* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357203166
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2026
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JUNG CHANG IS ONE OF THE INDIVIDUALS WHO STROVE TO BRING TO THE WORLD`S ATTENTION THE VIOLENCE PERPETRATED BY THE JAPANESE ARMY IN CHINA DURING 1937–38—SPECIFICALLY, THE INHUMANE ATROCITIES INFLICTED UPON MEN AND WOMEN, WHICH AMOUNTED TO A HOLOCAUST OF THAT ERA. THE JAPANESE ARMY, EAGER TO CAPTURE THE CHINESE CAPITAL OF NANKING, WAS BACKED BY SENIOR COMMANDERS HARBORING A DEHUMANIZING IDEOLOGY—MONSTERS EMBOLDENED BY THAT VERY MINDSET. COMPOUNDING THIS WAS THE DECISION BY CHINESE LEADERSHIP TO PRIORITIZE SAVING THEIR OWN SKINS ABOVE ALL ELSE; JAPAN AND ITS SOLDIERS FULLY EXPLOITED THIS OPPORTUNITY, RAVAGING EVERY CORNER OF NANKING WHILE STRUTTING ABOUT WITH ARROGANCE. THE HISTORY OF THE HEART-WRENCHING NANKING MASSACRE—CHARACTERIZED BY THE INDISCRIMINATE SLAUGHTER OF ORDINARY MEN BRANDED AS SOLDIERS, THE GANG-RAPE OF PREGNANT WOMEN, AND THE BARBARIC ACT OF TEARING UNBORN FETUSES FROM WOMBS TO BE FED TO DOGS—HAS BEEN CHRONICLED FOR MARATHI READERS IN THE NOVEL ‘NIRDAY’.
१९३७-३८मधला जपानी सैन्याने चीनमध्ये केलेला हिंसाचार – स्त्री-पुरुषांवरील अमानुष अत्याचार – म्हणजेच तेव्हाचा हॉलोकास्ट- जगासमोर आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याचपैकी एक म्हणजे ‘जियांग चेंग.’ चीनच्या नानकिंग राजधानीला काबीज करण्यासाठी आसुसलेले जपानी सैन्य आणि त्यांच्या पाठिशी असणारे मानवताहीन विचारसणीचे वरिष्ठ – त्यामुळे सोकाळलेले नराधम - त्याबरोबरच चीनच्या वरिष्ठांच्या फक्त स्वत:ची कातडी बचाव निर्णय - या संधीचा पुरेपूर फायदा जपान व जपानी सैनिक घेतात आणि नानकिंगच्या प्रत्येक कोपर्‍याची लक्तरं करत अभिमानाने फिरू लागतात. नानकिंगमधला सामान्य माणूस हा सैनिकच आहे असं मानून त्यांची सरेआम कत्तल केली जाणारी कत्तल – गरोदर स्त्रीयांवर एकापेक्षा जास्त नराधमांचा बलात्कार – पोटातील गर्भाला अपूर्णावस्थेतच बाहेर काढून कुत्र्यांच्या तोंडी देणे – या हृदय पिळवटून टाकणार्‍या नानकिंगच्या हत्याकांडाचा इतिहास ‘निर्दय’ या कादंबरीतून मराठी वाचकांसाठी शब्दबद्ध झाला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कादंबरी #निर्दय#उमेशकदम#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#NOVEL#NIRDAY#UMESH KADAM
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. जयश्री अनिल आसलकर अमरावती

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला मराठमोळा झंझावात - *महारुद्र* काही माणसे मैदान गाजवतात, काही इतिहास घडवतात, काही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने मने. पण ज्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आणि ज्यांचे माणुसकीचे वैभव वर्णनातीत अशाव्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणे म्हणजे अथांग सागराची विशालता ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करणे होय. भीमराव देशमुख हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. भीमरावांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ‘महारुद्र’ हे केवळ एका महान फुटबॉलपटूचे चरित्र नाही, तर कर्तृत्व, त्याग, स्वाभिमान आणि माणुसकी यांचा अनमोल जीवनपट आहे त्यांच्या विराट रूपाचे वर्णन करण्यास माझी लेखणी अपुरी पडते आणि शब्दही नतमस्तक होतात. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या कर्तृत्वाचा झंझावात निर्माण करणारे भीमराव गावच्या मातीत मात्र सहकाऱ्यांशी समरस होण्यासाठी अनवाणी खेळतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचूनही प्रसिद्धीचा मोह बाळगत नाहीत आणि स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या अडचणीला धावून जातात. जग जिंकण्याचे सामर्थ्य असतानाही माणुसकी जपणाऱ्या या अवलियाचे मोठेपण त्यांच्या विजयात जितके आहे त्याहून कितीतरी अधिक त्यांच्या त्यागात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या भीमरावांकडे निवृत्तीच्या वेळी पैसा, प्रसिद्धी आणि यश सारे काही होते परंतु स्वतःजवळचे इतरांना देऊन टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत आणले. स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणाऱ्या या अवलियाने संपत्तीपेक्षा माणुसकीला अधिक मोल दिले. जग जिंकणाऱ्या या खेळाडूने स्वतःसाठी काही जपले नाही पण इतरांसाठी जगण्याचा एक अनमोल आदर्श मागे ठेवला. पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांनी *महारुद्र* च्या माध्यमातून पित्याच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जे दर्शन घडवले आहे ते केवळ चरित्र लेखन नाही तर ती एका असामान्य जीवनाला शब्दरूप देण्याची हृदयस्पर्शी साधना आहे. भीमराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व तसेच कर्तृत्व शब्दांपलीकडचे आणि त्यांचे औदार्य वर्णनातीत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात आणि अमरावतीच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कर्तृत्ववान भीमरावांविषयी अभिमानाने मन भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे इतकी उत्तुंग असतात की त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्यापुढे नतमस्तक होणेच अधिक समर्पक ठरते. लेखक श्री. जी. बी. देशमुख यांचे या अनमोल साहित्यकृतीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ...Read more

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more