Stephanie Hirsch & Hana Seligson

About Author

स्टेफनी हर्श यांनी ट्युलेन विद्यापीठातून आर्ट हिस्टरी आणि कॉस्च्युम डिझाईन या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्ररीत्या स्वत:च्या कामाला सुरुवात केली. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून स्वत:चा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मणी आणि भरतकामाचा वापर केला की, ज्यामुळे त्यांच्या कलाकृतींना त्रिमितीय स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या कलाकृती या विनोद आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींवर भाष्य करतात. न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध लिऑन वायर गॅलरी येथे २०११ आणि २०१३ साली स्टेफनी हर्श यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते. १९९६ ते २००८ पर्यंत त्यांनी इन्का रिसॉर्ट लाइफ स्टाईल ब्रँडच्या डिझायनर म्हणून काम पाहिले. मियामी येथे भरलेल्या ‘मियामी डिझाइन डिस्ट्रिक्ट आर्ट वॉक’मध्ये विशेष अतिथी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच न्यू यॉर्वâ येथे भरलेल्या ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’ मध्येही त्यांना विशेष सन्मान प्राप्त झाला. वेगवेगळी नियतकालिके तसेच वर्तमानपत्रांतून स्टेफनी हर्श यांचे लेखन सतत चालू आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात यांनी एक यशस्वी व्यावसायिक, प्रख्यात डिझायनर, पत्नी तसेच आई अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य आपल्या कुटुंबाबरोबर न्यू यॉर्क शहरात आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JICHYA HATI PALANYACHI DORI Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Ajinkya Rokade

वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली "अश्रू" कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षात घेऊन वाईट करण्यास न कतणारा सामान्य माणूस ह्या कादंबरीचा मूळ नायक आहे म्हणावं लागेल ... मला आवडलेल्या प्रमुख ५ पुस्तकांत हे फार आवडते पुस्तक आहे ...Read more

Anil Udgirkar

अरूंधती राय यांची ही दुसरी कादंबरी.दिल्ली व काश्मीर ची सैर घडविणारी.डाव्या विचारसरणी,अगदी धीट असे लेखन.