`THIS STORY IS INITIATED SINCE THE BEGINNING OF THE MANKIND AND HAS NOT YET COME TO AN END. WOMEN ACCEPTED CARRYING A NEW LIFE IN THEIR WOMB. FOR THIS VERY NOBLE CAUSE, THEY HAVE SHED OFF THEIR EGOS LONG SINCE AND HAVE SURRENDERED UNCONDITIONALLY. WHILE HELPING THE FAMILY TO GROW AND EXCEL, THEY HAVE PREFERRED TO DISSOLVE THEIR IDENTITY GIVING SWEETNESS TO THE WELL-BEING OF THEIR FAMILY. IN RETURN, WHAT DID THEY GAIN? SLAVERY… ABUSE…OPPRESSION…? WHY IS IT THAT THE DEDICATION AND SACRIFICE ARE LINED WITH SORROW? WHY SACRIFICE IS CONSIDERED AS COWARDICE? WHY DEDICATION IS COLOURED AS WEAKNESS? WHEN AND HOW WOULD THIS MISUNDERSTANDING BE ALLEVIATED?
‘ही कहाणी खूप जुनी- मानवतेच्या इतिहासाबरोबर सुरू झालेली... पण अद्यापही न संपलेली. मानवाच्या विकासाच्या वाटचालीत स्त्रीनं मातृत्वाचा महन्मंगल वसा स्वीकारला. त्यापायी अहंतेचा त्याग आणि संपूर्ण समर्पण केलं. कुटुंब आणि समाजाच्या समर्थ जडणघडणीसाठी स्वत:ला साखरेसारखं विरघळवून दिलं.
पण... काय मिळालं तिला...? उपहास...? अवहेलना...? गुलामी...?
त्यागाला आणि समर्पणाला दु:खाचा शाप नेहमी असायलाच हवा का?
त्याग म्हणजे भित्रेपणा आणि समर्पण म्हणजे दुबळेपणा का?
कधी दूर होणार हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक गैरसमज...?