Shop by Category BIOGRAPHY (142)NONE (1)HUMOUR (7)COMBO SET (68)SCIENCE (36)ILLUSTRATIVE (1)GIFT COUPON (8)DRAMA (3)MIND BODY & SPIRIT (5)SOCIETY & SOCIAL SCIENCES (1)View All Categories --> Author JOHN LANE ()VILAS WADKAR ()SHOBHA DILIP CHITRE ()ANANTMURTI U. R. / SMT ESTHER ANANTHMURTI ()DADASAHEB MORE ()BAGE ASHA ()ASHOK JAIN ()DR.RAJAN VASANT JOSHI (JOSHI V. K.) ()PRADHAN RAM ()S. L. SHNEIDERMAN ()VIJAYDAN DETHA ()
Latest Reviews TO SIR, WITH LOVE by E.R. BRAITHWAITE Pradeep Talekar पुस्तक परिचय - पुष्प १ ले *टू सर विथ लव्ह* मूळ इंग्लिश लेखक - श्री. इ आर ब्रेथवेट. अनुवादिका - श्रीमती लीना सोहोनी. प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. परिचय कर्ता: प्रदीप तळेकर, पुणे +919850899387 एक छोटीशी कादंबरी म्हणा किंवा आत्मलेखन म्हणावेअसे पुस्तक. पुस्तकाचा नायक म्हणजे स्वतः लेखक, श्री ब्रेथवेट, एक कृष्णवर्णीय तरुण गृहस्थ. इथे कृष्णवर्णीय हे महत्वाचे म्हणून त्याचा उल्लेख आवर्जून केलेला. एक सत्य कहाणी आपण पुस्तक वाचत असताना उलगडते आणि आपण या ओघवत्या अनुवादात या आत्मकथनात गुंतत जातो जसा नायक त्याच्या कथानकात गुंतलेला आढळतो. दुसऱ्या महायुध्दात आपला नायक हा रॉयल एअरफोर्स मध्ये ग्राउंड क्रू मध्ये काम करत असे. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर. युद्ध संपल्यावर साहजिकच सक्तीची निवृत्ती पत्करावी लागलेली. मग नोकरीसाठी वणवण चालू, त्यावेळच्या युद्धाने उध्वस्त झालेल्या इंग्लंडमध्ये, मुख्यतः लंडनमध्ये. योग्य शैक्षणिक पात्रता आणि एअरफोर्स मधील अनुभव याच्या जोरावर सहज नाही तरी काही प्रयत्नांनी नोकरी मिळेल या आशेवर हा तरुण बाहेर पडतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे लगेच नोकरी मिळेल ही अपेक्षा नसतेच. पण त्याला तो केवळ कृष्णवर्णीय आणि इंग्लंडमध्ये न जन्मलेला इंग्लिश माणूस असल्यामुळे नोकरी मिळणे किती दुरापास्त होते याचे वर्णन म्हणजे ब्रिटिशांच्या वर्णद्वेषाचा धगधगता नमुना आहे. इंग्लंड बाहेरचा म्हणजे लेखकाचा जन्म गयानातील जॉर्जटाऊन येथील निग्रो घरातील. आता आपण मुख्य आशयाकडे वळणार आहोत. अनेक अपमान, शिव्याशाप मूग गिळून प्राप्त केल्यावर नायकाला एक अतिशय सामान्य अशी शिक्षकाची नोकरी मिळते. तीही कुठे, तर अतिशय गलिच्छ, अतिदारिद्री अशा वस्तीत टग्या मुलामुलींच्या शाळेत जिथे जागोजागी दलाल, वेश्या, अमली पदार्थ आणि त्याची जोड म्हणून खून मारामारी करणाऱ्यांचे साम्राज्य असते. याहून कहर म्हणजे, ही शाळा देखील प्रामुख्याने गोऱ्या मुलांची असते आणि हातावर बोटे मोजण्या एवढी कृष्णवर्णीय मुलांची. त्यात परत धार्मिक विघटन असतेच. त्यामुळे एकूणच समाजातील व्यक्ती आणि वर्ण द्वेष येथेही असतो. प्रथमच शिक्षकाची नोकरी करणाऱ्या नायकाला सोपवला जातो सर्वात