* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BUDDABHAKTA DR. BABASAHEB AMBEDKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745378
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO SET
Quantity
Keywords
BUDDHABHAKTA DR. BABASAHEB AMBEDKAR , R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. आधुनिक भारतावर प्रभाव टाकणारे डॉ. बाबासाहे आंबेडकर यांचं चरित्रही उलगडून दाखवणारी पुस्तक या मालिकेत आहेत. भारताला घटनेची देणगी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं आयुष्यच प्रेरणादायी. त्यांचे वडील रामजीबाबा यांनी त्यांना मोठं करण्याचं स्वप्न बघितलं. अफाट वाचन, बुद्धिमत्ता आणि समाजाविषयीची प्रचंड तळमळ यांतून बाबासाहेबांचं आयुष्य घडत गेलं. समतेचा मूलमंत्र देणारे आंबेडकर पुस्तकातल्या छोट्या छोट्या प्रसंगांतून मोठी शिकवण देतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARTHACHYA SHODHAT
ARTHACHYA SHODHAT by Viktor E. Frankl Rating Star
Krushna Sapate

नाझी छळ छावण्यांमध्ये आपलं मरणप्राय जीवन जगत असताना देखील आशेचा एक किरण लेखकाला कसा तगवून होता. जीवनाचा अर्थ शोधताना आपण काय करायला हवं याचं मार्मिक वर्णन लेखकाने लोगोथेरपीच्या माध्यमातून केलं आहे. अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारं "अर्थाच्या शोधा" हे पुस्तक आपणास या काळात नवी उमेद देईल. डॉ.कृष्णा सुभाष सपाटे ...Read more

SANCTUS
SANCTUS by SIMON TOYNE Rating Star
Harshada Gore

एक षडयंत्र, ज्याची निर्मिती तीन हजार सालांपासुन आहे, एके दिवशी Samuel ने तुर्कीच्या रुईन शहरात एक प्राचीन धार्मिक गढी असलेल्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही आत्महत्या news channels वर प्रसारित केली गेली, संपूर्ण जग या आत्महत्येला साक्ष होते परंतु केवळ काही मूठभर लोक या आत्महत्येमागील प्रतिकात्मक अर्थ शोधू शकले. या दुःखद घटनेने कॅथीरन मान आणि तिचा मुलगा Gabriel, जे धर्मादाय लोक आहेत आणि न्यूयॉर्कमधील गुन्हे रिपोर्टर लिव्ह अ‍ॅडमसन यांचे जीवन एकत्र आणले. त्यांनी प्रकटीकरणाचा प्रवास सुरू केला, ते जे उघड करणार आहेत ते सर्व काही बदलेल ... Sanctus एक अतिशय अनोखी कथा सांगते.पहिली गोष्ट म्हणजे, बहुतेक धार्मिक / षड्यंत्र thrillers ला विपरीत, Sanctus एक अलौकिक कथा आहे. दुसरे म्हणजे, या शैलीतील बर्‍याच कादंबर्‍या खर्‍या धार्मिक संस्थांसह वास्तविक ऐतिहासिक ठिकाणी घडतात. सॅंक्टस मधील कथा एका काल्पनिक शहरात घडली आणि ही कथा एका काल्पनिक, धार्मिक व्यवस्थेभोवती फिरली. म्हणूनच, मला वाटते की सँक्टसने या शैलीमध्ये काहीतरी नवीन आणले आहे. शिवाय काल्पनिक, धार्मिक सुव्यवस्थेबद्दल एक कथा सांगून, सँक्टस यांनी वाचकांसाठी पुस्तकाची मजा घेण्यासाठी एक जागा तयार केली. Simon Toyne ने उत्तम प्रकारे लिहिलेल्या, काल्पनिक कथेसह ही थीम कुशलतेने परिधान केली. कथेची गती वेगाने जाते आणि छोट्या अध्यायांच्या उत्कृष्ट वापरामुळे ती आणखी वाढविली गेली आहे. त्याच वेळी हे पुस्तक संशयास्पद आणि धक्कादायक आहे कारण एक गूढ वातावरण सतत कथेला कवटाळते. हे कथानक अधिक घट्ट होत गेल्याने वाचकांना गूढ उत्तरावर अधिकाधिक उत्सुकता निर्माण होईल. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने रहस्येमागील सत्य कसे प्रकट केले ते मला विशेषतः आवडले. जेव्हा मी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पोहोचले तेव्हा मी ते वाचणे थांबवू शकत नाही, कारण मला फक्त पुस्तकाच्या अंतिम कोडेचे उत्तर शोधायचे होते. जेव्हा अखेरीस गूढतेचे उत्तर उघड झाले तेव्हा तर फार interesting वाटले कारण ते पूर्णपणे अनपेक्षित होते. मी म्हणेन की मी वाचलेल्या चांगल्या धार्मिक थ्रिलर्सपैकी एक आहे सँक्टस. ज्यांना वेगवान, धार्मिक / षडयंत्र थ्रिलर्स वाचण्यास मजा येते, त्यांच्यासाठी मी सँक्टसची शिफारस करते. ...Read more