* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHOORVEER MAHARANA PRATAP
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745514
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO SET
Quantity
"INDIA; A LAND OF GREAT PEOPLE; SAINTS AND PATRIOTS; SAGES AND SOCIAL WORKERS; IN THE STRUGGLE OF FREEDOM, ENDLESS NUMBER OF PEOPLE SACRIFICES THEMSELVES COMPLETELY AND TOTALLY; MANY REMAIN ANONYMOUS TODAY; THE GREAT LEADERS SHOULDERED THE RESPONSIBILITY OF LEADING THE COMMON PEOPLE AND IGNITE THEIR MINDS WITH UNCOMMON WILL TO FIGHT FOR THE FREEDOM; NEITHER THE COMMON MEN, NOR THE WOMEN, THE CHILDREN OR THE LEADERS HESITATE TO OFFER THEIR LIVES AT THE FEE OF MOTHER INDIA, IN AN ATTEMPT TO FREE HER FROM THE CLUTCHES OF THE BRITISH. WE OWE THE INDEPENDENCE, PROSPERITY AND HERITAGE TO THEM. THIS BOOK ALLOWS US TO MEET SOME OF THESE LEADERS; IT ALSO BRINGS IN RENOWNED WORLD-FAMOUS PERSONALITIES ACROSS NATIONS. I AM SURE THAT YOU ARE EAGERLY WAITING TO INTERACT WITH THEM. "
"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतवंÂच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!"

No Records Found
No Records Found
Keywords
SHOORVEER MAHARANA PRATAP , R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. मेवाडमधले अनेक राजपूत राजे अकबराला शरण गेले होते; पण उदयपूरचे महाराणा प्रताप यांनी अकबरापुढं न झुकण्याचा पण केला होता. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते अखेरपर्यंत लढले. त्यांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची स्फूर्तिदायक कथा ‘शूरवीर महाराणा प्रताप’ या पुस्तकात आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAR HAR MAIDAN FATEH
KAR HAR MAIDAN FATEH by VISHWAS NANGRE PATIL Rating Star
Pankaj Kharade, Vachanveda Group

` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` . विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे . सरांचे न में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय? .. असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे . फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत . शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत . वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो . म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏 ...Read more

MANDRA
MANDRA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Darshana Chaphekar

कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !