ALEX PATTAKOS ,CO-AUTHOR ELAINE DUNDON

About Author


HE IS CO-FOUNDER OF THE GLOBAL MEANING INSTITUTE AND COAUTHOR WITH ELAINE DUNDON OF THE INTERNATIONAL BEST-SELLING BOOK, PRISONERS OF OUR THOUGHTS: VIKTOR FRANKLS PRINCIPLES FOR DISCOVERING MEANING IN LIFE AND WORK, AVAILABLE IN OVER 20 LANGUAGES AND NOW IN A 3RD, REVISED AND EXPANDED, EDITION.

ॲलेक्स पॅटाकोस हे परिवर्तनशील विचारप्रणालीचे प्रणेते म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. द इनोव्हेशन ग्रुपचे ते प्रमुख आहेत. न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील सेंटर फॉर पर्सनल मीनिंगचे ते संस्थापक आहेत. रेनेसॉन्स बिझनेस असोसिएट्स (आर. बी.ए.) नावाच्या, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अध्यक्ष होते. दांडगा उत्साह, प्रेरणादायी व चैतन्यमय स्वभाव, प्रशिक्षणार्थीना हाताळण्याची पद्धत आणि सर्व स्तरांवर बदल घडवून आणण्याची हातोटी यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. वक्ता, लेखक, सल्लागार आणि चर्चेत विषयाची प्रगती घडवून आणणारी व्यक्ती अशा सर्व भूमिकांत पॅटाकोस आपले विशिष्ट दृष्टिकोन व अनुभवांचा वापर करून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना उत्साहित करीत, भविष्यासाठी योजना करण्याचा नवा मार्ग दाखवितात. वैयक्तिक सल्लागार व प्रशिक्षक या नात्याने ते, व्यवस्थापक, नामवंत खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगार, सेवानिवृत्त व्यक्तींस आपल्या रोजच्या व व्यावसायिक जीवनातील अर्थ शोधण्यास मदत करतात. उद्योगधंदा, सरकारी आणि धर्मादाय संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामूहिकता निर्माण करण्याचा त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध संस्थांतील वेगवेगळ्या स्तरांवरील कर्मचाऱ्यांची; नवनिर्मितीक्षम निर्णय घेण्याची, संस्थेचे कामकाज शिकण्याची, नेतृत्व करण्याची, यंत्रणेची मांडणी करता येण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या ग्राहकांच्या नामावलीत फॉर्म्युन ५०० नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PRISONERS OF OUR THOUGHTS Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
श्री. श्रीकांत सातपुते, मुंबई

१ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more

DIARY OF A HOME MINISTER
DIARY OF A HOME MINISTER by ANIL DESHMUKH Rating Star
दिलीप कंकाळ ज़िल्हा महिला व बालविकास अधिकारी से.नि

अनिल देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर कालच वाचून पूर्ण केल. एका प्रामाणिक रांजकीय कार्यकर्त्यास सडलेली सत्ताधारी यंत्रणा किती त्रास देऊ शकते ह्याच जिवंत उदाहरणं हे आत्मकथन आहे. भाषा व मांडणी उत्कृष्ठ आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भावनिक ओझं कमी के असले तरी सनातन्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढावी हीच सदिच्छा. ...Read more