MARIA BARTIROMO

About Author


MARIA BARTIROMO, AMERICA"S FIRST FEMALE JOURNALIST, TV SHOW HOST-ANCHOR, WORKED AS AN EXECUTIVE PRODUCER AT CNN FOR FIVE YEARS FROM 1988-89, BEGAN REPORTING LIVE FROM THE NEW YORK STOCK EXCHANGE IN 1993, HOSTED MANY POPULAR SHOWS ON CNBC SUCH AS "ON THE MONEY WITH MARIA BARTIROMO, "CLOSING BELL WITH MARIA BARTIROMO," AND PUBLISHED BOOKS SUCH AS "THE COST: TRUMP, CHINA AND AMERICAN RENEWAL", HONORED WITH AWARDS SUCH AS "EXCELLENCE IN BROADCAST JOURNALISM," "LINCOLN STATUE," "GRACIE," AND TWO "EMMY" AWARDS. RECOGNIZED AS A ROLE MODEL IN THE FIELD OF FINANCIAL JOURNALISM IN AMERICA.

मारिया बार्टिरोमो अमेरिकेतील पहिल्या महिला पत्रकार, टीव्ही शो होस्ट-अँकर, सीएनएनमध्ये १९८८-८९पासून पाच वर्षं एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम,१९९३मध्ये न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधून लाइव्ह रिपोर्टींगला सुरुवात, सीएनबीसीवरील `ऑन द मनी विथ मारिया बार्टिरोमो," `क्लोजिंग बेल विथ मारिया बार्टिरोमो," यांसारखे अनेक लोकप्रिय शोज् व ‘द कॉस्ट : ट्रंप, चायना अ‍ॅन्ड अमेरिकन रिन्युअल" यासारखी पुस्तके प्रकाशित; तर `एक्सलंस इन ब्रॉडकास्ट जर्नालिझम,’ `लिंकन स्तच्यू,’ `ग्रेसी,’ दोन `एमी’ अवॉर्ड्स यांसारख्या अ‍ॅवॉर्ड्सने सन्मानित. अमेरिकेतील आर्थिक पत्रकारिता क्षेत्रातील एक आदर्श म्हणून ओळख.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHIRANTAN YASHACHE 10 NIYAM Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more