मोठ्या मुलांचा आणि मुलींचा वरचा वर्ग. सूड, राग, द्वेष, उद्धटपणा, बेशिस्त या भावनांनी भरलेल्या मुलांच्या घोळक्यात आपला नायक येतो तीच आव्हाने घेऊन. शाळेचे हेडमास्तर आणि इतर बरेचसे शिक्षक त्यांच्यातील दोष लक्षात घेतले तरी चांगले असतात आणि या मुलांवरही प्रेम करीत असतात काही ध्येयाने प्रेरित होऊन. पुढे कथानकात या मुलांशी होणारा नायकाचा सामना, त्याचा त्यांच्याशी होणारा विविधतेचा संवाद किंवा विसंवाद यांचा परिचय होत जातो. या मुलांना सर्वसाधरण स्वच्छतेचे, म्हणजे अगदी हात धुणे, आंघोळ करणे ते नीटनेटके राहणे यांचे धडे तो कश्यातर्हेनें देतो, त्यांना धडपडत सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याचे कष्ट घेतो हे वाचण्यासारखे आहे. बंडखोरीचे मुलांच्या आत्मविश्वासात तोच रूपांतर करतो. यातच त्याचा संयत प्रेमाचा प्रवास देखील हळुवारपणे पण कष्टाने उलगडला जातो. अनेकवेळेला वाचताना डोळे भरून येतात आणि नकळत वाहू लागतात. एक सामान्य तरुण ध्येयाने प्रेरित झालेला शिक्षक कसा घडतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास कसा हातभार लावतो याचे हे कथानक म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आणि प्रेरणास्थानच आहे. खूप काही सांगता येईल किंवा लिहिताही येईल. पण तो वेळेचा आणि आशयाचा अपव्यय होईल. त्यामुळे एकच सांगून थांबतो, ते म्हणजे प्रत्येकाने हा अनुवाद किंवा मूळ इंग्रजी पुस्तक जरूर वाचावे. कथानकाचा काळ हा दुसरे महायुद्ध संपल्या नंतरचे असले तरी अजूनही ते संदर्भहीन होत नाही यातच या लेखकाचे यश आहे. लेखन सीमा..... शुभम भवतू 💐 प्रदीप तळेकर, पुणे ...Read more TRISHANKU by SUDHA MURTY Pramod Shinde खुप वाचनीय पुस्तक
TO SIR, WITH LOVE by E.R. BRAITHWAITE Pradeep Talekar पुस्तक परिचय - पुष्प १ ले *टू सर विथ लव्ह* मूळ इंग्लिश लेखक - श्री. इ आर ब्रेथवेट. अनुवादिका - श्रीमती लीना सोहोनी. प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. परिचय कर्ता: प्रदीप तळेकर, पुणे +919850899387 एक छोटीशी कादंबरी म्हणा किंवा आत्मलेखन म्हणावेअसे पुस्तक. पुस्तकाचा नायक म्हणजे स्वतः लेखक, श्री ब्रेथवेट, एक कृष्णवर्णीय तरुण गृहस्थ. इथे कृष्णवर्णीय हे महत्वाचे म्हणून त्याचा उल्लेख आवर्जून केलेला. एक सत्य कहाणी आपण पुस्तक वाचत असताना उलगडते आणि आपण या ओघवत्या अनुवादात या आत्मकथनात गुंतत जातो जसा नायक त्याच्या कथानकात गुंतलेला आढळतो. दुसऱ्या महायुध्दात आपला नायक हा रॉयल एअरफोर्स मध्ये ग्राउंड क्रू मध्ये काम करत असे. