Sachin Rayalwar

About Author

Birth Date : 15/09/1974


SACHIN RAYALWAR WAS BORN IN AURANGABAD. HE HAS GOT A POST GRADUATE DEGREE IN CHEMISTRY FROM DR. BABASAHEB AMBEDKAR. MARATHWADA UNIVERSITY, AURANGABAD. ALSO, HE HAS SECURED A POST GRADUATE DEGREE IN JOURNALISM. HE HAS SECURED A 3 YEAR ADVANCED DIPLOMA IN GERMAN LANGUAGE & A CERTIFICATE COURSE IN FRENCH LANGUAGE. HE HAS GOT EXCELLENT COMMAND OVER THE LANGUAGES MARATHI, HINDI AND ENGLISH. HE HAS WRITTEN INDEPENDENTLY ON STUDY & STUDY - RELATED TOPICS. ALSO HE HAS WRITTEN ON SOME ASSORTED TOPICS, ARTICLES & LITERATURE FROM ENGLISH INTO MARATHI. UP TILL NOW, NINE OF HIS TRANSLATED BOOKS ARE PUBLISHED & MANY MORE ARE IN THE QUEUE FOR PUBLICATION, WHICH ALSO INCLUDES THE FAMOUS BIOGRAPHY ON DR. BABASAHEB AMBEDKAR, ENTITLED YUGPURUSH AMBEDKAR. HE HAS ALSO PENNED DOWN BOOKS ON CURRICULUM SUCH AS A GUIDE ON 12TH PSYCHOLOGY AND 8 BOOKS ON D. ED. HE HAS DONE SOME WRITING WORK ON SUBJECTS SUCH AS HISTORY, CIVICS & GEOGRAPHY.

सचिन रायलवार यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. ते रसायनशास्त्राचे द्विपदवीधर असून, व्यवसाय व्यवस्थापनाची पदविका त्यांनी प्राप्त केली आहे. तसेच पत्रकारितेत त्यांनी पदवी संपादन केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. जर्मन भाषेत त्यांनी पदविका प्राप्त केली आहे आणि फ्रेंच भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी काही स्वतंत्र लेखन केलं असून, त्यांची सात अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ज्यात ‘युगपुरुष आंबेडकर’ या पुस्तकाचा समावेश आहे. तसेच अनेक स्फुट लेखांचं, साहित्याचं त्यांनी इंग्रजीतून मराठीत भाषांतर केलं आहे. त्यांची काही शैक्षणिक स्वतंत्र/अनुवादित पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत, ज्यात बारावीसाठी मानसशास्त्राची मार्गदर्शिका आणि डी.एड.साठीच्या आठ पुस्तकांचा समावेश आहे. तसेच इतिहास, भूगोल आणि विज्ञानाच्या क्रमिक पुस्तकांसाठीही त्यांनी लेखन केलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SAKARATMAK JAGNYACHA SAHAJMARG Rating Star
Add To Cart INR 320
SECRETS OF THE LIGHT Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more