* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661873
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHENEVER A TIGRESS GIVES BIRTH TO HER LITTER, SHE DELIVERS THEM AS SHE GOES ALONG HER WAY. THOSE THAT HAVE MANAGED TO WALK AWAY ON THEIR FEET SURVIVE; THE REST BECOME PREY . THE RULERS OF SAVANGARH FOR GENERATIONS TOGETHER. THEIR DYNASTY HAS GROWN UP IN THIS SOIL. THE HAVE ENJOYED THE RICHES IT GAVE THEM. BUT THE KINGDOMS WERE MERGED .THE TIES SNAPPED. THE DESCENDANTS OF SAVANGARH MIGRATED AND SET UP HOTELS. SHOULD THE REINS OF THE DYNASTY BE HANDED OVER TO THESE HOTELIERS?...THEN WHO IS THE TRUE HEIR? CAN HEIRDOM REMAIN IMMORTAL THROUGH THE SACRIFICES AND TRIBULATIONS OF TWO LIVES – A SINGER COURTESAN AND A PRINCE THAT WERE BURNISHED AND CONSUMED BY LOVE?...
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    रणजित देसार्इंचे तीन अंकी नाटक... रणजित देसार्इंनी लिहिलेलं ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. सावनगढचे राजा जयपालसिंह यांचे राज्य नंतर पुढे संस्थान विलीन झाल्यानंतर त्यांच्या वंशजांनी परदेशात हॉटेल्स काढले. ्यांचा वंशज सुरजित मात्र भाऊक विचारी असतो. सावनगढचं संस्थान विलीन झाल्यानंतर तो परदेशात भटकतो. नंतर मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन आपल्या पूर्वजांच्या यशाच्या खुणा त्यात साठवतो. या काळात त्याला साथ देते ती त्याची मैत्रीण गायिका चंदा ऊर्फ चंदेर. प्रत्यक्षात ती एका तवायफच्या घरी वाढलेली असते. मात्र, त्याच्या मैत्रीतूनच तिचं जीवन फुलतं. त्याच्या आधाराने ती पुढे जाते. तिच्या गायकीमुळे नावलौकिक मिळवते आणि राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान तिला मिळतो. दोघांच्या वाटचालीत अनेक टक्के टोणपे येतात. तिला अवहेलना, बदनामी सहन करावी लागते. एका राजपुत्रानं तिच्या नांदी लागणंही अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या दोघांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं ही कहानी फुलली आहे. शेवटी या राजघराण्याच्या बहुमोलाचा वारसा हा राजा शेवटी चंदाच्या हाती सुपूर्द करतो. रणजित देसाई यांनी संस्थानचे ढासळते वैभव, त्याच्या खुणा भाऊकपणे जपणारे सध्याचे राजे यांचं चित्रण या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2002

    आगळीवेगळी वाट चोखाळणारं नाटक… ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं. एक वेगळंच नाटक. आजच्या ‘हॉट अ‍ॅण्ड हिट’ अशा भडक नाटकांच्या गलबल्यापेक्षा किती वेगळं. नाटकाचा पोतच वेगळा. ‘स्वामी’ या कादंबरीचे जनक म्हणून सारी मराठी जनत रणजित देसार्इंना ओळखते. कदाचित या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी हे नाटक लिहून ठेवलेलं असावं. सप्टेंबर २००१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ही आहे एक अनोखी शोकान्त अशी प्रेमकहाणी. संस्थानिक राजपुत्र सुरजित आणि त्यांच्याबरोबर काशीहून आलेली एक गाणारी कलावंतीण चंदा यांची. सावनगढ हे विलीनकरणापूर्वीचं संस्थान. जयपाल हे त्या वेळी असलेले संस्थानिक. धनराज त्यांचा दिवाण. जयपालांचा