SUMEDH VADAWALA RISBUD

About Author




१९६२ मधे कोकणात जन्मलेल्या सुमेध वडावालांचं बालपणानंतरचं आयुष्य विलेपार्ल्यात गेलं. माझगांव डॉकमधून ते सेवानिवृत्त झाले. पंचविशीत लेखनाला आरंभ करून नंतरच्या पस्तीस वर्षांत जवळपास तेवढीच पुस्तकं प्रकाशित झाली. कथासंग्रह, कादंबर्‍या; वाचकांच्या, समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या असल्या तरी उत्तरकाळात ते आत्मकथा लेखनात रमले. सर्वच पुस्तकांना विपुल आवृत्त्यांचं भाग्य लाभलं. महाराष्ट्र शासन, युवक बिरादरी, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी राज्य व देश पातळीवरच्या एकूण पुरस्कारांपैकी; सर्वोत्कृष्ट कथांसाठीचे शांताराम, डॉ. अ. वा. वर्टी, श्री. दा. पानवलकर आदी महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांच्या कथालेखनाची गुणवत्ता अधोरेखित करणारे रले. कधी कौटुंबिक कधी अलक्षित चाकोरीबाह्य विषयांना कवेत घेणार्‍या त्यांच्या सर्वच कथांनी आशयसंपृक्ततेमुळे आणि भिन्नवेधक, अनघड शैलीमुळे वाचकांना कायम गारूड घातलं.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
CHANDANFULA Rating Star
Add To Cart INR 270
SAMAKSHA Rating Star
Add To Cart INR 360
SANJAVA Rating Star
Add To Cart INR 230
VIRAHAVAAS Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.