EDITED BY DR. SUNILKUMAR LAVTE, THIS COLLECTION OF V. S. KHANDEKAR’S PREVIOUSLY UNPUBLISHED WRITINGS—TITLED SMRUTICHI CHALTA PANE (TURNING THE PAGES OF MEMORY)—COMPRISES EIGHT SECTIONS, INCLUDING AUTOBIOGRAPHICAL ESSAYS, MEMOIRS, EPISTOLARY SKETCHES, ALLEGORICAL TALES, THOUGHT-PROVOKING ARTICLES, AND CHARACTER SKETCHES. THE BOOK OFFERS INSIGHTFUL AND GUIDING PIECES THAT SHED LIGHT ON KHANDEKAR’S LITERARY JOURNEY, MEMORIES OF HIS CHILDHOOD AND YOUTH, SOCIAL LIFE, GANDHIAN PHILOSOPHY, AND THE POLITICS OF HIS TIME. IT OPENS WITH A COMPREHENSIVE INTRODUCTION, AND EACH SECTION IS ACCOMPANIED BY AN EDITORIAL NOTE. THE AUTOBIOGRAPHICAL ESSAYS TRACE HIS EVOLUTION FROM HIS FIRST BOOK THROUGH THE NOVEL *YAYATI* AND HIS SHORT STORY WRITING. THE SECTION ON MEMOIRS RECOUNTS A LIFE-THREATENING ACCIDENT, AN INCIDENT WHERE HE SAVED A STUDENT`S LIFE, AND HIS THOUGHTS ON RURAL DEVELOPMENT. THE EPISTOLARY SKETCHES FEATURE DIALOGUES BETWEEN BROTHERS, AS WELL AS REFLECTIONS ON GANDHIAN THOUGHT, SOCIAL REALITIES, AND THE BACKDROP OF THE DIVISION OF GERMANY. THROUGH MESSAGES OF GOODWILL AND PUBLIC APPEALS, THE BOOK UNDERSCORES THE IMPORTANCE OF LITERARY GROWTH, HUMAN VALUES, AND THE ROLE OF YOUTH. THE ALLEGORICAL TALE *SWATANTRYADEVATA* (GODDESS OF LIBERTY) CLARIFIES THE POSITION OF THE COMMON MAN; THE THOUGHT-PROVOKING ARTICLES EXPRESS VIEWS ON RUSSIA; AND THE CHARACTER SKETCHES PAY TRIBUTE TO THE WORK OF SHANKARRAO KIRLOSKAR. THE COLLECTION ALSO INCLUDES RESPONSES TO QUESTIONS RAISED BY READERS.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या वि. स. खांडेकरांच्या ‘स्मृतीची चाळता पाने’ या अप्रकाशित साहित्याच्या संकलनात आत्मपर लेख, आठवणी, पत्रात्मक लघुनिबंध, रूपककथा, वैचारिक लेख आणि व्यक्तिलेखादी आठ विभागांचा समावेश आहे. यात खांडेकरांचे साहित्यिक अनुभव, बालपण व तरुणपणीच्या आठवणी, समाजजीवन, गांधीवाद आणि तत्कालीन राजकारणावर प्रकाश टाकणारे विविध विचारप्रवर्तक व मार्गदर्शक लेख पाहायला मिळतात. या पुस्तकाच्या सुरुवातीला विस्तृत प्रस्तावना असून, प्रत्येक विभागाला संपादकीय जोडले आहे. आत्मपर लेखांमध्ये त्यांच्या पहिल्या पुस्तकापासून ते ‘ययाति’ कादंबरी आणि कथालेखनापर्यंतचा प्रवास उलगडला आहे. आठवणींच्या विभागात जीवघेणा अपघात, विद्यार्थ्याचा जीव वाचवल्याची घटना आणि ग्रामीण विकासाचे विचार मांडले आहेत. पत्रात्मक लघुनिबंधांमध्ये दादा-भाऊंचा संवाद, गांधीवाद, समाजवास्तव आणि जर्मनीच्या विभाजनाची पार्श्वभूमी दिसून येते. शुभसंदेश व आवाहनांच्या माध्यमातून साहित्यविकास, मानवी मूल्ये आणि तरुणांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘स्वातंत्र्यदेवता’ या रूपककथेत सामान्य माणसाचे स्थान स्पष्ट केले आहे, तर वैचारिक लेखातून रशियाबाबतचे विचार व्यक्त केले आहेत, व्यक्तिलेखातून शंकरराव किर्लोस्करांच्या कार्याचा गौरव केला आहे. तसेच वाचकांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचाही यामध्ये समावेश आहे.