SRINIVAS PANDIT

About Author


SRINIVAS PANDIT IS A KNOWLEDGEABLE, EXPERIENCED HR PROFESSIONAL AND MANAGEMENT CONSULTANT. AMONG THEIR CLIENTS DIAN GRAHA ELECTRICA, INDONESIA; BYCON GROUP, BANGALORE; NABARD AND PITAMBARI, MUMBAI ARE INCLUDED. MR. PANDIT HAS WORKED AS EXECUTIVE VICE PRESIDENT (PERSONNEL) IN SIEMENS LTD.

श्रीनिवास पंडित जाणते, अनुभवी HR प्रोफेशनल व व्यवस्थापन समुपदेशक आहेत. त्यांच्या क्लायंट्समध्ये डायन ग्रॅहा इलेक्ट्रिका, इंडोनेशिया; बायकॉन ग्रुप, बेंगलोर; नाबार्ड व पीतांबरी, मुंबई यांचा समावेश आहे. श्री. पंडित यांनी ‘सिमेन्स लि.’मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेन्ट(पर्सोनेल) या पदावर काम केले असून त्यांनी ब्लू स्टार, हेर्डिलिया केमिकल्स व जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या HR विभागाचे प्रमुखपद सांभाळले आहे. श्री. पंडित अर्थशास्त्र व विधी पदवीधर असून, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पर्सोनेल मॅनेजमेंट व इंडस्ट्रीयल रिलेशन्समध्ये पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवला आहे. ते ‘चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, यू.के.’ चे फेलो आहेत. त्यांच्या ‘थॉट लीडर्स’, ‘डिझाईन युअर करिअर’ व ‘एक्झम्प्लरी सीईओज’ या पुस्तकांना वाचकांची खूप पसंती लाभली आहे. त्यांनी करिअर मार्गदर्शन, संस्था संस्कृती, नेतृत्वगुण, मनोभूमिका बदल इ. विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांनी कंपन्यांसाठी कार्यशाळा, परिसंवाद घेतले आहेत. तसेच सार्वजनिक व्यासपीठावरून मार्गदर्शन केले आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book