* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NISARG ANI ITAR GOSHTI
 • Availability : Available
 • ISBN : 9789353172220
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 160
 • Language : MARATHI
 • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
CHILDREN STORY BOOKS
निसर्ग आणि पक्षी यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूप्रमाणे पशू-पक्ष्यांचे मनही बदलत असते. दुबळे जीव हिंस्त्र पशूंचे सहज भक्ष्य होतात. त्यांच्या तुलनेने आपले बंदिस्त असलेले मानवी जीवन सुरक्षित आहे, या कल्पनेने आपण सुखावतो. निष्पाप निरागसतेला काहीच अर्थ राहत नाही. प्राण्यांची जगण्यासाठी असलेली धडपड केविलपाणी वाटते; पण त्यांना कधीतरी वाचवायला त्यांचे मित्र एकत्रित येतात. जसे नागाचा फडशा पाडून पोपट व मुंगूस खारूताईसाठी धावून येतात. मदत करायची वृत्ती प्राण्यांमध्ये पण दिसून येते. जसे वाट चुकलेल्या देवमाशाला राजहंस समुद्रात परत पोहोचवितो व गवा सहानुभूतीने लांडग्याचा प्राण वाचवितो. पशू-पक्ष्यांतील जीवनाचे अनेक बारकावे पाहून आपण थक्क होऊन जातो. वृक्ष, प्राणी व पक्षी आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगत असतात व त्यांच्या माध्यमातून रंगीबेरंगी सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा परमेश्वराने पृथ्वीला वरदान म्हणून दिलेल्या आहेत, असे वाटते. परमेश्वर एक श्रेष्ठ चित्रकार आहेच. पाच पुस्तकांचा संच - १. गीर जंगल आणि इतर गोष्टी २.जीवदान आणि इतर गोष्टी ३. कौतुक आणि इतर गोष्टी ४. मैत्री आणि इतर गोष्टी ५. सृष्टी आणि इतर गोष्टी
Video not available
Keywords
#MARATHICHILDRENSLITERATURE #PANCHATANTRA #JATAKKATHA #HITOPDESHKATHA #SHAKESPEARESTORIES #RAJIVTAMBE #MANJUSHAAMDEKAR # मराठीबालसाहित्य #पंचतंत्र #जातककथा #हितोपदेशकथा #शेक्सपिअर #राजीवतांबे # कुमारसाहित्य #
Customer Reviews
 • Rating StarDAINIK LOKMAT 05-05-2019

  लहानांसाठी गोष्टीरूप निसर्गकथा... निसर्गातल्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतूहलबुद्धीने पाहिले, तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्या भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठी क संचात्मक छोटेखानी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक पाच पुस्तकांचा संच मधुमती शिंदे यांनी लिहिला आहे. यात गीर जंगल आणि इतर गोष्टी, जीवदान आणि इतर गोष्टी, कौतुक आणि इतर गोष्टी, मैत्री आणि इतर गोष्टी, सृष्टी आणि इतर गोष्टींचा या संचात समावेश आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगत असतात. निसर्गाशी त्यांचं नातं अधोरेखित करताना या पुस्तकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घातली आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या बाबींवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BENJAMIN FRANKLIN
BENJAMIN FRANKLIN by BENJAMIN FRANKLIN Rating Star
DAINIK LOKSATTA 01-12-2019

फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

SWAMI
SWAMI by RANJEET DESAI Rating Star
Eknath Marathe

मी एकदा वाचलेले पुस्तक परत वाचत नाही पण हे एकमेव पुस्तक त्याला अपवाद आहे. चारदा वाचले आहे. मुलांना मानगूट पकडून वाचायला लावले आहे !