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर. युद्ध संपल्यावर साहजिकच सक्तीची निवृत्ती पत्करावी लागलेली. मग नोकरीसाठी वणवण चालू, त्यावेळच्या युद्धाने उध्वस्त झालेल्या इंग्लंडमध्ये, मुख्यतः लंडनमध्ये. योग्य शैक्षणिक पात्रता आणि एअरफोर्स मधील अनुभव याच्या जोरावर सहज नाही तरी काही प्रयत्नांनी नोकरी मिळेल या आशेवर हा तरुण बाहेर पडतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे लगेच नोकरी मिळेल ही अपेक्षा नसतेच. पण त्याला तो केवळ कृष्णवर्णीय आणि इंग्लंडमध्ये न जन्मलेला इंग्लिश माणूस असल्यामुळे नोकरी मिळणे किती दुरापास्त होते याचे वर्णन म्हणजे ब्रिटिशांच्या वर्णद्वेषाचा धगधगता नमुना आहे. इंग्लंड बाहेरचा म्हणजे लेखकाचा जन्म गयानातील जॉर्जटाऊन येथील निग्रो घरातील. आता आपण मुख्य आशयाकडे वळणार आहोत. अनेक अपमान, शिव्याशाप मूग गिळून प्राप्त केल्यावर नायकाला एक अतिशय सामान्य अशी शिक्षकाची नोकरी मिळते. तीही कुठे, तर अतिशय गलिच्छ, अतिदारिद्री अशा वस्तीत टग्या मुलामुलींच्या शाळेत जिथे जागोजागी दलाल, वेश्या, अमली पदार्थ आणि त्याची जोड म्हणून खून मारामारी करणाऱ्यांचे साम्राज्य असते. याहून कहर म्हणजे, ही शाळा देखील प्रामुख्याने गोऱ्या मुलांची असते आणि हातावर बोटे मोजण्या एवढी कृष्णवर्णीय मुलांची. त्यात परत धार्मिक विघटन असतेच. त्यामुळे एकूणच समाजातील व्यक्ती आणि वर्ण द्वेष येथेही असतो. प्रथमच शिक्षकाची नोकरी करणाऱ्या नायकाला सोपवला जातो सर्वात मोठ्या मुलांचा आणि मुलींचा वरचा वर्ग. सूड, राग, द्वेष, उद्धटपणा, बेशिस्त या भावनांनी भरलेल्या मुलांच्या घोळक्यात आपला नायक येतो तीच आव्हाने घेऊन. शाळेचे हेडमास्तर आणि इतर बरेचसे शिक्षक त्यांच्यातील दोष लक्षात घेतले तरी चांगले असतात आणि या मुलांवरही प्रेम करीत असतात काही ध्येयाने प्रेरित होऊन. पुढे कथानकात या मुलांशी होणारा नायकाचा सामना, त्याचा त्यांच्याशी होणारा विविधतेचा संवाद किंवा विसंवाद यांचा परिचय होत जातो. या मुलांना सर्वसाधरण स्वच्छतेचे, म्हणजे अगदी हात धुणे, आंघोळ करणे ते नीटनेटके राहणे यांचे धडे तो कश्यातर्हेनें देतो, त्यांना धडपडत सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याचे कष्ट घेतो हे वाचण्यासारखे आहे. बंडखोरीचे मुलांच्या आत्मविश्वासात तोच रूपांतर करतो. यातच त्याचा संयत प्रेमाचा प्रवास देखील हळुवारपणे पण कष्टाने उलगडला जातो. अनेकवेळेला वाचताना डोळे भरून येतात आणि नकळत वाहू लागतात. एक सामान्य तरुण ध्येयाने प्रेरित झालेला शिक्षक कसा घडतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास कसा हातभार लावतो याचे हे कथानक म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आणि प्रेरणास्थानच आहे. खूप काही सांगता येईल किंवा लिहिताही येईल. पण तो वेळेचा आणि आशयाचा अपव्यय होईल. त्यामुळे एकच सांगून थांबतो, ते म्हणजे प्रत्येकाने हा अनुवाद किंवा मूळ इंग्रजी पुस्तक जरूर वाचावे. कथानकाचा काळ हा दुसरे महायुद्ध संपल्या नंतरचे असले तरी अजूनही ते संदर्भहीन होत नाही यातच या लेखकाचे यश आहे. लेखन सीमा..... शुभम भवतू 💐 प्रदीप तळेकर, पुणे ...Read more