Edward De Bono

About Author


EDWARD DE BONO IS A LEADING THINKER WHO TEACHES CREATIVE THINKING SKILLS IN A STRAIGHTFORWARD MANNER. EDWARD DE BONO WHILE THOUSANDS OF PEOPLE WERE WRITING SYSTEMS FOR COMPUTERS THEY ARE WRITING SYSTEMS FOR THE HUMAN MIND. AWARE OF THE CONCEPT THAT THE HUMAN MIND IS A SELF-ORGANIZING INFORMATION SYSTEM, HE DEVELOPED SOME PARALLEL SYSTEMS OF THOUGHT.

सर्जनशील विचार सरळ सोप्या रीतीने करण्याचे कौशल्य शिकवणारे एडवर्ड डी बोनो हे आघाडीचे मान्यताप्राप्त विचारवंत आहेत. हजारो लोक संगणकासाठी प्रणाली लिहीत असताना एडवर्ड डी बोनो मानवी मनासाठी ती प्रणाली लिहीत आहेत. मानवी मन म्हणजे स्व-नियोजित माहिती प्रणाली आहे, या संकल्पनेची जाणीव ठेवून त्यांनी काही समांतर विचारपद्धतीची सूत्रे विकसित केलेली आहेत. त्यांची आकलनात्मक विचारपद्धतीची सूत्रं (CORT & DATT) शाळांतून व उद्योगधंद्यांतून सर्रासपणे उपयोगात आणली जातात. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, प्रुडेंशिअल, एनटीटी (जपान), नोकिया (फिनलंड) व सिमेन्स (जर्मनी) यांसारख्या नामवंत उद्योगसमूहांतून बोनो यांच्या विचारपद्धतींना प्रतिसाद मिळाला आहे. जगाच्या इतिहासात, आत्तापर्यंत मानवतेवर प्रभाव पाडणाऱ्या २५० नावांच्या यादीत, दक्षिण आफ्रिकेतल्या विचारवंतांनी डॉ. बोनो यांचे नाव समाविष्ट केले आहे. अ‍ॅक्सेंच्युअर या सुप्रसिद्ध सल्ला देणाऱ्या उद्योगसमूहाने, ५० प्रभावशाली विचारवंत उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांना व डाउन्स सिंड्रोम यंगस्टर्सना विचार पद्धती शिकवलेली आहे. त्यांना ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन आणि हार्वर्ड येथे व्याख्याने देण्यासाठी बोलवत असत व ते ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाचे ऱ्होर्ड्स स्कॉलर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ६७ पुस्तके लिहिलेली असून त्यांचे ३७ भाषांतून अनुवाद झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SUNDAR MAN Rating Star
Add To Cart INR 170
THE SIX VALUE MEDALS Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book