* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983456
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HAVE YOU EVER BEEN ABLE TO MEASURE THE FATHOM OF A LAKE, AND THAT TOO WHEN THE LAKE IS FULL OF PLANTS, FLOWERS, FISH AND LOT MANY LIVING THINGS? YOU MAY SUCCEED IN MEASURING THE DEPTH BUT THAT WILL BE JUST IN METRES. IT WILL NOT HELP YOU TO UNDERSTAND THE REAL MEANING. AND EVEN IF YOU ARE ABLE TO MEASURE THE DEPTH, WILL YOU BE ABLE TO FIND OUT THE TREASURES HIDING DEEP WITHIN? A HUMAN MIND IS VERY DECEIVING. AT TIMES, WHEN WE FEEL THAT WE KNOW EXACTLY WHAT THE PERSON BESIDES US FEELS AND WISHES, WE FAIL TOTALLY. A HUMAN MIND IS A WONDER-GAME. IT MIGHT REFLECT TO BE SOBER AND WILL BE ALL EVIL. IT MIGHT APPEAR TO BE WICKED AND WILL BE SUPER SOFT WITHIN. A SENSITIVE HUMAN MIND IS INDEED VERY DEEP AND FATHOMLESS AT TIMES. IT DOES NOT LIMIT ITSELF WITHIN THE CONFINEMENTS OF AGE, GENDER, CULTURE OR RICHNESS IN TERMS OF MONEY. THE MORE EXPERIENCES IT GETS, THE MORE PROSPEROUS IT BECOMES. THIS PROSPERITY FURTHER LEADS TO THE SOFT, GENTLE WAVES MAKING THE MIND, THINK, PONDER AND DWELL. AN OUTSIDER MAY NOT EVEN NOTICE THESE WAVES WHICH AT TIMES CAUSE STORMS IN THE SENSITIVE MINDS. SNEHAL GOES TO THESE FATHOMLESS DEPTH, RELENTLESSLY, JUST WITH ONE ASPECT… TO MAKE US UNDERSTAND THIS WONDERFUL WORKING OF THE HUMAN MIND AND THE SENSITIVITY OF ‘BEING’.
माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे. वरून शांत दिसणा-या, निळेशार पाणी आणि कमळे यांनी भरलेल्या तळ्याच्या तळाशी काय काय असते ते फक्त तळेच जाणते. संंवेदनशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते. त्या भावविश्वाला वयाचे बंधन नाही, नाही गरिबी-श्रीमंतीचे. येणारा अनुभव, प्रसंग ह्यामुळे त्यावर उठणारे तरंग, कधी खूप मोठे तर कधी हळूच उमटणा-या लहरींसारखेही. पण वरून शांत दिसणा-या, सुंदर कमळांनी भरलेल्या त्या सुंदर जलाशयात कमळांच्या बिसतंतूंसारखी पार गुंतागुंत असते आणि मग उठणारे तरंग... ह्या अशाच तरंगांचे चित्रण ह्या कथांतून करण्याचा करण्याचा केलेला हा प्रयत्न......
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TALA #TALA #तळं #SHORT #STORIESMARATHI #SNEHALJOSHI #स्नेहलजोशी "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 06-05-2016

    उत्तम कथासंग्रह... मानवी भावभावनांवर आधारित अनेक कथासंग्रह मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतकरून स्त्रीकेंद्री कथांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर नातेसंबंधावरील कथाही आहेत. असाच एक मनाचा वेध घेणारा कथासंग्रह स्नेहल जोशी घेऊन आल्या आहेत. माणसाे मन एखाद्या तळ्यासारखे असते. वरून शांत, स्थिर असणाऱ्या तळ्यात तळाशी का असतं हे फक्त तळचं जाणतं. तसचं मनाचंही असतं. एखादा माणूस वरून कसाही दिसला तरी त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्याला ठाऊक असतं. मनाचा वेध घेणाऱ्या कथा ‘तळं’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. या संग्रहातील सर्व कथा कौटुंबिक आशयावरच्या आहेत. माणसाच्या मनात विचारांच्या अनेक लहरी तरंगत असतात. ते उलगडत जाणाऱ्या कथा या संग्रहात आहेत. ‘तिघी’, ‘वाटचाल’, ‘खरं आहे’, ‘मोरपिस’, ‘तळं’ अशा काही कथा माणसाच्या मन:स्थितचा आढावा घेणारे आहेत तर ‘सोबत’ ‘सावट’, ‘संध्याछाया’, ‘प्रवाह’, ‘देस-परदेस’ या कथा वयस्कर लोकांच्या समस्यांबाबत भाष्य करणाऱ्या आहेत. विविध दृष्टिकोनातून मनाची अवस्था मांडलेल्या कथांमुळे ‘तळं’ हा संग्रह वाचनीय झाला आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    कालच मी आपला ‘तळं’ हा कथासंग्रह वाचला. मला आपला हा कथासंग्रह खूप आवडला म्हणून मुद्दाम आपणांस पत्र पाठवून खास धन्यवाद देवून अभिप्राय कळवित आहे. आपल्या कथासंग्रहातील प्रत्येक कथेची संकल्पना वेगळी आहे, पण आपण कथेची गुंफण इतकी सुंदर करता की, कथा वाचकाच्ा मनाची पकड घेते. आपल्या कथासंग्रहातील सर्वच कथा सुंदर आहेत. त्यापैकी ‘सोबत’, ‘शवविच्छेदन’ या कथा मला आवडल्या तर ‘तळं’ ही कथा मला विशेष भावली. ‘तळं’ या कथेत आपण ज्या तळ्याकडे आपले दुर्लक्ष असते अशा तळ्याला आपल्या विचारांनी महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ही कथा वाचताना मन एकदम प्रसन्न होते व कथेचा शेवट होताना मन खूपच भावनिक होते. यावरून आपल्या लेखनात केवढी मोठी ताकद आहे हे दिसून येते. याबद्दल आपले विशेष कौतुक वाटते. आपल्या कथासंग्रहाचा माझ्या मनावर एवढा प्रभाव पडला की, मला आपणांस अभिप्राय कळविल्याशिवाय चैन पडेना म्हणून पत्र लेखन केले. आपले पुस्तक मी घरी ठेवणार आहे व मित्रमंडळींना भेट म्हणूनही देणार आहे. आपण असा कथासंग्रह लिहिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा! आपले यापुढेही उत्तम साहित्य वाचकांना वाचण्यास मिळावे, ही परमेश्वराकडे प्रार्थना! आपला स्नेहांकित -मोहन पुजारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती