* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE SEED OF COMPASSION
 • Availability : Available
 • Translators : YOJANA YADAV
 • ISBN : 9789391151058
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 32
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : CHILDREN LITERATURE
 • Sub Category : PICTURE BOOKS, ACTIVITY BOOKS & LEARNING MATERIAL
Quantity
FOR THE FIRST TIME EVER, NOBEL PEACE PRIZE LAUREATE HIS HOLINESS THE DALAI LAMA ADDRESSES CHILDREN DIRECTLY, SHARING LESSONS OF PEACE AND COMPASSION, TOLD THROUGH STORIES OF HIS OWN CHILDHOOD. ONE OF TODAY`S MOST INSPIRING WORLD LEADERS WAS ONCE AN ORDINARY CHILD NAMED LHAMO THONDUP. IN A SMALL VILLAGE IN TIBET, HIS MOTHER WAS HIS FIRST GREAT TEACHER OF COMPASSION. IN EVERYDAY MOMENTS FROM HIS CHILDHOOD, YOUNG READERS BEGIN TO SEE THAT IMPORTANT LESSONS ARE ALL AROUND US, AND THAT THEY, TOO, CAN GROW TO TRULY UNDERSTAND THEM. WITH SIMPLE, POWERFUL TEXT, THE DALAI LAMA SHARES THE UNIVERSALIST TEACHINGS OF TREATING ONE ANOTHER WITH COMPASSION, WHICH BAO LUU ILLUSTRATES BEAUTIFULLY IN VIBRANT COLOR. IN AN INCREASINGLY CONFUSING WORLD, THE SEED OF COMPASSION OFFERS GUIDANCE AND ENCOURAGEMENT ON HOW WE ALL MIGHT BRING MORE KINDNESS TO IT.
नोबेल पारितोषिक विजेते परमपूज्य दलाई लामा प्रथमच या पुस्तकाच्या माध्यमातून जगभरातील बालकांशी संवाद साधत आहेत. यात बालपणीच्या संस्कारातून त्यांच्यात रूजलेल्या करुणा आणि शांततेचे परिपाठ गोष्टरूपात अनुभवास येतील. आजच्या घडीचं जगातील सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे चौदावे दलाई लामा. अर्थात बालपणीचे तिबेटातल्या छोट्याशा गावातले ल्हामो थोन्डूप. त्यांची आई म्हणजे करुणेचे परिपाठ देणारा सर्वात महान गुरू. आईकडून घेतलेली ही शिकवणच दलाई लामा आपल्या छोट्या वाचकांना या पुस्तक रूपाने सांगत आहेत. सहजसोपी शब्दकळा आणि सामर्थ्यवान आशयातून दलाई लामा परस्परांप्रति करुणामय भाव बाळगण्याची वैश्विक शिकवण देत आहेत. बाओ लू यांच्या नितांत सुंदर रंगछटांनी हे पुस्तक सजले आहे. जगाच्या वाढत्या गोंधळाच्या स्थितीवर हे पुस्तक दयाभाव वृद्धिंगत करणारा मार्गदर्शक ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THESEEDOFCOMPASSION #HISHOLINESSDALAILAMA #KARUNECHABEEJ #BUDDHISM #TIBET #DHARAMSHALA #CHILDRENLITERATURE #MARATHITRANSLATION #ONLINEBOOKS #करुणेचंबीज #परमपूज्यदलाईलामा #धरमशाला #बौद्धधर्म #तिबेट #आॅनलाईनपुस्तके #मराठीअनुवाद #बालसाहित्य #भगवानबुद्ध #लहानमुलांच्यागोष्टी
Customer Reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BARI
BARI by RANJEET DESAI Rating Star
Preeti Abnave

बारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 " स्वामी"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार ! दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. "बारी" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी ! ...Read more

Pawan Chandak

आयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी "`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले। धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more