* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPLI SRUSHTI SARPATNARYA PRANYANCHE JAG
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982541
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :KISHOR PAWAR-AAPLI SRUSHTI COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
LITTLE FRIENDS, YOU ALWAYS LOVE TO MAKE NEW FRIENDS- DON`T YOU? WHAT IF THE COLORFUL ELMER THE ELEPHANT BECAME YOUR FRIEND? THIS ELMER IS GREAT FUN, MAKES EVERYONE LAUGH, HELPS FRIENDS. HE IS ACCOMPANIED BY HIS BROTHER - WILBUR! MAGICIAN OF SOUND! YOU WILL DEFINITELY LIKE THE PRANKS OF THESE TWO.
छोट्या दोस्तांनो, नवीन नवीन मित्र करायला तुम्हाला नेहमीच आवडतं- हो ना? रंगीबेरंगी एल्मर हत्ती तुमचा मित्र झाला तर? हा एल्मर मोठ्या गमत्या आहे, सगळ्यांना हसवणारा, मित्रांना मदत करणारा आहे. त्याच्या जोडीला आहे त्याचा भाऊ- विल्बर! आवाजाचा जादूगार! या दोघांच्या धम्माल गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more