* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CALL CENTRE AN INSIDE STORY
 • Availability : Available
 • ISBN : 9788184981131
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 304
 • Language : ENGLISH
 • Category : FICTION
 • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
THE BOOK DESCRIBES THE STORY OF A SMALL TOWN YOUTH BEING UNSUCCESSFUL IN LAW PROFESSION, TRIES HIS DESTINY IN A CALL CENTER. HAVING FACED SOME OBSTACLES, HE GOT THE JOB. INITIALLY, HE IS SHOCKED BY THE CALL CENTER CULTURE. GRADUALLY HE UNDERSTANDS THE HARDSHIPS, HECTIC SCHEDULE AND EFFECT OF THE FATIGUE OF THE NIGHTSHIFT ON ITS EMPLOYEES THOUGH IT OFFERS ATTRACTIVE SALARY AND INCENTIVES. THE BOOK ALSO DEALS THE CAUSES THAT MAKE YOUTH ADDICTIVE OF BAD HABITS TO GET TEMPORARY RELIEF OF THEIR FRUSTRATIONS. FINALLY IT CONTAINS THE TRUTH "WHAT HAPPENS BEHIND THE BIG BUILDINGS OF GLASSES" TO KNOW MORE ABOUT IT, READ THE HEART SHAKING STORY.
उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून पुण्यासारख्या महानगरात आलेल्या युवकाचे कॉल सेंटरमध्ये काम करून पैसे कमवन्याचे स्वप्न कसे साकार होते आणि त्यासाठी झगडताना कॉल सेंटरच्या झगमगाटी विश्वामागे काय चालू असते याचे रसभरीत वर्णन या पुस्तकातून वाचायला मिळते. कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना सवय नसल्याने आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातून लागणारी व्यसने, सहका-यांना टीम लीडरकडून मिळणार-या वागणुकीबद्दल उमटणार-या प्रतिक्रिया, याचे वर्णन वाचताना हा उद्योग कसा चालतो याची झलक अनुभवता येते.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating Star SAKAL 12-7-10

  उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून पुण्यासारख्या महानगरात आलेल्या युवकाचे कॉल सेंटरमध्ये काम करून पैसे कमविण्याचे स्वप्न कसे साकार होते आणि त्यासाठी झगडताना कॉल सेंटरच्या झगमगाटी विश्वामागे काय चालू असते याचे रसभरीत वर्णन ‘अ लाईफ रनिंग २४/७ कॉल सेटर अ‍ॅन इनसाइड स्टोरी’मध्ये विक्रांत शुक्ल यांच्या लिखाणातून वाचावयास मिळते. चौकोनी आयुष्य जगणारे आई-वडील आणि त्यांच्या मुलांबद्दल असलेल्या आशा-आकांक्षा, त्या पुरे करताना मुलांची होणारी ओढाताण, प्रसारमाध्यमांमध्ये येणारे फसवे चित्र इथपासून ते पुण्यातील रिक्षाचालकांची मनमानी, बसमधील गर्दीचे अनुभव याबाबत वाचताना आपणही यापैकी एखादा अनुभव घेतल्याचे चटकन आठवते. विक्रांत हे कसबी लेखक नाहीत. मात्र त्यांची शैली युवा पिढीच्या मनाचा ठाव घेणारी आहे. कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना सवय नसल्याने आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातून लागणारी व्यसने, सहकाऱ्यांना टीम लीडरकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल उमटणाऱ्या प्रतिक्रिया, याचे वर्णन वाचताना हा उद्योग कसा चालतो याची झलक अनुभवता येते. परदेशातील ग्राहकांना सेवा देताना कोणती पथ्ये पाळावी लागतात, उच्चाराचे शास्त्र कसे अवगत करायचे, कोणत्या शब्दावर संभाषणात जोर द्यायचा हे बारकावेही नेमकेपणाने लेखकाने शब्दबद्ध केले आहेत. पुण्यातील होळकर पुलावर लेखक आणि त्याच्या सहकाऱ्यांना भुताटकीचा अनुभव आल्याचा प्रसंगही असाच धमाल उडवून देणारा आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहकारी महिला आणि त्यांच्याशी असलेली ‘रिलेशन्स’याबाबतचा तपशील धक्कादायक आहे. एका महिला सहकाऱ्यावर तिच्या सावत्र वडीलांनी केलेला अत्याचार, त्यातून तिची होणारी घुसमट आणि कॉल सेंटरच्या जीवनचक्रात स्वत:ला गुंगवून ठेवताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी या साऱ्या तपशिलातून त्या युवतीची मानसिकताही लक्षात येते. निराशेतून बाहेर पडण्यासाठी आजची युवा पिढी किती चटकन व्यसनाच्या आहारी जाते, हे वाचताना स्वत: लेखक त्यापासून कसा दूर राहू शकला याचे वर्णन या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more