हा युवराज गाण्याचा अतिशौकीन आहे. चंदाच्या रूपावर आणि सुरांवर त्याचं बेहद्द प्रेम आहे. पण एक युवराज कलावंतीणीशी कसा विवाहबद्द होणार? काशीला कुठे तरी उकिरड्यावर सापडलेल्या या अर्भकाला कालिचरण नावाचा दृष्ट, मुलींच्या कलांचा व्यापार करणारा वाढवतो. ती कोठीवर नाचगाणं करते; पण तिचा भयंकर छळ करणारा कालिचरण. त्याच्याकडून सुटण्यासाठीच युवराजांबरोबर आपखुशीनं आलेली चंदा. जयपाल चंदाला आपला राजगवई - हरिप्रसादच्या हाती सोपवितो. तिचा गळा लाजवाब आहे. हरिप्रसाद आपला गंडा या शिष्येला बांधतो. सुरजितचा पारंपरिक पद्धतीनं कुणा युवराज्ञीशी विवाह होतो. ही कथा सुरांच्या, गाण्यांच्या अंगानं जाणारी आहे. हरिप्रसाद मानी आहे; पण अस्सल गवय्या असल्यानं आपलं गाणं आपल्या नंतरही जिवंत राहावं, गाण्याचा वारसा चंदानं संभाळावा म्हणून संस्थान सोडून मुंबईला येतो. चंदाच्या सौंदर्यामुळे तिची मैफल करायला उत्सुक असलेले तिच्याकडून हलक्याफुलक्या बंदिशीचीच अपेक्षा करतात. हरिप्रसादला ते सहन होत नाही. मध्येच सुरजित त्यांच्या घरी येतो. युवराजाला ती त्याची आवडती ठुमरी ऐकवत असते. कालिचरणही पैशांच्या लोभानं नाही, तर चंदाला पुन्हा आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी येतो. प्रत्येकाचे हेतू निराळे. युवराजांचं सुरांवरचं प्रेम हरिप्रसादला कळत नाही. त्यांना तो जायला फर्मावतो. कालिचरणला आपली सर्व पुंजी देऊन चंदाची सुटका करतो. त्याग हा सुरांच्या पूजेचा पाया. हरिप्रसादचं चंदाशी नातं बापबेटीचं. पण नतद्रष्टं समाजक्षोभाचा या गाण्याला त्रास नको म्हणून ते नातं तसंच जपत तो चंदाशी लग्न करतो... पुढं त्याचा मृत्यू... चंदाला ‘पद्मभूषण’ हा सन्मान मिळणं... सुरजितचं तिच्या फ्लॅटवर येणं... सगळंच अत्यंत कोमल भावनांना जपत लेखकानं लिहिलेलं. मधूनमधून अर्थपूर्ण ऊर्दू शेरांची सुरजितच्या तोडी पेरणी या दृश्यांना सखोल परिमाण लाभून देते. पद्मभूषण पदक दिल्लीहून घेऊन आल्यावर सुरजितच्या हट्टामुळे सागरकिनारी असलेल्या व आता दोन हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलेल्या वयोवृद्ध सुरजितच्या फ्लॅटवर चंदा येते. हा शेवटचा प्रसंग दोन्ही व्यक्तिरेखांमधलं गहिरं असं प्रेमाचं नातं घट्ट विणीत जातो. सुरजितनं संस्थान विलीनीकरणाची सही केलेली असते. तो युवराज राहिलेला नसतो. पण राजे जयपाल या त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेच्या व राजघराण्याच्या पारंपरिक कल्पनांमुळेच तो गायिकेपासून दुरावतो. म्हणून शेवटी आपल्या घराण्याचा वारसा असलेला अत्यंत मौल्यवान असा मोत्याचा कंठा चंदाला देताना तो उद्गारतो, हा कंठा काय आमच्या सुपुत्रांनी इटलीमध्ये काढलेल्या हॉटेलवाल्यांना - खानावळवाल्यांना द्यायचा? सावनगढचं ‘सावनीवाले’ हे आडनाव मिरवून तू पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान तुझ्या गाण्यामुळे मिळवला...’ आणि अशा समाधानातच त्याचा होणार व्याकुळ, पण प्रसन्नचित्त मृत्यू... असं हे नाटक. खरोखरच आजच्या जमान्यात वेगळं त्याग, भक्ती, प्रेम, करारीपणा, आयुष्यभर प्रणयाला जपणं आदी कितीतरी भव्योदात्त मूल्यांवर हे नाटक उभं आहे. याचे प्रत्यक्ष प्रयोग झालेत किंवा कसे, याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं हे दोन जीव जळूनही गाण्याचा वारसा अमर झालेला आहे. असं हे अमर, अभिजात, अक्षर नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित करून नाट्यवेड्या प्रेक्षकांना अमोल नजराणाच बहाल केला आहे... अशा नाटकाकडे आजचे रंगकर्मी वळतील? हा प्रत्यक्ष प्रयोग (संगीत अबाधित ठेवून) रंगमंचावर सादर करून मराठी चोखंदळ प्रेक्षकांचा दुवा घेतील? यावर सुंदर मालिका निर्माते काढतील...? दूरदर्शनवर ती दाखवली जाईल? काही तरी चांगलं मिळण्यासाठी एवढे प्रश्न...! -भावना भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 18-11-2001

    प्रेमाची अनेक विलोभनीय रूपे… ‘स्वामी’सारख्या विख्यात कादंबरीचे लेखक रणजित देसाई याचं नाव नाटककार म्हणून ज्ञात नाही. परंतु ते उत्कृष्ट नाट्यलेखनही करू शकतात हे ‘तुझी वाट वेगळी’ या त्यांच्या नाटकाचे वाचन करताना दिसून येते. ‘प्रेम’ या विषयावर अनेक नाक-नाटके, चित्रपट येऊन गेले, त्यात सुखान्त किंवा दुखान्त असलेल्या प्रेमकथा मांडण्यात आल्या. येथून रणजित देसार्इंनी ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकात प्रेमाची अनेक रूपं दाखविली त्यासाठी त्याग आणि संघर्ष चित्रित करून प्रेम किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिले आहे. एका युवराजाची ही शोकान्त पण उदात्त प्रेमकहाणी आहे. कित्येक प्रेमाची तऱ्हा या त्यांनी वेगवेगळया चित्रित केल्या आहेत. चंदाचे त्यागी प्रेम, युवराज सुरजितचे अमर पण एकर क्षणाला अविश्वासाने डगमगणारे प्रेम, हरिप्रसाद या राजगवयाचे आपल्या कलेवर असणारे प्रेम आणि त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केलेला संघर्ष आणि चंदाला आपली कला अर्पण करून मोठं करण्याचं स्वप्न, त्यासाठी अरिस्थितीशी केलेला संघर्ष. कालिचरण याचं पैशावर असणारे प्रेम, रामसिंग या नोकराचे आपल्या मालकावर असणारे प्रेम आणि शेवटपर्यंत त्याने मालकाला दिलेली साथ, जयपाल यांचे आपले राज्य आणि प्रतिष्ठा यांवर असणारे प्रेम अशा या प्रेमाच्या परी आहेत. सुरजित - चंदा यांचं प्रेम एका कसोटीच्या क्षणी अविश्वासाने डगमगतं आणि त्यांना वेगवेगळया वाटेवर नेऊन सोडतं. सुरजित आपल्या व्यक्तींमध्ये राहूनही एकटा पडतो. तर चंदा कलेसाठी स्वत:ला वाहून घेते. यासाठी तिला आपले गुरू हरिप्रसाद यांच्या बरोबर विवाहही करावा लागतो. ज्या राज्यासाठी जयपाल त्यांना वेगवेगळं करतो ते राज्य बरखास्त होतं. सुरजितची बायको, मुले विदेशात स्थायिक असतात. तो एकटा पडतो. सुखाबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, ‘तुम्ही राज्य उपभोगलंत. एका माणसानं पराक्रम केला आणि त्याच्या नावावर तुम्ही पिढ्यान्पिढ्या राज्य करित आला. आयुष्यातली सर्व सुखं तुम्हाला मिळाली. दु:खाचा लवलेशही तुम्हाला शिवला नाही. तुम्ही खरे भाग्यवान.’ आपल्या राज्याचा अनमोल ठेवा तो शेवटी चंदाला अर्पण करतो. मरण तरी सुखाने येईल याची तो अपेक्षा करतो. त्याला वाईट एवढेच वाटते की त्याला सामान्य माणसाचे आयुष्य जगता आले नाही. तो चंदाच्या मांडीवर प्राण सोडतो. त्यांचं प्रेम वाचकाला सुन्न करून टाकते. असे हे नाटक वाचनीय आहे. लेखकाची भाषाशैली, प्रसंगाची गुंफण ही वाचकाला विचार करायला लावणारी आहे. -प्रतिभा वानखेडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.