* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NEW YEAR SURPRISE, NIGHT MONSTERS, RADIO RESCUE, TEA AND SUGAR CHRISTMAS
  • Availability : Available
  • Translators : MALVIKA AMDEKAR
  • ISBN : 9789387789333
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHAHA SAKHARECHA NATAL,NAVAVARSHACHI ANAPEKSHIT BHET,RADIO RESCUE,RATRICHE RAKSHAS
चहा साखरेचा नाताळ, नववर्षाची अनपेक्षित भेट, रेडिओ रेस्क्यू, रात्रीचे राक्षस
१. सर्वोत्कृष्ठ प्रादेशिक बालसाहित्य निर्मिती २०१८ (प्रथम पुरस्कार) - द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स २. भा.रा.भागवत उत्तम अनुवाद पुरस्कार २०१८ - बालसाहित्य संमेलना तर्फे

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 25-05-2018

    ‘चहा साखरेचा नाताळ’ ही ऑस्ट्रेलियातल्या कॅथलीनची गोष्ट! बेताचीच परिस्थिती. गावात दर गुरुवारी साखरेची गाडी यायची. आणि नाताळची ट्रेन यायची वर्षातनं एकदा. आणि एन नाताळ तोंडावर आलेला. तिनं मनोमन प्रार्थना केली. ‘‘प्लीज गं, प्लीज लवकर वेळेवर ये. उशीर नकोकरूस.’’ कॅथलीनला धीरच धरता आला नाही. ती थेट पळत सुटली ती घरामागच्या टेकडीवर... कॅथलीनचं नाताळच्या ट्रेनची वाट पाहणं, नाताळबाबाकडून मिळालेली पुस्तकरूपी भेट... त्या पुस्तकाच्या विश्वात रमणं... अशी ही रंजक कथा आहे. गोष्ट संपल्यावर चहा आणि साखरेची आगगाडी याविषयीची रंजक माहिती पुस्तकात आहे. ‘रेडिओ रेस्क्यू!’ ऑस्ट्रेलियातल्या दुर्गम भागात राहणारा जिम आणि त्याचं कुटुंब. त्याचं आयुष्य सरळमार्गी आहे, पण जगाशी त्याचा संपर्क नसल्याने त्याला एकटेपणाची तीव्र जाणीव होत आहे. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात पेडल रेडिओ येतो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. या गोष्टीतल्या जिमला फोर वेल्समधलं आयुष्य खूप आवडायचं, पण कोणाचीच सोबत नव्हती. त्यामुळे त्याला एकटं एकटं वाटायचं. जिम रेडिओची वाट पाहत होता कारण त्याला त्याच्या मित्राशी बोलता येणार होतं. एक दिवस हा रेडिओ त्याच्या आयुष्यात येतो आणि त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून जातं, याचीच ही गोष्ट! गोष्टीच्या शेवटी दुर्गम भागापर्यंत पोहोचलेल्या या ‘रेडिओ’ची आणि त्याच्या निर्माणकर्त्याची गोष्ट वाचणंही सुखद अनुभव आहे. जेन जॉली यांचं लेखन आणि रॉबट्र इंगपेन या ऑस्ट्रेलियन चित्रकाराचं रेखाटन असलेली ही दोन्ही पुस्तकं म्हणजे दुग्धशर्करा योगच! सहज-सोप्या आणि आशयसमृद्ध गोष्टी असंच यांचं वर्णन करावं लागेल... सोबत अप्रतिम चित्रं, त्यामुळे जरूर वाचावं आणि पाहावं असं हे पुस्तक आहे. या संचातलं तिसरं पुस्तक आहे ‘रात्रीचे राक्षस’. हसरी कुकाबुर्राला एका राक्षसाची भीती घातली जाते. किंकाळ्या, आरडाओरडा, हिस्स... असा विचित्र आवाज काढणारा हा राक्षस. पण ही हसरी कुकाबुर्रा या राक्षसाचा छडा लावायचा. असं मनाशी पक्कं करते. त्यासाठी ती जंगलातल्या मित्रांना गोळा करतो... आणि या शोधात एके दिवशी विचित्र आवाज काढणाऱ्या नकलाकार लायरबर्ड पकडला जातो. तो कसा पकडला जातो याची रंजक गोष्ट ‘रात्रीचे राक्षस’मध्ये आहे. गोष्टीच्या शेवटी लायरबर्ड म्हणजे कोणता पक्षी, त्याला हे नाव कसं पडलं याची माहिती देण्यात आली आहे. या कथेतली चित्रही उत्तम आहेत. हे पुस्तकही वाचावं आणि पाहावं असंच आहे. -लता दाभोळकर ...Read more

  • Rating StarSakal 29 April 2018

    मेहता पब्लिशिंग हाऊसनं लहान मुलांसाठी देशोदेशीचं साहित्य मराठीत सादर केलं आहे. ‘कांगारू देशीच्या गोष्टी’ या मालिकेतली ही सचित्र पुस्तकं लहान मुलांना निश्चितपणे आवडतील. ‘रेडिओ रेस्क्यू’ हे पुस्तक जेन जॉली आणि रॉबर्ट इंगपेन यांनी लिहिलं आहे. पेडल रेडिओुळं जिमचं आयुष्य कसं बदलून जातं त्याची ही कहाणी. ‘रात्रीचे राक्षस’ या पुस्तकात नीना पौलोस यांनी कांगारू आणि प्राण्यांचं कल्पनाविश्व मजेशीर पद्धतीनं चितारलं आहे. ‘नववर्षाची अनपेक्षित भेट’ या पुस्तकात खिस्तोफर चेंग आणि दी वू एका लहान मुलाच्या मनात नववर्षाबद्दल चाललेले विचार मांडतात. ‘चहा सारखेचा नाताळ’ मध्ये नाताळाची आणि साखर घेऊन येणाऱ्या रेल्वेची एक छानशी गोष्ट आहे. चारही पुस्तकांची पृष्ठं ३२/ मूल्य प्रत्येकी ७०/- रुपये. चित्रांमुळं आणि शेवटी दिलेल्या माहितीमुळं समृद्ध करणारी, वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारी ही पुस्तकं मुलांना आवडतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.