TARANG
TARANG by KALYANIRAMAN BENNURWAR Rating Star
DAINIK SAMANA 13-10-2019

काही कोरलेली स्मरणशिल्पे... ‘तरंग’ हा कल्याणीरमण यांचा आठवणींवर आधारित कथासंग्रह आहे. कल्याणीरमण यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन सतत कार्यमग्न असल्यामुळे अत्यंत समृद्ध आहे. लेखकाने चरित्र, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विपुल लेखन केले असून त्यांच्या तर भाषांमध्ये अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. लेखकाच्या भावविश्वातल्या विविध आठवणींच्या पदरांमधून हे ‘तरंग’ उमटलेले आहेत. यात काही कडूगोड क्षण आहेत, काही समर्पित तर काही वैचित्र्यपूर्ण व्यक्तिचित्रे आहेत. काही प्रसंग काही आठवणी आणि काही गोष्टी आहेत. ‘पीआयएल.’ ‘पाच नंबर सिंगल रूम’ या कथांची भट्टी उत्तम जमली आहे. पुरावा ही कथा एक जोरदार धक्का देते. ‘नाडीपरीक्षा’, ‘गौरीहार’ या फसवणुकीच्या कथा असूनही त्यांचा पोत मात्र भिन्न आहे. ‘बडा साब’चा राउंड’, ‘दिवसा पण खेळ चाले’ या कथा तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण जगात भुते आहेतच असे सहज सांगून जातात. ‘पावलीची कोपरी’ चटका लावणारी कथा. खरंच असे कधी होते का? असा एक जिव्हारी लागणारा खडा सवालही टाकते. ‘श्रमही निमाले’मधील आणि ‘पावलीची कोपरी’मधील आईचा मृत्यू ही घटना कशी सुन्न करते याचा गहिरा अनुभव देते. ‘अश्रू’मधील हरिपंत चापेकरांची व्यक्तिरेखा भावुकता आणि कठोर वास्तव यांच्या सीमेवरील अश्रूंची किंमत सांगते. मयूर गोरे हे पात्र अगदी अस्सल साकारले आहे त्याचा दुर्दैवी शेवट हा त्याच्याच कर्माने झालेला असूनही हे पात्र सगळ्यांना गुतवून ठेवते हे त्याचे यश आहे. बालय्या स्वामी हे आपल्या विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून पांढरपेशा समाजातील अपरिचित असा जीवनपट उलगडत जाते. ‘सिंगल रूम’मधील संघर्ष वास्तववादी आहे, पण शेवट मात्र धक्का नक्की देतो. ‘पीआयएल’मधील ‘पोएटिक जस्टीस’ एक पाठ देते तर ‘कर्मयोगी’मधील अनंत राव एक उत्तम वस्तुपाठ घालून देतात. ‘पाच नंबर’मधील नायिकेची घालमेल आपली कधी होऊन जाते ते कळतच नाही म्हणूनच हे ‘तरंग’ अवश्य अनुभवण्यासारखे आहेत. ...Read more