवर्तनशील विचारप्रणालीचे प्रणेते म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. द इनोव्हेशन ग्रुपचे ते प्रमुख आहेत. न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील सेंटर फॉर पर्सनल मीनिंगचे ते संस्थापक आहेत. रेनेसॉन्स बिझनेस असोसिएट्स (आर. बी.ए.) नावाच्या, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अध्यक्ष होते. दांडगा उत्साह, प्रेरणादायी व चैतन्यमय स्वभाव, प्रशिक्षणार्थीना हाताळण्याची पद्धत आणि सर्व स्तरांवर बदल घडवून आणण्याची हातोटी यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. वक्ता, लेखक, सल्लागार आणि चर्चेत विषयाची प्रगती घडवून आणणारी व्यक्ती अशा सर्व भूमिकांत पॅटाकोस आपले विशिष्ट दृष्टिकोन व अनुभवांचा वापर करून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना उत्साहित करीत, भविष्यासाठी योजना करण्याचा नवा मार्ग दाखवितात. वैयक्तिक सल्लागार व प्रशिक्षक या नात्याने ते, व्यवस्थापक, नामवंत खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगार, सेवानिवृत्त व्यक्तींस आपल्या रोजच्या व व्यावसायिक जीवनातील अर्थ शोधण्यास मदत करतात. उद्योगधंदा, सरकारी आणि धर्मादाय संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामूहिकता निर्माण करण्याचा त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध संस्थांतील वेगवेगळ्या स्तरांवरील कर्मचाऱ्यांची; नवनिर्मितीक्षम निर्णय घेण्याची, संस्थेचे कामकाज शिकण्याची, नेतृत्व करण्याची, यंत्रणेची मांडणी करता येण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या ग्राहकांच्या नामावलीत फॉर्म्युन ५०० नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PRISONERS OF OUR THOUGHTS Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book