* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANAVTECHA MAHAN SEVAK ABRAHAN LINCOLN
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745453
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI BIRTHDAY COMBO SET
Quantity
Keywords
MANAVTECHA MAHAN SEVAK ABRAHAM LINCOLN , R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. मानवतेचे महान सेवक : अब्राहम लिंकन’ हे पुस्तक म्हणजे एका झोपडीत जन्मलेले आणि पुढं अमेरिकेचं अध्यक्षपद दोनदा भूषवलेले अब्राहम लिंकन यांच्या जीवनातले संवेदनशील कथा-प्रसंग आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MRUTYUNJAY - EBOOK
MRUTYUNJAY - EBOOK by SHIVAJI SAWANT Rating Star
Yogesh Kokil

हे पुस्तक आत्ताच वाचून संपवले आणी अक्षरशः झपाटल्यासारखे झाले आहे. हे पुस्तक आहे की तत्वज्ञान आहे, कादंबरी आहे की काव्य आहे समजत नाहीये. शिवाजी सावंतांनी गुंफलेली ही कर्णाची चरित्रगाथा मनाचा ठाव घेऊन जाते.भाषेची सर्वांगसुंदर मांडणी आणी उच्च संस्कार ूल्य यांनी नटलेली ही कादंबरी म्हणजेच साहित्याला मिळालेली एक सर्वोत्कृष्ट देणगी आहे असा मला वाटतं. कादंबरीची कथा ही सर्वश्रुत आहे परंतु इथे कर्ण फार फार वेगळा भासतो. तो दानशूर आहे, महापराक्रमी आहे, तत्त्वनिष्ठ आहे, दुर्योधनाचा/अश्वत्थाम्याच्या परममित्र आहे हे तर जाणवतेच पण लक्षात राहते ते हे की तो किती दुर्देवी आहे, परिस्थितीने पिचलेला आहे. क्षत्रिय असूनही सूतपुत्र म्हणून आयुष्य घालवायला लागलेल्या कर्णाची घुसमट बेचैन करायला लावणारी आहे.शिवाजी सावंतांची अतिशय रसाळ आणी ओघवती भाषा पूर्ण कादंबरी भर आपल्याला गुंतवून ठेवते.कादंबरीत अनेक सौन्दर्यस्थळे आहेत जी मनावर कोरली जातात.नीलवर्णी अशा श्रीकृष्णाचे विराटरूप दर्शन, कर्णाचे गंगा नदी मधले दररोजचे अर्घ्यदान, कर्णाची दिग्विजय यात्रा, कवचकुंडलाचे इंद्राला दान आणी कुरुक्षेत्र वरची अखेर हे कादंबरीतील परमोच्च बिंदू आहेत असं मला वाटते .शिवाजी सावंतांनी वापरलेले अनेक शब्द हे प्रसंगी जड आहेत परंतु कथे बरोबरच्या प्रवाहात अतिशय आवश्यक आणी चपखल बसलेली आहेत.जागोजागी पेरणी केलेली तत्त्वज्ञान उजळून टाकणारी वाक्य फार गर्भित अर्थ सांगून जातात. आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही कादंबरी वाचून मी पूर्ण करू शकलो याचा मला फार अभिमान वाटतो आणी आनंद ही... जरूर वाचा 🙏 ...Read more

NOT WITHOUT MY DAUGHTER
NOT WITHOUT MY DAUGHTER by Betty Mahmoody Rating Star
Madhuri Bhide Joshi

शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव आला. काटा उभा राहिला. जेव्हा बेटी आणि माहतोब तिच्या घरी सुखरूप पोहोचली तेव्हा आपणच काहीतरी जिंकल्याचा आनंद झाला. खूप छान पुस्तक नक्की वाचावे असे.👍👌